प्रेम

♥ वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥
...
१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥
 
 
चांदणीच्या विश्वात एकच चंद्र असतो.....

आकाशातील एक चांदणी आकाशातच हरवली
चमकायच सोडुन ती आज गप्प-गप्प बसली.....

निघाली होती ती चंद्राला शोधाया
पण लागला तिला एकांत गाठाया....

फसवा चंद्र, गेला तिला एकटीला टाकुन
लगेच येतो, अस खोटच सांगुन....

चांदणीच्या विश्वात एकच चंद्र असतो
पण चंद्रा विश्वात मात्र चांदण्यांचा भरला बाजार असतो.....

निसर्गाचा हा नियम ती विसरुन गेली
चंद्राला शोधता-शोधता जगापासुन खुप दुरवर गेली.....
वाहणाऱ्‍या मनाला थांबवणारं,
भरकटलेल्या जिवनाला दिशा देणारं,
कोणीतरी आपलं असावं.........
रुतताच काटा पायात पाणी डोळ्यात यावं,
व्याकुलेल्या नजरेने गर्दीत शोधावं,
कोणीतरी आपलं असावं..........
वाहणाऱ्‍या अश्रूला डोळ्यातच थांबवणारं,
चुकलेल्या पावलांना पायवाट दाखवणारं,
कोणीतरी आपलं असावं.........
दूर असूनसुद्धा जवळ भासणारं,
मृगजलागत डोळ्यासमोर दिसणारं,
कोणीतरी आपलं असावं..........
जिवनाच्या शेवटपर्यंत सोबत असावं,
मरण सुद्धा मिठीत त्याच्या यावं,
कोणीतरी आपलं असावं....
 
संत:शत्रुवर प्रेम करा आणि त्यावर विश्वास ठेवा

>योध्दा: शत्रुवर प्रेम कींवा विश्वास
टाकला जात नाही.

संत:- अहिंसेचा मार्ग स्विकारा,
कोणी एका गालावर थोबाडीत
मारली तर दुसरा गाल पुढे करा.

>योध्दा :- स्वसंरक्षण करणे म्हणजेहिंसा नाही, मुर्ख हिंदुंनो,एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा उरतच नाही.

संत:-देव शांतीचा संदेश देतात.

>योध्दा :- तुम्ही पोकळ देवभक्त आहात प्रभु श्रीरामाच्या हातात धनुष्य़ आहे, तर
श्रीक्रुष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनांच्या रक्षणासाठी देवांनाही शस्त्र हाती घ्यावे लागतात.

संत :- शस्त्र हाती घेणे केंव्हाही वाईट,
शत्रुशी लढायचे तर त्याच्या तत्वांशी लढा.

>योध्दा:- युध्दात तत्व नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात.
सीमा ह्या तलवारीने आखता येतात
तत्वांनी नाही.

संत :- तलवारी नकॊत,ह्रुदय
परिवर्तनावर विश्वास ठेवा व शत्रुचे मन
जिंका.

>योध्दा :- ज्याने आपल्याला मारुन
टाकायचे ठरवले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. अफजल खानाचे ह्रदय
परिवर्तन करता येत नाही त्याचे ह्रदय
फाडावे लागते.

आता या पैकी आपल्याला कोण व्हायचं ते तुम्हीच ठरवा!!!
'ती' नसताना..
चिंब पावसात भीजतांनाच तो आकाश,
'ती ' नसताना असण्याचा आभास,
मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास,
अरुंद वाटानवरून एकत्र केलेला तो प्रवास,
तिच्या मिठीतील तो हवा असणारा स्पर्श,
थोडा वेळ का असेंना विसरवून टाकतो
जीवनाशी केलेला प्रत्येक संघर्ष,
तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं,
गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य,
नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य,
'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस,
'ती' आली की मिठीत घेऊन घेतलेला दीर्घ श्वास,
'ती' जवाळ नसतानचा तिच्या आठवणींचा
प्रत्येक क्षण असतो खास
त्यामुळेच माझे जगणे झाले आहे
फक्त तिच्या साठी खास.....
आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!

१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!
...
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!

८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!

हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!!

नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
 
सहज विचार केला कि मराठी माणसाने प्रेम व्यक्त करताना मायमराठी बाणा वापरला आणि शुद्ध मराठीत मागणी तर तो काय आणि कस म्हणेल??

कदाचित तो, गुलाब ऐवजी कमळाच फुल घेऊन म्हणेल-

"हे सुंदरी, काक्विणे भरलेला हा कामाल्द्रोन मज हस्ती ग्रहण करून मी तुजला पुसतो कि तुजीया मनोमुकुरी उभासलेला तो दिव्य राजकुमार मजरूपाने या भूतलावर अवतीर्ण जहला आहे असे तुजला प्रतीत होते असल्यास तुजीया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..."

होकार राहिला बाजूला, एकाच चित्कार देवून सुंदरी मूर्च्छितावस्थेत जाणार हे क्रमप्रापत..!!!

अश्याच प्राकृत मराठीत याचे उत्तर काय असू शकेल ??
'महाशय, आपल्या कर्णपटलानजीक मज हस्ते एक तीव्र नाद उठविल्यास आपल्या कर्णपटली वेदनांचा जो कल्लोळ माजेल त्याची पुसटशी कल्पना असल्यास आपल्या मुखकमलास विश्राम द्यावा' ...

सुप्रभात! :)
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कधी तरी एकतर्फे
प्रेम करुन बघा.....!
नाही केले काही आपल्या साठी तिने
तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा....!
तिच्या साठी आपले जीवन काही नाही पण
तिच्या साठी जगुन बघा....!
आपल्या शब्दाला किंमत
नाही पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!
आपले अश्रु म्हणजे पानी पण
तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....!
एक तर्फे
का होई ना पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड
येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा
दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि
तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....

दगड

घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....
तात्पर्य:

प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......

पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
 
ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो,

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो,
ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले,

मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका

"होती एक
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचा..
" वेडा होतो अगदी वेडा"
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पुसनार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कोनाचेच डोळे भर्नार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ....... बाकी काही नाही
हसता हसता डोळे लगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

आभाळमाया.........
जडतो तो जीव, लागते ती आस
बुडतो तो सूर्य, उरतो आभास

कळतोच अर्थ, उडतोच रंग
ढळतो तो अश्रू, सुटतो दु:संग

दाटते ती माया, सरतो तो काळ
ज्याला नाही ठाव, ते तर आभाळ

घननीळा डोह, पोटी गूढ माया
आभाळमाया.....
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
विणा असलेल्या ऐका मुलाणे आपल्या आईस लिहलेले पत्र

प्रिय आईस,

पत्ता :- देवाचे घर.

तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.

वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाचा माझ्याभोवती का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.

बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.

भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवाय तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.

बघं तुझं बाळ किती समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाला.

आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच..........
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
"एके रात्री ते दोघे आपल्या गाडीतून चालले होते, दोघे एकदम शांत होते, बरेच वेळ गाडी एकटीच आवाज करत होती, तिच्या मनाला त्याच्या विरहाचे दुखं जाणवत होते आणि त्याच्या मनातून संशयाचे वारे वेगाने वहात होते, काही वेळाने तिने त्याला एक चिठ्ठी दिली, अचानक त्याच्या मनातील संशयाची जागा रागाने घेतली, चिठ्ठी न वाचताच त्याने तिला सांगून टाकले कि आता आपल्यातले संबंध संपले, तू मला विसरून जा ................... वेगाने धावणारी गाडी, मनातील संशयाचे वारे आणि अचानक आलेला राग ह्याचे फळ शेवटी काय मिळणार ? गाडीचा अपघात झाला, तो किरकोळ जखमी झाला पण ती ............. तिने मात्र शिक्षा भोगली, आपला प्राण गमावून बसली .............. ओल्या डोळ्यांनी त्याने तिची चिठ्ठी वाचली, ज्यात लिहिले होते.....

“IF YOU LEAVE ME I WILL DIE" ♥ ♥ ♥
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... बाकी काही नाही हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही "कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......" 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले…… ‘ए आपण असे कसे रे ना रंग, ना रूप, … नेहमीच चिडीचुप, आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला………… दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसला तरी, चिडीचुप असलो जरी, आधार आपण भावनांचा, आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीही खोल आपण, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणी थांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत, उद्रेक आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्र्दयातील रुदनांचा, स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा , म्हणुनच, आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुळेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी……… ऐकून ही अश्रुंची वाणी अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एका मुलाची कथा ७ वी ला असताना ... मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो .. ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ... मला ती खरच खूप आवडायची I पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत आणि ते मला माहित होत.... वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या मी तिला दिल्या ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही "माहित नाही का.....??":((( कॉलेग ला असताना माझ्या फोन वर call आला... तिचा चा होता तो ... ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला... तिने मला भेटायला बोलवलं होत मी तिला भेटायला गेलो... मी तिच्या समोरचं बसलो होतो मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो... २ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं... मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली... पण तिने मला म्हटलं मी झोपते.. तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..." खूप वेळा शांत उभे होतो... मग मी निघालो... आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ... माहित नाही का??? . सिनियर वर्षाला आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली... माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील... माझ्या सोबत हि कोणी नव्हत... आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ... PROM निघत ला ... prom NIGHT ला सगळ काही नित झाल.. आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो... ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही.. पण मी खुश होतो... कि ती खुश आहे... GRADUATION दय ला ... दिवसा मागून दिवस गेले... आठवडे लोटले किती तरी महिने गेले तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ... मी तिला पाहिलं ... तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती.. माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना आमची शेवरी ची भेट होणार होती... ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही... तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ... आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.." बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला काही वर्षांनी मी लग्नात आलो होतो... आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत .. माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल.... "तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले .. आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे.. खूप वर्षांनी... मी आमच्या शाळेत एकदा गेलो ... तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते... ती हि... तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती... मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो... 7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा" college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं" prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,... मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..." graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही" marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....." हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला... आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती... कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला.
                           ....................................................अनोळखी  
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की...
मी तुला हासवेन...
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो...
...
एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि...
मी वचन देतो की...
मी शांत राहीन...

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर...
माझ्याकडे त्वरीत ये...
कदाचीत मलाच तुझी गरज असेल
_________________________________________________
काळीज रडतंय मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी ...आस्व पुसण्यासाठी तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा " तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे, माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे" मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली, विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!! आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती.. मग न जाने का , नजर माझीच लागली ..... मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत त्या भाबडीने हात तिचा कापला होता .. मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता... पुन्हा येऊन पाहून जा ग पत्रिका आहे आपल्याच लग्नाची .. सोंग केलं होतं ग मी सारं... फक्त तुला जळवण्यासाठी .. ग प्रिये थोडं जळवण्यासाठी.. आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय... जीव सोडला आहे.... तरीही काळीज रडतंय... काळीज रडतंय.....!!!!!... 
____________________________________________________
कधीतरी अशीच एक
संध्याकाळ असेल ,
ह्रदयात तूझी प्रीत
अन ओठावर गीत असेल ..
नकळत मग गालावर
या थेंब ओघळतील ...
कधीतरी पून्हा
तू स्वप्नात येशील ,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला
जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...
प्रीत आठवून माझी कंठ
तूझाही दाटेल ...
डोळ्यातील अश्रू मूक पणे
गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते
मी जवळ नसेन .....
____________________________________________________
I LOVE U हा प्रश्न नाहीये तरीही सगळ्याना उत्तराची अपेक्शा का असते?
याचा अर्थ अजुन कोणालाही कळालेला नाही आणि ज्याना कळाला ते या जगात नाहीत.
कोणी आपल्या I LOVE U म्हटले तर आपला विश्वास बसत नाही म्हणुन प्रेमअन्ता पर्यन्त खात्री करत असतो, पण कोणी I HATE U म्ह्टले तर लगेच विश्वास बसतो म्हनुन EVEN I THINK SO बोलतो
ह्रद्याला प्रेमासाठी ♥ असा सुन्दर आकार दिला गेला, पण खर्या ह्र्द्याचा आकार खुपच विचित्र आहे.
प्रेम आणियुद्धात काहीच साम्य नाही, युद्धामधे मारता आणि मरता येते पण प्रेमात मारता येत नाही पण मरता येत नाही.
ज्याना आपण प्रेम करतो त्याना आपण कधिच विसरत नाही मग का? दिवसभर आपण MISS U म्हणत असतो?
_________________________________________________________
 
रविवार सकाळची वेळ होती,

तो हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
... तो तिच्याकडे न पाहताच "हो"म्हणाला,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेला,
त्याच्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला,
त्याने उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
तो हळूच उठला खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आला,
तिने त्याच्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागला;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि त्याला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत तो क्षणभर तसाच थांबला,
उगाच तिला आतण दुखावले म्हणून स्वतःशीच भांडला ,
हळूच मग मागुन जाउन मग
त्याने..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात त्याचा भाजला,
तो कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर त्याच्या मनात मग उठली,
त्याने तिला जखडले मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!";
तो म्हणाला तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
तो म्हणाला "उकळू
दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस तो परत म्हणाला मी आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
तो प्रत्येक कारण उडवत होता,
तिला अजुनच जवळ घेत,
त्याच्या मनासारखा घडवत होता,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
तो म्हणालो "हो का! त्याला वाटले की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली,
त्याने मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली ,
तिन झटकन स्वतःला त्याच्या तावडीतुन सोडवून घेतल,
आणि हळूच त्याला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
त्याने वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला,
याचा खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो कचरेवाला पण गालात हसला,
त्याने कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे ,अस त्याला वाटल,
पाहिले त्याला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला,
तो धावत आत गेला, त्याच/तिच ह्रदय धडधड़त होत,
त्याच्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत,
त्याने तिला उचलून घेतल, डोळे त्याचे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरूनहात त्याचे फिरत होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
त्याला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग
विलसले,
ती म्हणाली त्याला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ दया ना!"
त्याने कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागला,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागला,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
त्या दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............
_____________________________________________________
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
... आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
_________________________________________________________
नात्याचे मखमली पदर उलगडण्यासाठी जगावं,
प्रेमाने कोणी साद घातली तर हुंकारण्यासाठी जगावं,
जीवनात कोडे पडले असेल तर ते सोडवुण दाखवण्यासाठी जगावं, जीवनाचे सुंदर सुंदर पैलु उलगडण्यासाठी जगावं,
खुश असतात सर्वजण तुम्ही खुश असल्यावर,
सगळ्यांना हसत ठेवण्यासाठी आपण हसतच जगाव.
________________________________________________________
कवितांच्या घरात
काल तुझा फ़ोन आला,

काल तुझा फ़ोन आला,

मनाला एक वेगळ आनद देऊन गेला ,
पण तू काहीतरी कारण सागुन मधेच कट केला ,
खर सांग विसरनयाचा प्रयत्न करते का मला ?

विसरलेल्या आठवणी जाग्या का करून दिल्या मला ,

मला दुखी करून छान वाटते का तुला ,
तू दिलेल्या दुखात ही सुख मीळतय मला ,
नाही वीसरलीस याची खात्रि आहे मला ,

तुझे ते अबोल प्रेम कधी समजलेच नाही मला ,
तू सोडून जाताना नकळत समजले मला ,
तुझ्या ऋधायत मैत्री पलीकडे जागा होती मला ,
आज कसा काय खुप दीवसानी फ़ोन केलास मला ?

माझा आवाज ऐकन्याची इछा होती का तुला ,
मी वीसरलो की नाही हे पहायचे होते तुला ,

अग वेडे मनापासून खुप खुप आवडतेस मला ,
तू जवळ नाहीस कस काय सांगू तुला
_________________________________________________________
 मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
 सुख मिळविण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहाव लागतं,
मनापासुन प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
कारण 'ते' वेड समजुन घेण्यासाठी
कधीतरी मनापासुन 'प्रेम' करावं लागतं..!!
_____________________________________________________
 वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!! ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं...., ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं...., बसून ह्दयात मग शांतपणे रहावं....!! हक्काने कुणावर तरी कधीतरी रुसावं....., मग त्याच्याच समजूतीने क्षणभर विसावं....!! वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!! वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......, ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!! वाटत कधी-कधी कुणाच तरी होउन पाहावं....., कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!! वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!! वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं....., क्षणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!! वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं....., लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!! वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!! ♥ ♥
____________________________________________________
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
 
______________________________________________________
दिवसा स्वप्ने बघतो मी...
अजब
दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...

उगाच कविता करतो मी

जगात वेडा ठरतो मी...

मनात इमले रचतो मी

आशेवरती जगतो मी...

असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...

वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...
___________________________________________________
एकदा मी प्रेमाला विचारले एकदा मी प्रेमाला विचारले कुठे कुठे तू असतोस रे? प्रेम मला हसून म्हणाला.. अरे वेड्या मी एकाच ... ठिकाणी नसतो रे... जेव्हा तुला कोणी आवडतो.. मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे... तू विचार फक्त माझाच करतो कारण मी पूर्णपणे तुझाच असतो रे........ अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे... प्रेम तू कुणावरही कर.... मी तुला तिथेच दिसणार असतो रे.... तू प्रेम दुसर्याला जितके देशील... त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो रे... अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे... आयुष्य खरच खूप सुंदर आहे.. माझा हात सोडून देऊ नकोस रे...... जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार.. मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे....
______________________________________________________
‘ती सकाळ’
ती गच्चीतली चांदणी रात्र पडायला,
होती सोबतीस तू,मला झोपी थापडायला;'

पहाटे न्हाल्या अंगाने तू आलीस,पण पाहून मीच भिजून चीम्बला,

तुझ्या केस झटक्याने,जसा अंगी सडाच शिंपला;

ढिल्या अंगी तू वाकलीस जवळ,सावरत स्वतःस पदरी,
ढिलावून केसी निसटून,एक बट गुदगुदली स्पर्शून माझ्या अधरी;

ओठ चिमटा करून तीस,मी तुला ओढले छाती,
शरणांगत होऊन तू मुठावलेस,तुझे हात माझ्या हाती;

पुढे काय झालं,लक्षात का आहे खूण,त्या चावल्या दातांची,
अझुनही लाजवतेस चेहेरा,घेऊन ओंझळ त्या गुलाबी हातांची;

किती तशीच आज भासलीस,का मला पुन्हा मागे पाठवते?
कदाचित तू विसरलीस,पण मला ‘ती सकाळ’ अजून आठवते...!!!!!
 __________________________________________________
 प्रेम केले होते त्याच्यावर,पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,पण त्यालाच माझे होता आले नाही,
माझ्या मनातील खरे प्रेम, त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,मनातून त्याला काढताच आले नाही,
त्याचा विरहाचा दु:खातून,अजूनही बाहेर पडता आले नाही,
...खूप प्रयत्न करून देखील,त्याला विसरताच आले नाही,
तो सोडून गेला तरी,मला त्याला सोडताच आले नाही,
चार चौघात मला कधीच,मनमोकळे हसताच आले नाही,
सात पावलेही आज त्याला,माझाबरोबर चालता आले नाही,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही..!!!!
________________________________________________________
______________________________________________________
रुसवा
कोण हा खल रुसवा,ज्याने तुला केलीस अबोल,
किती कंजूस ते ओठ,ज्यांच्या हसण्यातही नाप तोल;
केवढा जड तो राग,जो जीव शालीस पाडतो झोल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.

मनवायचा तुला प्रत्येक प्रयास का घालवतेस फोल,
अशी मान वळवू नकोस,पाहिजे तर मला पाठी सोल;
एकदा तर गं या सुन्या छातीवर विसावून डोल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.

मी आणि माझ्या चुकांना,पदराच्या उबेत ठेवीन होतेना तुझेच बोल,
एकदा तर गं शिरू दे त्या पदरी,काहीच का नाही माझ्या जवळिकीस मोल;
का खपलीस येऊन सुकावली,मला चीम्बवणारी त्या दवीत प्रेमाची ओल,
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.

टोकावलीस,तरी जवळायचं आहे का कि हा सरळ राग आहेच मूळचा वाकता गोल,
धरणी अम्बरापरी अंतरावलीस,तरी कशी विसरशील तो प्रेमाचा ऐतिहासिक भूगोल;
किती हा टोकाचा राग,ज्याचा शिगेनेच जीव जातो खोल;
नकोस गं अशा पापण्या ओलावू,ते अश्रू आहेत अनमोल.
________________________________________________________
 ______________________________________________________
 एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
............
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये कि काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच नाही सोडणार........

 
 
 
 
 

No comments:

Post a Comment