माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Showing posts with label आई.... Show all posts
Showing posts with label आई.... Show all posts
Saturday, January 28, 2012
Tuesday, January 24, 2012
एक ग्लास पाणी
एक ग्लास पाणी
एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात
होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते
लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला
कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा
ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची
सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम
करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने
लक्ष्मणाला हाक मारली.'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस'लक्ष्मण घरात पाणी आणायला
गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती.
रात्र संपली पहाट झाली. गार वार्याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने
पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई
म्हणाली'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे
नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,'आई
अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक
रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.
--------------- --------------- ------------
मराठ मोळी आई
मराठ मोळी आई
आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा•
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला
विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी
ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी
पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल•
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता•
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल•
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही•
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला
सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग
तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.
लेखक - अज्ञात
Monday, January 16, 2012
आई हा शब्द आहे का ?
एकटीच आहे मी अता...
पण कोणाशी बोलू मी काही,
भेटतात लोक येता जाता..
पण तू भेटत नाहीस मला आई. . .
आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,
घरट्यात अता एक चिमनी आली,
डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,
पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .
आली मला उचकी अता,
असे वाटे की तू आली..
अंधाराला एकटक पाहता,
माजा उजेड आहेस तू आई. . .
काही गोष्टी कलू लागले आहे अता,
विनाकारण देवाने खुपच केली घाई..
देवाकडे निरागसपने पाहता,
देवाने का हिरावून घेतली माझी आई. . .
थांबू लागली आहे मी चालता चालता,
एकटीच चालत आहे मी पायी,
बाकीच्या पालकांना पाहता,
वाटे, असेल का त्यात माझी आई. . .
घरात जेवत आहे मी अता,
पण माझ्या पोटात भूकच नाही..
प्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,
मला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .
पूर्ण केले मी माझे GRADUATION अता,
पण नाही आली मी पहिली..
कुठे कुठे चुकते मी अता,
मला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .
एक मुलगा आवडतो मला अता,
तो दिसतो एकदम सही..
लग्न करणार आहे मी अता,
वरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .
या जगात नाहीस तू अता,
पण तुझी आठवन मला सतत आली..
आयुष्याचे गोड गीत गाता,
तू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .
तुला मी माफ़ नाही करणार मी अता,
देवा कड़े जायची का केलीस तू घाई..
निघून गेलीस तू अचानक काही न कलवता,
ये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .
घाबरू नकोस तू अता..
छानपने संभाळते जीजू आणि ताई,
तू हळूच आम्हाला पाहतेस ना..
स्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .
.............................................. प्रणय परब
पण कोणाशी बोलू मी काही,
भेटतात लोक येता जाता..
पण तू भेटत नाहीस मला आई. . .
आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,
घरट्यात अता एक चिमनी आली,
डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,
पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .
आली मला उचकी अता,
असे वाटे की तू आली..
अंधाराला एकटक पाहता,
माजा उजेड आहेस तू आई. . .
काही गोष्टी कलू लागले आहे अता,
विनाकारण देवाने खुपच केली घाई..
देवाकडे निरागसपने पाहता,
देवाने का हिरावून घेतली माझी आई. . .
थांबू लागली आहे मी चालता चालता,
एकटीच चालत आहे मी पायी,
बाकीच्या पालकांना पाहता,
वाटे, असेल का त्यात माझी आई. . .
घरात जेवत आहे मी अता,
पण माझ्या पोटात भूकच नाही..
प्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,
मला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .
पूर्ण केले मी माझे GRADUATION अता,
पण नाही आली मी पहिली..
कुठे कुठे चुकते मी अता,
मला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .
एक मुलगा आवडतो मला अता,
तो दिसतो एकदम सही..
लग्न करणार आहे मी अता,
वरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .
या जगात नाहीस तू अता,
पण तुझी आठवन मला सतत आली..
आयुष्याचे गोड गीत गाता,
तू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .
तुला मी माफ़ नाही करणार मी अता,
देवा कड़े जायची का केलीस तू घाई..
निघून गेलीस तू अचानक काही न कलवता,
ये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .
घाबरू नकोस तू अता..
छानपने संभाळते जीजू आणि ताई,
तू हळूच आम्हाला पाहतेस ना..
स्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .
.............................................. प्रणय परब
आई
निळे निळे आभाळ इथे हिरवी हिरवी ही वनराई
प्रकाशाच्या वाटेवरती जीवन इथले गात राही ।
उंच इमारती, भव्य दालने लखलखते ही निशा देखणी
छमछम करिते लक्ष्मी, आणिक जीवन होते एक रुबाई ।
फेस उसळे चषकांमधूनी मदिर संगीत गुंजे कानी
खळखळणाऱ्या हास्यरवाने हर्ष माईना मनातूनी ।
दमल्या थकल्या वाटसरुला,पण थांबण्यासही इथे मनाई तया मिळेना एक कोपरा
क्षणाक्षणाची इथेच घाई मिटता डोळे, समोर माझ्या इवले इवले घरकुल येई
ओढ लावी मनास माझ्या मायेची ती मऊ दुलई ।
मिणमिणता प्रकाश देते देवघरातील एक समई
दरवाजातून वाट निरखिते थांबून राहे माझी आई ।
आभार - मी मराठी ब्लोग
प्रकाशाच्या वाटेवरती जीवन इथले गात राही ।
उंच इमारती, भव्य दालने लखलखते ही निशा देखणी
छमछम करिते लक्ष्मी, आणिक जीवन होते एक रुबाई ।
फेस उसळे चषकांमधूनी मदिर संगीत गुंजे कानी
खळखळणाऱ्या हास्यरवाने हर्ष माईना मनातूनी ।
दमल्या थकल्या वाटसरुला,पण थांबण्यासही इथे मनाई तया मिळेना एक कोपरा
क्षणाक्षणाची इथेच घाई मिटता डोळे, समोर माझ्या इवले इवले घरकुल येई
ओढ लावी मनास माझ्या मायेची ती मऊ दुलई ।
मिणमिणता प्रकाश देते देवघरातील एक समई
दरवाजातून वाट निरखिते थांबून राहे माझी आई ।
आभार - मी मराठी ब्लोग
शेवटी एका प्रश्नाच उत्तर दे आई...
सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मलेली तू
इथ मात्र चमच्यापासून संसार उभा केलास?
वीस बाय वीस च्या किचनमधे वावरणारी तू
इथ मात्र दहा बाय बाराच्या चौकटीत रममाण झालीस?
सुखाच्या पलीकडच्या विश्वाची सोबतीण होतीस
इथ तडजोडीलाच सुखाचा आकार दिलास?
हाती घेतलेल काम पूर्ण कराव अस सांगणारी तू
आम्हाला मात्र अर्ध्या प्रवासात सोडून गेलीस?
जन्मभर थोरामोठ्याना आधारस्तंभ वाटलीस
तुझ्या लाडक्या चिमण्याना मात्र निराधार करून गेलीस?
जन्मभर जिद्दीने जगालीस
त्या मृत्युपुढे मात्र हतबल झालीस
आपल्या लाडक्यांसाठी कष्टाच ओझ वहात राहिलीस
त्यांच सुख अनुभवायला का थांबली नाहीस?
खाच खळग्यातून अवघड वळणावरून बाबाना पुढे आणलस
पायवाट सोपी दिसू लागताच मागे का वळलीस?
कष्टापासून दूर ठेवणार होतीस ना आम्हाला
मग या कोवळ्या खांद्याना तुझ ओझ उचलायाचे कष्ट का दिलेस ?
माझे एवढे प्रश्न अनुततरीत ठेऊन गेलीस
शेवटी एका प्रश्नाच उत्तर दे आई
तू एवढी चांगली का होतीस a
की त्या ईश्वरालाही प्यारी व्हावीस?
इथ मात्र चमच्यापासून संसार उभा केलास?
वीस बाय वीस च्या किचनमधे वावरणारी तू
इथ मात्र दहा बाय बाराच्या चौकटीत रममाण झालीस?
सुखाच्या पलीकडच्या विश्वाची सोबतीण होतीस
इथ तडजोडीलाच सुखाचा आकार दिलास?
हाती घेतलेल काम पूर्ण कराव अस सांगणारी तू
आम्हाला मात्र अर्ध्या प्रवासात सोडून गेलीस?
जन्मभर थोरामोठ्याना आधारस्तंभ वाटलीस
तुझ्या लाडक्या चिमण्याना मात्र निराधार करून गेलीस?
जन्मभर जिद्दीने जगालीस
त्या मृत्युपुढे मात्र हतबल झालीस
आपल्या लाडक्यांसाठी कष्टाच ओझ वहात राहिलीस
त्यांच सुख अनुभवायला का थांबली नाहीस?
खाच खळग्यातून अवघड वळणावरून बाबाना पुढे आणलस
पायवाट सोपी दिसू लागताच मागे का वळलीस?
कष्टापासून दूर ठेवणार होतीस ना आम्हाला
मग या कोवळ्या खांद्याना तुझ ओझ उचलायाचे कष्ट का दिलेस ?
माझे एवढे प्रश्न अनुततरीत ठेऊन गेलीस
शेवटी एका प्रश्नाच उत्तर दे आई
तू एवढी चांगली का होतीस a
की त्या ईश्वरालाही प्यारी व्हावीस?
Subscribe to:
Posts (Atom)