Showing posts with label आयुष्य. Show all posts
Showing posts with label आयुष्य. Show all posts

Saturday, January 28, 2012

थांबावे हे दुष्टचक्र...

                               थांबावे हे दुष्टचक्र...
आज साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल...

वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली. माझ्या मुलीचाही शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. तसेच इतर नातेवाईक व मैत्रिणींचे फोन आले. सायंकाळी सुनेने औक्षण केले व बडा खानाही. मनाला फार बरे वाटले. मनात सहजच विचार आला, की हे प्रेम, ही माया अशीच शेवटपर्यंत टिकून राहू दे.

या निमित्ताने मनात माझ्या आयुष्याच्या सुरवातीपासून आत्तापर्यंची पाने उलटू लागले. तशी मी साधारण परिस्थितीत वाढले. इतर मुलींसारखीच 11 वी मॅट्रिक झाले. कॉलेजमध्ये जायची परिस्थिती नसल्याने नोकरी करणे प्राप्त होते. माझी आईसुद्धा नोकरी करत होती; पण तेव्हाच्या वयात नोकरी करण्यास मावशीच्या मिस्टरांनी विरोध केला व माझी व माझ्या बहिणीची सुरवातीची फी भरून आम्हाला कॉलेजमध्ये घातले. त्यामुळेच आम्ही ग्रॅज्युएट झालो. मला पुढे एस.वाय.बी.कॉम.ला असतानाच एम्प्लॉयमेंट एक्‍स्चेंजद्वारे केंद्र सरकारची नोकरी मिळाली. याच नोकरीने मला संपूर्ण आयुष्यात खूप आधार दिला व अजूनही आहे. माझी दोन मुले म्हणजे मोठी मुलगी व धाकटा मुलगा दोघेही त्यांच्या वयाच्या चार महिन्यांपासून पाळणाघरात होते. ही गोष्ट थोडी फार उोशिपीशीं करण्याकरिता व मिस्टर व मुलांच्या आग्रहाखातर मी वयाच्या 51 व्या वर्षी त.ठ.ड. घेतली. मला रिटायर होऊन नऊ ते दहा वर्षे झाली. रिटायर झाल्यावर घरकाम व इतर छंदात वेळ छान जायचा; पण तीन वर्षांपूर्वी ऍक्‍सिडेंटमुळे झालेल्या हातापायाच्या दुखण्याने काही काळ काळजीत गेला. आता त्या दुखण्यातून मी सावरले आहे. दुखण्यादरम्यान मला माझ्या घरच्यांनी व आप्तस्वकीयांनी जी अनमोल सा
थ दिली, आधार दिला त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. आत्ता एकसष्ठीच्या उंबरठ्यावर असताना मी पूर्ण सुखी व समाधानी आहे. पण आजकाल आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी होत आहेत व जी आपल्या देशात, आपल्या राज्यात काय किंवा आपल्या पुणे शहरात परिस्थिती आहे ती फारच उद्‌वेगजनक आहे. मुलांची शाळा-कॉलेजमधील ऍडमिशनसाठची खेचाखेच, धावपळ, प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा, लांबलांबच्या नोकऱ्या, कामांचे जादा तास, नोकऱ्यांमधील अस्थिरता, तसेच अपघात, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, दहशत याबद्दलच्या बातम्या ऐकल्या की मन सुन्न होते. नोकरी-व्यवसायाला गेलेली आपली माणसं घरी येईपर्यंत काळजी वाटायला लागली आहे. पुणे शहर इतके दिवस सुरक्षित वाटत होते, ते त्याच्या सर्व क्षेत्रांतील कक्षा रुंदावल्यामुळे असुरक्षित झाले आहे. या सर्व गोष्टी कुठे जाऊन थांबणार याला अंतच नाही, या विचाराने जिवाची उलघाल होते. हे सगळे थांबण्यासाठी सध्या तरी काही उत्तर नाही असे वाटते. मरणाशिवाय यापासून सुटका नाही असे वाटून उतार वयात नैराश्‍य येते.

ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी, मी एकसष्ठीनिमित्त देवाजवळ हीच प्रार्थना करते, की आजची परिस्थिती बदलावी. आपले सरकार कडक होऊन त्यांचा राज्य कारभार स्वच्छ व्हावा, जेणेकरून आपले सर्वांचे जीवन सुसह्य व सुखी होईल. अशा पांढऱ्या, स्वच्छ कारभाराला पवित्र भगवी व मंगलमय हिरवी जोड असलेली किनार लाभू दे. अशा तिरंगी झेंड्याला आमचा ताठ मानेने सलाम असेल. ही आमची प्रबळ इच्छा आहे व त्या पहाटेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. सर्व वाईट गोष्टींची आहुती दिली जाईल, तेव्हाच माझ्यासारख्या साठीच्या लोकांची खऱ्या अर्थाने "साठी-शांत' होईल. त्यासाठी वेगळा यज्ञ किंवा होम-हवन करण्याची काहीच जरूर नाही...  

          लेखिका  
 नीलिमा प्र. रिसबूड         
   संदर्भ - इ-सकाळ  पेपर

Thursday, January 26, 2012

एका भाकरीची किंमत.........

एका भाकरीची किंमत
1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.

एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता. आक्राळ-विक्राळ डोंगररांगा पाहून छातीत धडधड चालू होती.

जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यामुळे वाघावळे गाव प्रसिद्ध आहे. शेजारी उचाट या गावी चंद्रराव मोरे यांचा राजवाडा आहे. त्याचे अवशेष पाहावयास मिळतात. कांदाट नदीवरून नाव पडलेले कांदाट गाव जवळच आहे. एकूण प्रदेश अतिदुर्गम अन्‌ हिरवागर्द. पूर्वी वाघांची वर्दळ या भागात होती, यावरून या गावास वाघावळे हे नाव पडले.

वाघावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव मोरे हे अगत्यशील व्यक्तिमत्त्व. विनयता आणि शालीनता हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. आलेल्यांचे आगत-स्वागत उत्तम प्रकारे करीत. वाघावळे येथे वसतिगृहयुक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

आम्ही तपासणीसाठी गेलो ते दिवस थंडीचे होते. नदीजवळ असल्यामुळे अधिकच गारवा लागत होता. माझी सोय वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात केली. रात्री जेवणानंतर पाणी प्यायल्याने हुडहुडी भरली. माझ्या सोबतीला एक शिक्षक होते. आम्ही स्वयंपाकघरातील चूल सतत पेटत ठेवली. लाकडे टाकत राहिलो. त्यामुळे अंगात ऊब येत होती. आम्ही शेकत-शेकत गप्पा मारीत होतो. खूप वेळ गेला. आता झोप येऊ लागली. आम्ही तेथेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी मला तापोळ्याला परत जायचे होते. साहेबांना तसे सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजता लॉंच होती. मी आवराआवर केली. पिशवी घेऊन मी निघालो, तोच माझ्यासोबतच्या शिक्षकांनी तिळाची चटणी आत भरलेली नाचणीची एक दुमडलेली भाकरी माझ्या पिशवीत घातली. ते म्हणाले "असू द्या, असू द्या; प्रवासात उपयोगी पडेल.'' पिशवी घेऊन बरोबर 10 वाजता नदीवर गेलो. लॉंच आली नव्हती. वाट बघत बसून राहिलो. माझ्याबरोबर तापोळ्यास जाण्यास फक्त एकच प्रवासी होता. झरेकर मामा. आम्ही दोघे लॉंचची वाट पाहत होतो. खूप वेळ गेला. लॉंच येण्याची लक्षणे दिसत नव्हती. दुपारचा एक वाजला. झरेकर मामांनी शिदोरी आणली होती. त्यांनी ती दह्याबरोबर खाल्ली. मला माझ्या पिशवीतील भाकरीची आठवण झाली. मी पिशवीतून भाकरी काढली. केवढे अप्रूप वाटले. मनातून शिक्षकाचे आभार मानले. नाचणीची भाकरी व तिळाची चटणी खाऊन नदीचे पाणी प्यालो. खूप तरतरी आली. मी निवांत झाडाखाली लॉंचची वाट पाहत राहिलो.

सकाळच्या लॉंचचा पंखा तुटल्यामुळे ती आली नाही. दुपारी 4 वाजता लॉंचची दुसरी फेरी आली. लॉंचचा आवाज आला अन्‌ माझ्या जिवात जीव आला. लॉंच किनाऱ्यावर लागली. लॉंचमधील 4-5 प्रवासी उतरले. वाघावळेच्या दिशेने चालू लागले. झरेकर मामा व मी लॉंचमध्ये बसलो. ठक्‌-ठक्‌-ठक्‌ लॉंच तापोळ्याच्या दिशेने सुरू झाली. ठिकठिकाणी प्रवासी लॉंचमध्ये बसत होते. लॉंच पुढे-पुढे जात होती. जंगल, पाणी, डोंगर झाडी मागे पडत होते. मी तापोळ्याला 5 वाजता पोचलो.

माझ्या मनात विचार चालू होते. त्या देव माणसाने माझ्या पिशवीत एक भाकरी व चटणी ठेवली नसती तर मला दिवसभर उपाशी राहावे लागले असते. भुकेने माझा जीव कासावीस होऊन गेला असता. एका भाकरीची किंमत मला त्या दिवशी कळली. मी त्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद दिले. हा प्रसंग मी कधीच विसरणे शक्‍य नाही.
                                                          लेखक - आर. जे. गायकवाड 
                                                          संधर्भ - सकाळ पेपर 

Wednesday, January 25, 2012

किती कठीण असतं

किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं.!♥♥

किती क्षणाचं आयुष्य असतं...

किती क्षणाचं आयुष्य असतं.......
आज असतं तर उद्या नसतं...........
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं............
कारण इथं कुणी कुणाच नसतं........
जाणारे दिवस जात असतात....
येणारे दिवस येतच असतात.................
जाणा-यांना जपायचं असतं....... ♥.......
येणा-यांना घडवायचं असत ............
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!!!!!!!!!

Tuesday, January 24, 2012

मराठ मोळी आई

मराठ मोळी आई

आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे

*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा•
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल•
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता•
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल•
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही•
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत. 
                                                               लेखक - अज्ञात

Monday, January 23, 2012

आत्ताच येताना एक माणूस भेटला.........

आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या'अवो'ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".

त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता.

तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्या कडे पाहून त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा म्हणत असणार,...

खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं--'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....

मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलू शकतं.....विचार करून पहा हवं तर..

                                                 (मूळ विचारवंताचे आभार ) 

प्रत्येकाच्या जीवनात.....

प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाच वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं
तर कोणी लपवत.
प्रेम लपत नसतं तसच दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.........

श्रीमंत आई-बापाची पोरगी....... .......

श्रीमंत आई-बापाची पोरगी.......
.......
खर सांगू देवा,
एक इच्छा माझी पूर्ण कर.
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर.
.
कारण आज-काल लग्नाच्या बाजारात,
पोरीच्या गुणापेक्षा,
आई-बापाच्या पैश्याला जास्त महत्व
आहे.
कितीही काही झाले तरी पोरगी मात्र
तोला-मोलाच्या घरातली हवी,
हे प्रत्येक वर पित्याचे तत्व आहे.
मग तूच सांग बर देवा आता,
गरीबाच्या पोरींचं काय बर होणार..?
आमची पण काही स्वप्न आहे कशी बर
ती पूर्ण होणार..?
.
काय गुन्हा देवा माझा गरीबाच्या घरी
जन्माला आले.
आई-बापाचे कष्ट वाटून घेतले,
घरासाठी राब राब राबले.
लोकाची काम करून शिक्षण माझे पूर्ण
केले.
गरीबीचे टाके शिवता शिवता,
चार चौघीनसारखे स्वताला बनवले.
स्वताच्या पायावर स्वत उभी राहिले.
पण तरी सुद्धा घर
आणि नोकरी दोनीहि नीट सांभाळत
राहिले.

आई
बापाच्या संस्काराला पुन्हा पुन्हा जपत
राहिले.
संस्कृतीच्या वरस्याला पुन्हा पुन्हा
जोपासत राहिले.
पण
तरी सुद्धा ह्या लोकांना
मी तोला-मोलाची कधी वाटलीच नाही.
कारण श्रीमंत आई
बापाच्या पोटी मी जन्मलीच नाही.
.
म्हणून सांगते देवा आता तरी मागण माझ
पूर्ण कर,
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर

पायाने अपंग असा एक भिकारी......

पायाने अपंग असा एक भिकारी सदेव
प्रसन्न आणि समाधानी होता.

त्याला कोणीतरी विचारले , " अरे बाबा , तू भिकारी आहेस,

लंगडासुद्धा आहेस , तुझ्याजवळ काहीही नाही
तरीसुद्धा तू इतका आनंदी असतो,
याचे कारण काय ? "

तो म्हणाला ,

" बाबूजी ! ईश्वराची कृपा कि मी आंधळा नाही.
मी चालू शकत नसलो ,तरी पाहू तर शकतो ना !
जे मला मिळाले नाही त्याबद्दल मी कधीही
ईश्वराकडे तक्रार करीत नाही;
पण जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद अवश्य देतो."

दुःखातही सुख शोधण्याची हीच तर कला आहे ...

Sunday, January 22, 2012

ती: तू माझ्याशी

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुलामाझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुलबोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'
                                   लेखक - अज्ञात 

शब्दच हरवले

शब्दच हरवले माझे
तरि प्रयत्न करतो  लिहिण्याचा,
ओठ मुके झाले माझे
तरि प्रयत्न करतो  तुला सांगण्याचा,
आता तर जगच हरवलय माझं
तरिही प्रयत्न करतो तुला शोधण्याचा..!!!!!
                                         लेखक - अज्ञात 

चांगले मित्र मिळवायला

मैत्री

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,

मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.

चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.

कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.

एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,

संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.

चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.

विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.

ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्या —
संदर्भ - मी मराठी असल्याचा अभिमान आहे 

प्रेम .....मराठीतील एक शब्द ..

प्रेम .....मराठीतील एक शब्द ...पण किती महत्व आहे ना या शब्दाला .....!

प्रत्येकाला प्रेम करायचं आहे , त्याला जवळ बोलावयाचय ....त्याच्या
कुशीत डोक ठेऊन शांतपणे झोपी जावस वाटत....अशा किती तरी भावना आपल्या
मनात निर्माण होतात ....
मग निसर्ग नियमाने माणूस प्रेमात पडतोही ....
काहींना प्रेमाचं सुख मिळत तर काहींना प्रेमभंगाचा चटका .....

मुलांना वाटत मुली वाईट असतात तर मुली कुठल्याही मुलावर विश्वास
ठेवायला तयार नसतात .....
खर तर मित्रांनो ....
मुलांचं प्रेम हे काल्पनिक असत तर मुलींचं वस्तूस्थितीवर आधारित .....
आणि दोघेही बरोबर असतात ...प्रश्न येतो सामोपचाराचा ...पण ते होत नाही..
प्रत्येकाला आपला ' स्व ' अन " भविष्य " महत्वाच वाटत ...अन मग
त्यामुळे कुठेतरी या गोष्टींचा भडका उडतोच अन मग प्रेमाची वाट लागते .......
...प्रेम अन प्रेमभंग ही एकाच रथाची दोन चाके आहेत..... एक चाक उचलून
हाताला काहीही लागत नाही .....प्रेमभंगाचा चटका मात्र सतत भेटतो....

याचा विचार करा .....
आणि
" एकांती डोहात बुडणे हा प्रेमरोगावरील रामबाण उपाय कधीच होऊ शकत नाही ".....
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे 

आयुष्यात प्रेम

"दाटून आलेल्या सायंकाली
अवचीत सोनेरी उन्ह पडत
असच कहीस पाऊल, न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत "

आठवण

आठवण तुझी आल्यावर, मन माझे स्वतःशिच बोलत बसते,
सगळ्यांमध्ये असून सुद्धा, एकटे मला करून जाते,
जसे वाऱ्या संगे, खोल दरीत उतरून जाते,
तर कधी उडता उडता ढगान मध्ये निसटून जाते, ...

तू सोबत नसतेसच, पण मन वेडे, तू
असल्याचा आभास मज करून जाते,
तू असशीलही कुठे तरी, म्हणून कदाचित मन वेडे सगळी कडे भटकत राहते.

किती कठीण असतं

किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!