Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Sunday, February 5, 2012

मुला मुलीची निखळ मैत्री

मुला मुलीची निखळ मैत्री :)

मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव,मध्येच सोडून जाऊ नकोस..

जीवनाच्या एका वळणावर भेट झाली आपली,,

एकमेकांना न बघताच मैत्री झाली आपली,

दिवसेंदिवस बहरत गेली मैत्री आपली,

खूप प्रेम केले मी आपल्या मैत्रीवर,, पण...,

plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस....

काही मित्र बियर पीत असतात,

काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
मुलगा : हो जानू घेणा.
... गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... ...बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तू वेड लागलाय कि तुला चडलीये ???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो रे???
मुलगा : सोडा न राव माझा मोबाईल कुठचा  ते सांगा 
आभार - अजिंक्य बनकर

Thursday, January 26, 2012

मैत्री जिवाभावाची..............

मैत्री जिवाभावाची
 
खरंच मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्‍या मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.

माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.

नंतर शाळेत आम्हा अगदी जवळच्या मैत्रिणींचा असा चौघींचा ग्रुप होता. शाळेत, शिकवणीला सगळीकडे आम्ही एकत्रच जायचो. आम्हाला कॉलेजसाठी आमच्या गावापासून महाडला जावे लागे. चौघी एकाच एसटीने जायचो. कॉलेजपासून अकाउंट्‌स क्‍लास गावात तीन ते चार किलोमीटर लांब होता. पण चौघी एकत्रच चालत जायचो. त्या काळी मुली टू-व्हीलर वापरत नव्हत्या. एकदा आम्ही गावात खरेदीला गेलो व परत घरी जायला म्हणून एस.टी. स्टॉपवर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझी छत्री हरवली आहे. खरंतर ती छत्री माझ्या चुलत बहिणीची होती. त्याने मला आणखीनच वाईट वाटले व रडू कोसळले. पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप धीर दिला. आम्ही सगळ्या परत जिथे जिथे गेलो होतो तिथे जाऊन आलो. अखेर एका दुकानात छत्री सापडली. त्या वेळचा मैत्रिणींचा आधार आजही फार मोलाचा वाटतो.

आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्‍लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.

नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्‍टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.

खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.

""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.'' 
 
लेखिका -     
प्राची कर्वे
संदर्भ - सकाळ पेपर  

Tuesday, January 24, 2012

"प्रियकर :- प्रेमात खरचच जादू असते,

"प्रियकर :- प्रेमात खरचच  जादू असते,
बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे
बोट
... करून प्रियकर म्हणतो :-
हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले
दिसतील :-) !!"

काही मित्र

काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते
का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ
कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड
माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय
कि तु चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू
तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल
आहे कोणाचा ???
"हर एक फ्रेंड कामिना होता है":)))

Sunday, January 22, 2012

खतरनाक प्रपोज....!!!

खतरनाक प्रपोज....!!!

मुलगा- तु फक्त हो म्हण,
सगळ्यांची वाट लावतो....
मुलगी- अय्या खरंच...??
मुलगा- हो खरंच.
.
.
.
.
.
.
.
आणि तु फक्त नाय म्हण.....
.
तुझी पण वाट लावतो...!

ती: तू माझ्याशी

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुलामाझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुलबोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'
                                   लेखक - अज्ञात 

शब्दच हरवले

शब्दच हरवले माझे
तरि प्रयत्न करतो  लिहिण्याचा,
ओठ मुके झाले माझे
तरि प्रयत्न करतो  तुला सांगण्याचा,
आता तर जगच हरवलय माझं
तरिही प्रयत्न करतो तुला शोधण्याचा..!!!!!
                                         लेखक - अज्ञात 

एक हळवी आठवण

एक हळवी आठवण
एक हळवी आठवण
मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना
हृदयात खोलवर रुतलेली |
आसवांची एक माळ
डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती
आता दूरवर पांगलेली |
स्वप्नांची एक पालखी
अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती
आता एकांताला सारवलेली |
पुन्हा तीच भावना
नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई
आज पुन्हा त्यावर सांडलेली
                            लेखक - अज्ञात 

चांगले मित्र मिळवायला

मैत्री

चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.

तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,

मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.

चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.

भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.

कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.

प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.

एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.

कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,

संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.

एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.

चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.

पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.

विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.

ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्या —
संदर्भ - मी मराठी असल्याचा अभिमान आहे 

काही मिळवण्यापेक्षा

काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच
असते,बंद डोळ्यांनी कुणाची आठवण
करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता...
खरंच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते..

परिचयातुन जुळते ती मैत्री..

परिचयातुन जुळते ती मैत्री....
विश्वासाने जपते ती मैत्री...
सुखात साथ मागते , आणि दुःखात साथदेते ती मैत्री....
चुकावर रागवते ती ,...यशावर सुखावते ती मैत्री.....,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री......
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री.....
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्रीँ !!

असे वेगळे नाते का म्हणून

खुप interesting गोष्ट आहे मित्रांनो, नक्की वाचा

एक जन एकाला फोन करतो,
३ वाजता चौपाटीवर सगळ्यांनी भेटायचे ठरवतो,
पण आम्ही सगळेच "भारतीय" असतो,
....५ वाजता अगदी न चुकता पोहचतो.
जमतो सगळा मित्रमैत्रीनींचा थवा अन,
हसून,खिदळून आम्ही आसमंत हलवतो,

मग कुणी तरी एक जन दगडावर चढतो,
Titanic ची पोज देऊन आकाशाकढे बघतो,
महागडा मोबाईलचा 5megapixel कॅमेरा बाहेर पडतो,
Facebook वरच्या अल्बम साठी जो तो हातभार लावतो,

मित्र मैत्रिणींचा हात एकमेकांच्या खांद्यावर पडतो,
बिचारा तो एकजण....कॅमेरामन बनतो,
दया येऊन त्याची...कुणीतरी मग "त्याग" करतो,
कॅमेरामन फोटोत जातो अन फोटोतला दुसरा ....बिचारा बनतो.

उजवीकडचा मध्ये येतो,मधला डावीकडे जातो,
लवकर लक्षात आले तर ठीक.....नाहीतर बिचारा बराच वेळ बिचाराच राहतो.
घरी जाताना ब्लुटूथ ON होतो,एक एक फोटो प्रत्तेक मोबाईल मध्ये येतो,
दुसऱ्या दिवशी अल्बम आम्ही Facebook वर टांगतो,
"आम्ही चौपाटीवर गेलेलो"...हे अख्या जगाला सांगतो.

पण एकत्र फिरलो,हसलो,एकमेकांशी खूप वेळ बोललो कि,आपण चांगले "मित्र-मैत्रीण" झालो...असे असते का???..नाही.
"मैत्री" कोणती?????......"मैत्री" म्हणजे ती....जी जवळ नसून पण नकळत जवळ असते.
एकमेकांशी रोज बोललो नाही तरी चालेल..पण त्या मित्राची/मैत्रिणीची एखादी आनंदाची खबर ऐकल्यावर मनाच्या खोलवरून जो आनंद होतो ना....ती मैत्री.

"पती/पत्नी" आणि "प्रियकर/प्रेयसी" या सगळ्यांपासून वेगळे.... "मैत्री" असे वेगळे नाते का म्हणून निर्माण झाले असेल????

हे जगातले एक शाश्वत सत्य वाटते.....कि....
"तुमचे तुमच्या प्रेयसीवर किंवा प्रियकरावर अथवा आईवडिलांवर कितीही खरे पेम असले
तरी.......................
आयुष्यात काही गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीला,पतीला,आईवडिलांना,प्रेयसीला,प्रियकराला नाही सांगू शकत,
पण त्याच गोष्टी "मित्राला किंवा मैत्रिणीला" सांगू शकता....आणि तेही न मागची पुढची कसलीही तमा ना बाळगता...."
"कसा आहेस किंवा कशी आहेस?" ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरोखरच तिथे थांबणारी...आणि खरंच त्या उत्तरात Interested असणारी....ती खरी "मैत्री"
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे