Showing posts with label जीवन. Show all posts
Showing posts with label जीवन. Show all posts

Thursday, January 26, 2012

मैत्री जिवाभावाची..............

मैत्री जिवाभावाची
 
खरंच मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्‍या मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.

माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.

नंतर शाळेत आम्हा अगदी जवळच्या मैत्रिणींचा असा चौघींचा ग्रुप होता. शाळेत, शिकवणीला सगळीकडे आम्ही एकत्रच जायचो. आम्हाला कॉलेजसाठी आमच्या गावापासून महाडला जावे लागे. चौघी एकाच एसटीने जायचो. कॉलेजपासून अकाउंट्‌स क्‍लास गावात तीन ते चार किलोमीटर लांब होता. पण चौघी एकत्रच चालत जायचो. त्या काळी मुली टू-व्हीलर वापरत नव्हत्या. एकदा आम्ही गावात खरेदीला गेलो व परत घरी जायला म्हणून एस.टी. स्टॉपवर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझी छत्री हरवली आहे. खरंतर ती छत्री माझ्या चुलत बहिणीची होती. त्याने मला आणखीनच वाईट वाटले व रडू कोसळले. पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप धीर दिला. आम्ही सगळ्या परत जिथे जिथे गेलो होतो तिथे जाऊन आलो. अखेर एका दुकानात छत्री सापडली. त्या वेळचा मैत्रिणींचा आधार आजही फार मोलाचा वाटतो.

आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्‍लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.

नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्‍टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.

खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.

""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.'' 
 
लेखिका -     
प्राची कर्वे
संदर्भ - सकाळ पेपर  

एका भाकरीची किंमत.........

एका भाकरीची किंमत
1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.

एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता. आक्राळ-विक्राळ डोंगररांगा पाहून छातीत धडधड चालू होती.

जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यामुळे वाघावळे गाव प्रसिद्ध आहे. शेजारी उचाट या गावी चंद्रराव मोरे यांचा राजवाडा आहे. त्याचे अवशेष पाहावयास मिळतात. कांदाट नदीवरून नाव पडलेले कांदाट गाव जवळच आहे. एकूण प्रदेश अतिदुर्गम अन्‌ हिरवागर्द. पूर्वी वाघांची वर्दळ या भागात होती, यावरून या गावास वाघावळे हे नाव पडले.

वाघावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव मोरे हे अगत्यशील व्यक्तिमत्त्व. विनयता आणि शालीनता हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. आलेल्यांचे आगत-स्वागत उत्तम प्रकारे करीत. वाघावळे येथे वसतिगृहयुक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

आम्ही तपासणीसाठी गेलो ते दिवस थंडीचे होते. नदीजवळ असल्यामुळे अधिकच गारवा लागत होता. माझी सोय वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात केली. रात्री जेवणानंतर पाणी प्यायल्याने हुडहुडी भरली. माझ्या सोबतीला एक शिक्षक होते. आम्ही स्वयंपाकघरातील चूल सतत पेटत ठेवली. लाकडे टाकत राहिलो. त्यामुळे अंगात ऊब येत होती. आम्ही शेकत-शेकत गप्पा मारीत होतो. खूप वेळ गेला. आता झोप येऊ लागली. आम्ही तेथेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी मला तापोळ्याला परत जायचे होते. साहेबांना तसे सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजता लॉंच होती. मी आवराआवर केली. पिशवी घेऊन मी निघालो, तोच माझ्यासोबतच्या शिक्षकांनी तिळाची चटणी आत भरलेली नाचणीची एक दुमडलेली भाकरी माझ्या पिशवीत घातली. ते म्हणाले "असू द्या, असू द्या; प्रवासात उपयोगी पडेल.'' पिशवी घेऊन बरोबर 10 वाजता नदीवर गेलो. लॉंच आली नव्हती. वाट बघत बसून राहिलो. माझ्याबरोबर तापोळ्यास जाण्यास फक्त एकच प्रवासी होता. झरेकर मामा. आम्ही दोघे लॉंचची वाट पाहत होतो. खूप वेळ गेला. लॉंच येण्याची लक्षणे दिसत नव्हती. दुपारचा एक वाजला. झरेकर मामांनी शिदोरी आणली होती. त्यांनी ती दह्याबरोबर खाल्ली. मला माझ्या पिशवीतील भाकरीची आठवण झाली. मी पिशवीतून भाकरी काढली. केवढे अप्रूप वाटले. मनातून शिक्षकाचे आभार मानले. नाचणीची भाकरी व तिळाची चटणी खाऊन नदीचे पाणी प्यालो. खूप तरतरी आली. मी निवांत झाडाखाली लॉंचची वाट पाहत राहिलो.

सकाळच्या लॉंचचा पंखा तुटल्यामुळे ती आली नाही. दुपारी 4 वाजता लॉंचची दुसरी फेरी आली. लॉंचचा आवाज आला अन्‌ माझ्या जिवात जीव आला. लॉंच किनाऱ्यावर लागली. लॉंचमधील 4-5 प्रवासी उतरले. वाघावळेच्या दिशेने चालू लागले. झरेकर मामा व मी लॉंचमध्ये बसलो. ठक्‌-ठक्‌-ठक्‌ लॉंच तापोळ्याच्या दिशेने सुरू झाली. ठिकठिकाणी प्रवासी लॉंचमध्ये बसत होते. लॉंच पुढे-पुढे जात होती. जंगल, पाणी, डोंगर झाडी मागे पडत होते. मी तापोळ्याला 5 वाजता पोचलो.

माझ्या मनात विचार चालू होते. त्या देव माणसाने माझ्या पिशवीत एक भाकरी व चटणी ठेवली नसती तर मला दिवसभर उपाशी राहावे लागले असते. भुकेने माझा जीव कासावीस होऊन गेला असता. एका भाकरीची किंमत मला त्या दिवशी कळली. मी त्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद दिले. हा प्रसंग मी कधीच विसरणे शक्‍य नाही.
                                                          लेखक - आर. जे. गायकवाड 
                                                          संधर्भ - सकाळ पेपर 

Wednesday, January 25, 2012

"या जगात

"या जगात रोज जन्मुन मरणा-या असंख्य किटकांप्रमाणे जीवन जगण्यासाठी माझा जन्म नाही.
माझ्या कोकणच्या भुमीच्या माझ्याकडुन काही अपेक्षा आहेत
आणि
त्या पुर्ण करुन तिचे ऋण फेडण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन...

कोणताच देश परिपुर्ण असु शकत नाही,
त्याला परिपुर्ण बनवाव लागत...

कोणताही सामान्य माणुस तोपर्यँत सामान्यच राहतो जोपर्यँत तो स्वतःला कमजोर समजत असतो.
जेव्हा आपल पुर्ण कर्तुत्व पणाला लावुन तो जगात उतरतो तेव्हा कोणतीच ताकद त्याला असामान्य बनण्यापासुन रोखु शकत नाही.

हिटलरला मी देव मानतो कारण फुटपाथवर राहणारा एक सामान्य पोरगा देशभक्तीने पेटुन उठला आणि आपल्या कर्तुत्वावर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष बनुन असामान्य झाला.
हिटलरने आपली ताकद ओळखली होती.
आज आपणा सर्वाँना ती ओळखायची गरज आहे कारण त्यातच आपल्या देशाच भविष्य लपलय.

आपण निवडुन दिलेले नेते आपले नोकर आहेत आणि जनता मालक असल्याने त्यांच्याकडुन काम करुन घेण आपल कर्तव्य बनत आणि ते कुठे चुकत असतील तर त्यावर टिका करण हा आपला मुलभुत अधिकार आहे.

मेँढरांप्रमाणे किँवा डोळ्यांवर झापड लावुन धावणा-या घोड्यांप्रमाणे आपले वर्तन असता कामा नये.
देशाकडे डोळसपणे पहायला शिका.
इतिहासाचा अभ्यास महत्वाचा आहे कारण त्यामुळेच प्रगतीची दिशा ठरवता येते.
काँग्रेसचे लोक आपल्या राजकरणासाठी गांधीना "महात्मा" बनवतात आणि आपण मुर्ख बनतो ही व्रुत्ती कुठेतरी थांबवा.

मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही कारण सगळेच पक्ष स्वार्थी आणि भ्रष्ट आहेत.

"कोकण" माझ पहिल प्रेम आहे.
काही राजकरणी लोक स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मायनिँग करुन तसेच जैतापुर सारख्या प्रदुषणकारी प्रकल्पाला पाठिँबा देत कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचा सत्यानाश करण्याच्या तयारीत आहेत.
कोकणला त्यांच्या तावडीतुन वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे मग भले त्यात माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल तरी मला पर्वा नाही कारण माझ्या जन्मभुमीवर मी जिवापाड प्रेम करतो.
भगतसिँगांसारख्या क्रांतिकारकांनी देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारली मग मी तरी जीवाच्या भितीने या राजकरण्यांच्या अत्याचारांना का म्हणुन भिक घालु...???

आता आमच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागलाय.
मायनिँग आणि जैतापुर प्रकल्प वेळीच थांबवला गेला नाही तर सिँधुदुर्गातुन "दुसरा हिटलर" तयार होईल एवढ निश्चित...!!!

"I'm a LOVER,
Not a FIGHTER...
But I fight for,
What I love...!!!"
                                  आभार - मंजिरी गवांदे

किती कठीण असतं

किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं.!♥♥

किती क्षणाचं आयुष्य असतं...

किती क्षणाचं आयुष्य असतं.......
आज असतं तर उद्या नसतं...........
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं............
कारण इथं कुणी कुणाच नसतं........
जाणारे दिवस जात असतात....
येणारे दिवस येतच असतात.................
जाणा-यांना जपायचं असतं....... ♥.......
येणा-यांना घडवायचं असत ............
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!!!!!!!!!

Monday, January 23, 2012

आत्ताच येताना एक माणूस भेटला.........

आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या'अवो'ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".

त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता.

तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्या कडे पाहून त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा म्हणत असणार,...

खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं--'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....

मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलू शकतं.....विचार करून पहा हवं तर..

                                                 (मूळ विचारवंताचे आभार ) 

प्रत्येकाच्या जीवनात.....

प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाच वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं
तर कोणी लपवत.
प्रेम लपत नसतं तसच दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.........

श्रीमंत आई-बापाची पोरगी....... .......

श्रीमंत आई-बापाची पोरगी.......
.......
खर सांगू देवा,
एक इच्छा माझी पूर्ण कर.
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर.
.
कारण आज-काल लग्नाच्या बाजारात,
पोरीच्या गुणापेक्षा,
आई-बापाच्या पैश्याला जास्त महत्व
आहे.
कितीही काही झाले तरी पोरगी मात्र
तोला-मोलाच्या घरातली हवी,
हे प्रत्येक वर पित्याचे तत्व आहे.
मग तूच सांग बर देवा आता,
गरीबाच्या पोरींचं काय बर होणार..?
आमची पण काही स्वप्न आहे कशी बर
ती पूर्ण होणार..?
.
काय गुन्हा देवा माझा गरीबाच्या घरी
जन्माला आले.
आई-बापाचे कष्ट वाटून घेतले,
घरासाठी राब राब राबले.
लोकाची काम करून शिक्षण माझे पूर्ण
केले.
गरीबीचे टाके शिवता शिवता,
चार चौघीनसारखे स्वताला बनवले.
स्वताच्या पायावर स्वत उभी राहिले.
पण तरी सुद्धा घर
आणि नोकरी दोनीहि नीट सांभाळत
राहिले.

आई
बापाच्या संस्काराला पुन्हा पुन्हा जपत
राहिले.
संस्कृतीच्या वरस्याला पुन्हा पुन्हा
जोपासत राहिले.
पण
तरी सुद्धा ह्या लोकांना
मी तोला-मोलाची कधी वाटलीच नाही.
कारण श्रीमंत आई
बापाच्या पोटी मी जन्मलीच नाही.
.
म्हणून सांगते देवा आता तरी मागण माझ
पूर्ण कर,
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर

पायाने अपंग असा एक भिकारी......

पायाने अपंग असा एक भिकारी सदेव
प्रसन्न आणि समाधानी होता.

त्याला कोणीतरी विचारले , " अरे बाबा , तू भिकारी आहेस,

लंगडासुद्धा आहेस , तुझ्याजवळ काहीही नाही
तरीसुद्धा तू इतका आनंदी असतो,
याचे कारण काय ? "

तो म्हणाला ,

" बाबूजी ! ईश्वराची कृपा कि मी आंधळा नाही.
मी चालू शकत नसलो ,तरी पाहू तर शकतो ना !
जे मला मिळाले नाही त्याबद्दल मी कधीही
ईश्वराकडे तक्रार करीत नाही;
पण जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद अवश्य देतो."

दुःखातही सुख शोधण्याची हीच तर कला आहे ...

Sunday, January 22, 2012

शब्दच हरवले

शब्दच हरवले माझे
तरि प्रयत्न करतो  लिहिण्याचा,
ओठ मुके झाले माझे
तरि प्रयत्न करतो  तुला सांगण्याचा,
आता तर जगच हरवलय माझं
तरिही प्रयत्न करतो तुला शोधण्याचा..!!!!!
                                         लेखक - अज्ञात 

प्रेमाचा छंद

"निसर्गाला रंग हवा असतो
फुलला गंध हवा असतो ,
  माणूसही एकटा कसा राहणार
त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो "

एकटी

एकटी

हि कथा आहे निकिता आणि संजयची.....आज सात वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर आनंदओसंडून वाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला ते सांगायची हिम्मत केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पण बंद झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि निकिताच्या सर्व अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला कुणाची मदत पण नाही मिळाली. आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळाल होत कि आपले सर्व शाळेतले मित्र-मैत्रिणी facebook वर आहेत. म्हणून तिनेही सर्च केल आणितिला आज संजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणितिने संजयला भेटायला बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पण तुझ झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला?
           आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे

किती कठीण असतं

किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!