Thursday, January 26, 2012

मैत्री जिवाभावाची..............

मैत्री जिवाभावाची
 
खरंच मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्‍या मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.

माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.

नंतर शाळेत आम्हा अगदी जवळच्या मैत्रिणींचा असा चौघींचा ग्रुप होता. शाळेत, शिकवणीला सगळीकडे आम्ही एकत्रच जायचो. आम्हाला कॉलेजसाठी आमच्या गावापासून महाडला जावे लागे. चौघी एकाच एसटीने जायचो. कॉलेजपासून अकाउंट्‌स क्‍लास गावात तीन ते चार किलोमीटर लांब होता. पण चौघी एकत्रच चालत जायचो. त्या काळी मुली टू-व्हीलर वापरत नव्हत्या. एकदा आम्ही गावात खरेदीला गेलो व परत घरी जायला म्हणून एस.टी. स्टॉपवर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझी छत्री हरवली आहे. खरंतर ती छत्री माझ्या चुलत बहिणीची होती. त्याने मला आणखीनच वाईट वाटले व रडू कोसळले. पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप धीर दिला. आम्ही सगळ्या परत जिथे जिथे गेलो होतो तिथे जाऊन आलो. अखेर एका दुकानात छत्री सापडली. त्या वेळचा मैत्रिणींचा आधार आजही फार मोलाचा वाटतो.

आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्‍लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.

नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्‍टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.

खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.

""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.'' 
 
लेखिका -     
प्राची कर्वे
संदर्भ - सकाळ पेपर  

एका भाकरीची किंमत.........

एका भाकरीची किंमत
1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.

एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता. आक्राळ-विक्राळ डोंगररांगा पाहून छातीत धडधड चालू होती.

जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यामुळे वाघावळे गाव प्रसिद्ध आहे. शेजारी उचाट या गावी चंद्रराव मोरे यांचा राजवाडा आहे. त्याचे अवशेष पाहावयास मिळतात. कांदाट नदीवरून नाव पडलेले कांदाट गाव जवळच आहे. एकूण प्रदेश अतिदुर्गम अन्‌ हिरवागर्द. पूर्वी वाघांची वर्दळ या भागात होती, यावरून या गावास वाघावळे हे नाव पडले.

वाघावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव मोरे हे अगत्यशील व्यक्तिमत्त्व. विनयता आणि शालीनता हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. आलेल्यांचे आगत-स्वागत उत्तम प्रकारे करीत. वाघावळे येथे वसतिगृहयुक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

आम्ही तपासणीसाठी गेलो ते दिवस थंडीचे होते. नदीजवळ असल्यामुळे अधिकच गारवा लागत होता. माझी सोय वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात केली. रात्री जेवणानंतर पाणी प्यायल्याने हुडहुडी भरली. माझ्या सोबतीला एक शिक्षक होते. आम्ही स्वयंपाकघरातील चूल सतत पेटत ठेवली. लाकडे टाकत राहिलो. त्यामुळे अंगात ऊब येत होती. आम्ही शेकत-शेकत गप्पा मारीत होतो. खूप वेळ गेला. आता झोप येऊ लागली. आम्ही तेथेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी मला तापोळ्याला परत जायचे होते. साहेबांना तसे सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजता लॉंच होती. मी आवराआवर केली. पिशवी घेऊन मी निघालो, तोच माझ्यासोबतच्या शिक्षकांनी तिळाची चटणी आत भरलेली नाचणीची एक दुमडलेली भाकरी माझ्या पिशवीत घातली. ते म्हणाले "असू द्या, असू द्या; प्रवासात उपयोगी पडेल.'' पिशवी घेऊन बरोबर 10 वाजता नदीवर गेलो. लॉंच आली नव्हती. वाट बघत बसून राहिलो. माझ्याबरोबर तापोळ्यास जाण्यास फक्त एकच प्रवासी होता. झरेकर मामा. आम्ही दोघे लॉंचची वाट पाहत होतो. खूप वेळ गेला. लॉंच येण्याची लक्षणे दिसत नव्हती. दुपारचा एक वाजला. झरेकर मामांनी शिदोरी आणली होती. त्यांनी ती दह्याबरोबर खाल्ली. मला माझ्या पिशवीतील भाकरीची आठवण झाली. मी पिशवीतून भाकरी काढली. केवढे अप्रूप वाटले. मनातून शिक्षकाचे आभार मानले. नाचणीची भाकरी व तिळाची चटणी खाऊन नदीचे पाणी प्यालो. खूप तरतरी आली. मी निवांत झाडाखाली लॉंचची वाट पाहत राहिलो.

सकाळच्या लॉंचचा पंखा तुटल्यामुळे ती आली नाही. दुपारी 4 वाजता लॉंचची दुसरी फेरी आली. लॉंचचा आवाज आला अन्‌ माझ्या जिवात जीव आला. लॉंच किनाऱ्यावर लागली. लॉंचमधील 4-5 प्रवासी उतरले. वाघावळेच्या दिशेने चालू लागले. झरेकर मामा व मी लॉंचमध्ये बसलो. ठक्‌-ठक्‌-ठक्‌ लॉंच तापोळ्याच्या दिशेने सुरू झाली. ठिकठिकाणी प्रवासी लॉंचमध्ये बसत होते. लॉंच पुढे-पुढे जात होती. जंगल, पाणी, डोंगर झाडी मागे पडत होते. मी तापोळ्याला 5 वाजता पोचलो.

माझ्या मनात विचार चालू होते. त्या देव माणसाने माझ्या पिशवीत एक भाकरी व चटणी ठेवली नसती तर मला दिवसभर उपाशी राहावे लागले असते. भुकेने माझा जीव कासावीस होऊन गेला असता. एका भाकरीची किंमत मला त्या दिवशी कळली. मी त्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद दिले. हा प्रसंग मी कधीच विसरणे शक्‍य नाही.
                                                          लेखक - आर. जे. गायकवाड 
                                                          संधर्भ - सकाळ पेपर 

पद्म पुरस्कारांवरील महाराष्ट्राचे वर्चस्व .........

 पद्म पुरस्कारांवरील महाराष्ट्राचे वर्चस्व

पद्मविभूषण
1) के. जी. सुब्रह्मण्यम - चित्रकला-शिल्पकला - पश्‍चिम बंगाल
2) दिवंगत मारिओ मिरांडा - व्यंगचित्रकला - गोवा
3) भूपेन हजारिका - संगीत - आसाम
4) डॉ. के. एच. संचेती - वैद्यकीय - महाराष्ट्र
5) टी. व्ही राजेश्‍वर - प्रशासकीय सेवा - नवी दिल्ली

पद्मभूषण
1) अभिनेत्री शबाना आझमी - चित्रपट - महाराष्ट्र
2) खालेद चौधरी - नाट्य - पश्‍चिम बंगाल
3) जतीन दास - चित्रकला - दिल्ली
4) पंडित बुद्धदेव दासगुप्ता - वाद्यसंगीत (सरोद) - पश्‍चिम बंगाल
5) अभिनेता धर्मेंद्र - चित्रपट - महाराष्ट्र
6) डॉ. त्रिपुनित्वरा विश्‍वनाथन गोपालकृष्णन - अभिजात संगीत - तमिळनाडू
7) मीरा नायर - चित्रपट - दिल्ली
8) एम. एस. गोपालकृष्णन - वाद्यसंगीत (व्हायोलिन) - तमिळनाडू
9) अनीश कपूर - शिल्पकला - ब्रिटन
10) सत्यनारायण गोएंका - सामाजिक कार्य - महाराष्ट्र
11) डॉ. पतिबंदला चंद्रशेखर राव - सार्वजनिक क्षेत्र - जर्मनी
12) जॉर्ज यॉंग-बून येव - सार्वजनिक क्षेत्र - सिंगापूर
13) प्रा. शशिकुमार चित्रे - विज्ञान आणि अभियांत्रिकी - महाराष्ट्र
14) डॉ. एम. एस. रघुनाथन - विज्ञान आणि अभियांत्रिकी - महाराष्ट्र
15) सुबैया मुरुगप्पा वेल्लायन - व्यापार आणि उद्योग - तमिळनाडू
16) बालसुब्रह्मण्यम मुतुरामन - व्यापार आणि उद्योग - महाराष्ट्र
17) डॉ. सुरेश अडवानी - वैद्यकीय - महाराष्ट्र
18) डॉ. नोशिर एच. वाडिया - वैद्यकीय - महाराष्ट्र
19) डॉ. देवीप्रसाद शेट्टी - वैद्यकीय - कर्नाटक
20) - प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार - साहित्य व शैक्षणिक - महाराष्ट्र
21)- प्रा. विद्या दहेजिया - साहित्य व शैक्षणिक - अमेरिका
22) प्रा. अरविंद पनगारिया - साहित्य व शैक्षणिक - अमेरिका
23) डॉ. जोस परेरिया - साहित्य व शैक्षणिक - अमेरिका
24) डॉ. होमी के. भाभा - साहित्य व शैक्षणिक - ब्रिटन
25) एन. विठ्ठल - प्रशासकीय सेवा - केरळ
26) माताप्रसाद - प्रशासकीय सेवा - उत्तर प्रदेश
27) रोनेन सेन - प्रशासकीय सेवा - पश्‍चिम बंगाल

पद्मश्री
1) वनराज भाटिया - संगीत - महाराष्ट्र
2) झिया फक्रुद्दीन डागर - अभिजात संगीत - महाराष्ट्र
3) श्रीमती नामेईरकपम इबेम्नी देवी - संगीत - मणिपूर
4) रामचंद्र सुब्रया हेगडे चिट्टनी - नृत्य (यक्षगान) - कर्नाटक
5) मोतीलाल केम्मू - नाट्यलेखन - जम्मू-काश्‍मीर
6) शाहीद परवेझ खान - वाद्यसंगीत(सतार) - महाराष्ट्र
7) मोहनलाल कुम्हार - टेराकोट्टा - राजस्थान
8) सकर खान मंगनियार लोकसंगीत - राजस्थान
9) श्रीमती जॉय मायकेल - नाट्य - दिल्ली
10) डॉ. मिनती मिश्रा - शास्त्रीय नृत्य - ओरिसा
11)- नाटेसन मुथुस्वामी - नाट्य - तमिळनाडू
12) श्रीमती आर. नागरत्नम - नाट्य - कर्नाटक
13) कलामंडलम सिवन नम्बूतिरी - शास्त्रीय नृत्य - केरळ
14) श्रीमती यमुनाबाई वाईकर - लोककला (लावणी) - महाराष्ट्र
15) सतीश आळेकर - नाट्यलेखन - महाराष्ट्र
16) पंडित गोपाळप्रसाद दुबे - नृत्य - झारखंड
17) रमाकांत गुंदेचा-उमाकांत गुंदेचा - अभिजात संगीत - मध्य प्रदेश
18) अनुप जलोटा - अभिजात संगीत - महाराष्ट्र
19) सोमण नायर प्रियदर्शन - चित्रपट दिग्दर्शन - केरळ
20) सुनील जाना - छायाचित्रण - आसाम
21) लैला तय्यबजी - हस्तकला - दिल्ली
22) विजय शर्मा - चित्रकला - हिमाचल प्रदेश
23) शमशाद बेगम - सामाजिक कार्य - छत्तीसगढ
24) श्रीमती रीता देवी - सामाजिक कार्य - दिल्ली
25) डॉ. पी. के. गोपाल - सामाजिक कार्य - तमिळनाडू
26) श्रीमती फूलबसनबाई यादव - सामाजिक कार्य - छत्तीसगढ
27) डॉ. जी. मणिरत्नम - सामाजिक कार्य - आंध्र प्रदेश
28) निरंजन प्राणशंकर पंड्या - सामाजिक कार्य - महाराष्ट्र
29) डॉ. उमा तुली - सामाजिक कार्य - दिल्ली
30) सत पॉल वर्मा - सामाजिक कार्य - जम्मू-काश्‍मीर
31) श्रीमती बिन्नी यंगा - सामाजिक कार्य - अरुणाचल प्रदेश
32) येझदी हिरजी मालेगाम - सार्वजनिक क्षेत्र - महाराष्ट्र
33) प्रवीण एच. पारेख - सार्वजनिक क्षेत्र - दिल्ली
34) डॉ. व्ही. अदिमूर्ती - विज्ञान व अभियांत्रिकी - केरळ
35) डॉ. कृष्णलाल चढ्ढा - विज्ञान व अभियांत्रिकी (कृषी) - दिल्ली
36) प्रा. वीरेंद्रसिंग चौहान - विज्ञान व अभियांत्रिकी - दिल्ली
37) प्रा. रामेश्‍वरनाथ कौल बामझाई - विज्ञान व अभियांत्रिकी - जम्मू-काश्‍मीर
38) डॉ. विजयपाल सिंह - विज्ञान व अभियांत्रिकी (कृषिसंशोधन) - उत्तर प्रदेश
39) डॉ. लोकेशकुमार सिंघल - विज्ञान व अभियांत्रिकी - पंजाब
40) डॉ. यज्ञस्वामी सुंदरराजन - विज्ञान व अभियांत्रिकी - कर्नाटक
41) प्रा. जगदीश शुक्‍ला - विज्ञान व अभियांत्रिकी - अमेरिका
42) श्रीमती प्रिया पॉल - व्यापार व उद्योग - दिल्ली
43) शोजी शिबा - व्यापार व उद्योग - जपान
44) गोपीनाथ पिल्ले - व्यापार व उद्योग - सिंगापूर
45) अरुण फिरोदिया - व्यापार व उद्योग - महाराष्ट्र
46) डॉ. स्वाती पिरामल - व्यापार व उद्योग - महाराष्ट्र
47) प्रा. मेहदी हसन - वैद्यकीय - उत्तर प्रदेश
48) डॉ. विश्‍वनाथन मोहन - वैद्यकीय - तमिळनाडू
49) डॉ. जे. हरींद्रन नायर - वैद्यकीय (आयुर्वेदिक) - केरळ
50) डॉ. वल्लालरपुरम सेन्नीमलाई नटराजन - वैद्यकीय - तमिळनाडू
51) डॉ. जितेंद्रकुमार सिंह - वैद्यकीय - बिहार
52) डॉ. श्रीनिवास वैश्‍य - वैद्यकीय - दमण आणि दिव
53) डॉ. नित्यानंद - वैद्यकीय - उत्तर प्रदेश
54) डॉ. युगकिशोर - वैद्यकीय (होमिओपथी) - दिल्ली
55) डॉ. मुकेश बात्रा - वैद्यकीय - महाराष्ट्र
56) डॉ. इबेरहार्ड फिश्‍चर - साहित्य व शैक्षणिक - स्वित्झर्लंड
57) केदार गुरंग - साहित्य व शैक्षणिक - सिक्कीम
58) सुरजितसिंग पतार - साहित्य व शैक्षणिक - (कवी) पंजाब
59) विजयदत्त श्रीधर - साहित्य व शैक्षणिक (पत्रकार) - मध्य प्रदेश
60) आयर्विन ऍलन सीली - साहित्य व शैक्षणिक - उत्तराखंड
61) श्रीमती गीता धर्मराजन - साहित्य व शैक्षणिक - दिल्ली
62) प्रा. सच्चिदानंद सहाय - साहित्य व शैक्षणिक - हरियाना
63) पपिता सेठ - साहित्य व शैक्षणिक - केरळ
64) डॉ. राल्ते थन्माविया - साहित्य व शैक्षणिक - मिझोराम
65) अजित बजाज - क्रीडा (स्कीइंग) - दिल्ली
66) श्रीमती झूलन गोस्वामी - क्रीडा (क्रिकेट) - पश्‍चिम बंगाल
67) जफर इक्‍बाल - क्रीडा (हॉकी) - उत्तर प्रदेश
68) देवेंद्र झाजरिजा - क्रीडा (ऍथलेटिक्‍स-पॅरालिम्पिक्‍स) - राजस्थान
69) लिंबाराम - क्रीडा (तिरंदाजी) - राजस्थान
70) सईद महमंद अरीफ - क्रीडा (बॅडमिंटन) - आंध्र प्रदेश
71) प्रा. रवी चतुर्वेदी - क्रीडा (कॉमेंट्री) - दिल्ली
72) प्रभाकर वैद्य - क्रीडा (शारीरिक शिक्षण) - महाराष्ट्र
73) टी. व्यंकटपथी रेड्डीअर - फलोत्पादन - पुदुच्चेरी
74) डॉ. के उल्लास कारंथ - वन्यजीव संवर्धन व पर्यावरण संरक्षण - कर्नाटक
75) के. पदय्या - पुरातत्वशास्त्र - महाराष्ट्र
76) स्वपन गुहा - सिरॅमिक्‍स - राजस्थान
77) डॉ. कार्तिकेय साराभाई - पर्यावरणीय शिक्षण - गुजरात 

                                                                  संदर्भ - सकाळ पेपर 

गर्वच नाही तर माज आहे महाराष्ट्राचा ...........

महाराष्ट्रातील ४३ जणांना राष्ट्रपती पोलीस पदके 
राष्ट्रपती पोलिस पदकविजेते
- सुनील रामानंद- पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
- अमितेश कुमार- पोलिस आयुक्त, अमरावती
- नवल बजाज- अतिरिक्त आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई
- डॉ. निखिल गुप्ता- उपसंचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक
- नीळकंठ म्हस्के- अधीक्षक, एमपीए, नाशिक
- रवींद्र सेनगावकर- उपायुक्त, नवी मुंबई
- राजभाऊ पवार- अधीक्षक, एससी-एसटी कमिशन, मुंबई
- भरत निंबाळकर- निरीक्षक, गुन्हे शाखा, कल्याण
- सल्लाउद्दीन पठाण- पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे
- नीलेश राऊत- सहायक पोलिस निरीक्षक, ठाणे शहर
- दिनेश जोशी- पोलिस निरीक्षक, विशेष शाखा-2, मुंबई विमानतळ
- शशांक सांडभोर- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई
- नम्रता अलकनुरे- पोलिस निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई
- सुभाष बेंदुगडे- पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, मुंबई
- प्रकाश घोसाळकर- सहा.पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस मुख्यालय, वरळी
- अशोक वाघमारे- सहा.पोलिस निरीक्षक, बोरिवली रेल्वे पोलिस
- शहाजी दुधभाते- हवालदार, कल्याण रेल्वे पोलिस
- मारुती पुजारी- हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई
- अनिल सावंत- हवालदार, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई

                                                                     संदर्भ - सकाळ पेपर