मर्द मराठी कविता

माझं विश्व, मराठी.....

माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......

माझं ह्रदय, मराठी......

माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......

माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......

माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
==============================================================
झेंडा स्वराज्याचा
महाराष्ट्र ाच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच ्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच ्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयीठेवतो तेवत, बाणा मराठीचा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.झेंडा स्वराज्याच ा..
झेंडा शिवराज्याच ा..
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!!!
==================================================================
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा धडाडल्या
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||

वाकुनी आदिलशाहास कुर्निसात देऊनी
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी
हादरली धरणी व्योम शेषहि शहारला || १ ||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्या हि रांग लांब लांब ती
टोळधाड हि निघे स्वतंत्रता गिळायला || 2 ||

श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले
मर्दनास कालियास कृष्ण सिद्ध जाहला || ३ ||

तुळजापूरची भवानी माय महन्मंगला
राउळात अधमखान दैत्यासह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला || ४ ||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येतसे समीप साध तूच वेळ ही
देऊनी बळी अजास तोषवी भवानीला || ५ ||
==================================================================

No comments:

Post a Comment