माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Saturday, January 14, 2012
एकटा मराठी वाघ
श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद...!!!!!
जय भवानी जय शिवाजी !!
स्त्रोत : विजय चौधरी
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्याच्या मकरसंक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण.
वर्षभरात बारा राशीतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी
हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक
महत्त्व आहे.
कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो.
सोमवार १४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत आहे.
म्हणून मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार १५
जानेवारी रोजी सकाळी सुयोर्दयापासून सूर्यास्तापर्यंत सांगण्यात आलेला आहे.
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.
समस्त मायबोली परीवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पूर्णत्व
एक
मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला
स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा
घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ
लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी
सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी
झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'
व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या
प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या
कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही,
तेंव्हा ते 'पूर्णत्व'.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
नांदी नव्या युगाची
चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे
चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे
चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
शिवचरित्रमाला भाग ११
शिवचरित्रमाला भाग ११
राजकारण उदंड
करावे,परि कळोचि न द्यावे!
शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून
योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते।
लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश
पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं
या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक
आराखडा तयार केला होता.
योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा.
हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे
सांगता येत नाही. पण महाभारतातील
श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत
साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट
ओळख होती असे वाटते.
कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार
मोठा परिणाम होता यांत शंका नाही.
कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग
करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं
भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे
भाबडे भक्त!
यावेळी (इ। स. १६५६ अखेर) मोगल
राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक
झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण
राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे
आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व
दरबारी संभ्रमात पडले होते.
भयंकर
पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच
ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड
या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात
ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे
अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने
लागलेले होते.
कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून
दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता.
आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक
हेरले होते. राजांना उत्तरेतून
शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या.
अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या.
त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेब
आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर
तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे
या मोगलांवर झडप घालण्याची!
शिवाजीराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले
वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे
औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले.
हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत
औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने
भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत
राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता ,
भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग
सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ? ते
औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ' कोकणातील
आणि देशावरील
विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख
आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे ,
त्याला तुमची राजकीय मान्यता असावी.
' म्हणजे राजांनी मुलुख
घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत
होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे
औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते।
औरंगजेबाचं यात काय जाणार होतं ? फुकटचं
मोठेपण! सोनोपंत हा जणू मैत्रीचाच
बहाणा करीत होते.
यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात
आला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली.
या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल
१६५७ . सोनोपंत बिदरहून परतले.
राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त
सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव
घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत
मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील
जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज
खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले.
(दि. 3 ० एप्रिल १६५७ )
सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच
दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क... लगेच
राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष
अहमदनगर
या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर
घाव घातले. भरपूर लूट मिळविली.
या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या।
त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली.
या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल
दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ
काय ? आपण तहानं गाफील झालो. सिवानं
लोणी पळविलं. गाफील का जो माल है ,
वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार
नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच
त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन्
डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची।
कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता.
केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई
सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच.
आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे
राजांनी टिपली. पण पुढची धूर्त
नाटकबाजी पाहा. राजांनी हे छापे घालीत
असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे
या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे
नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते.
कशाकरता ? जुन्नर , नगर , श्रीगोंदे
इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून '
झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप
आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता!
या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन
भरपूर पश्चाताप व्यक्त केला.
केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू
असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं
जाताजातादेखील शिवाजीराजांवर
लहानमोठासुद्धा घाव घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत
नव्हती काय ? होती। पण तो अगतिक होता.
शत्रूच्या अगतिकतेचा असाच
फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं.
शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं.
ज्या दिवशी आम्ही भारतीय
कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून
आमची घसरगुंडी चालू झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन्
फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे
भागच होते.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
राजकारण उदंड
करावे,परि कळोचि न द्यावे!
शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून
योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते।
लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश
पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं
या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक
आराखडा तयार केला होता.
योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा.
हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे
सांगता येत नाही. पण महाभारतातील
श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत
साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट
ओळख होती असे वाटते.
कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार
मोठा परिणाम होता यांत शंका नाही.
कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग
करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं
भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे
भाबडे भक्त!
यावेळी (इ। स. १६५६ अखेर) मोगल
राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक
झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण
राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे
आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व
दरबारी संभ्रमात पडले होते.
भयंकर
पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच
ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड
या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात
ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे
अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने
लागलेले होते.
कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून
दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता.
आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक
हेरले होते. राजांना उत्तरेतून
शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या.
अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या.
त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेब
आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर
तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे
या मोगलांवर झडप घालण्याची!
शिवाजीराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले
वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे
औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले.
हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत
औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने
भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत
राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता ,
भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग
सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ? ते
औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ' कोकणातील
आणि देशावरील
विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख
आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे ,
त्याला तुमची राजकीय मान्यता असावी.
' म्हणजे राजांनी मुलुख
घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत
होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे
औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते।
औरंगजेबाचं यात काय जाणार होतं ? फुकटचं
मोठेपण! सोनोपंत हा जणू मैत्रीचाच
बहाणा करीत होते.
यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात
आला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली.
या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल
१६५७ . सोनोपंत बिदरहून परतले.
राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त
सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव
घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत
मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील
जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज
खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले.
(दि. 3 ० एप्रिल १६५७ )
सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच
दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क... लगेच
राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष
अहमदनगर
या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर
घाव घातले. भरपूर लूट मिळविली.
या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या।
त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली.
या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल
दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ
काय ? आपण तहानं गाफील झालो. सिवानं
लोणी पळविलं. गाफील का जो माल है ,
वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार
नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच
त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन्
डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची।
कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता.
केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई
सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच.
आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे
राजांनी टिपली. पण पुढची धूर्त
नाटकबाजी पाहा. राजांनी हे छापे घालीत
असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे
या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे
नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते.
कशाकरता ? जुन्नर , नगर , श्रीगोंदे
इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ' चुकून '
झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप
आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता!
या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन
भरपूर पश्चाताप व्यक्त केला.
केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू
असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं
जाताजातादेखील शिवाजीराजांवर
लहानमोठासुद्धा घाव घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत
नव्हती काय ? होती। पण तो अगतिक होता.
शत्रूच्या अगतिकतेचा असाच
फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं.
शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं.
ज्या दिवशी आम्ही भारतीय
कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून
आमची घसरगुंडी चालू झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन्
फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे
भागच होते.
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
जिजाबाईसाहेबांचे आभार
आपल्या मनात तयार
असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात
साकार
करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,
चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम
अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू
देणाऱ्या राजमाता!
जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा,
ईश्वरार्पणवृत्ती
याच गुणसमुच्चयाचं सगुणरूप
असलेल्या जिजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन
असं एक हिंदवी- स्वराज्य आपण आम्हाला दिलत
की,
बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता !
हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता !
सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच
जिथलं बळ होतं !
हे राज्य श्रींचे हाच
जिथला अढळ विश्वास होता !
- आणि,
महाराष्ट्रधर्म वाढविण हाच
जिथला कर्मयोग होता !
जगदंबकृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला !
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला.
फसली सन १००७ ला, पौष
पौर्णिमा सूर्योदयाला !
राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य
कोनाला !
या उल्लेखानुसार जीजामातेचा जन्म सिंदखेड
येथे फसली सन १००७
च्या पौषी पौर्णिमेला सूर्योदय समयी, म्हणजे
गुरुवार दिनांक १२ जानेवारी १५९८
रोजी सकाळी झाला त्या दिवशी पुष्यनक्षत्र
होते म्हणजे गुरुपुष्याचे सुमुहूर्तावर जिजाऊ
जन्मल्या .
.संदर्भ (पिल्लेजंत्री)शककर्ते शिवराय
सिंदखेडकर राजे लखुजी जाधवराव यांचे कुळात
महाळसा राणी साहेब यांच्या पोटी
जन्मलेले हे कन्यारत्न म्हणजे जिजाऊ साहेब,
सन १६०५ मध्ये फर्जंद शहाजी राजे
आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. जो पर्यंत
जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत
उंबरठ्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर
त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर
माजलेली बादशाही मनमानी समजली ,
सुलतानशाही चा हैदोस त्यांना समजला.
कत्तली, आगीचे प्रलय, देवळांचे पतन
ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच
फर्जंद शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध
बंड करून स्वराज्याचा मार्ग
धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू
लागले. त्यावेळी शिवबा राजे
आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू
स्वराज्याचेच गर्भ संस्कार त्यांवर झाले.
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
घोड्यावरून दौड करावी, तलवार
कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप
प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद
डोळे भरून पहावीत.असे डोहाळे आई
साहेबांना होते आणि ते नियतीने पुरविले
देखील.
हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याच
मातेने घडविले
ह्या मातेस कोटी कोटी प्रणाम
तुम्ही नसता तर,नसती दिसली अंगणात तुळस,
तुम्ही नसता तर,नसते दिसले मंदिरांचे कळस.
तुम्ही नसता तर,सुवासिनींच्या नसते कुंकू भाळी
,
पतीव्रतांच्या किंकाळ्या मग,विरल्या असत्या
रानी....
!! जिजाऊ मातेस मनाचा मुजरा
आभार - Abhishek kumbhar
पुढच्या जन्माला
देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक
लक्षात ठेव...!!!
मी
दगड झालो तर...
सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर....
रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर....
भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको..
जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणूनच शिवाजी कर पण
शिवाजी काशीद कर.....!!!
असं देवा तुला जमणारच नसेल तर
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच
जन्मी धन्य झालो..!!
नरवीर जीवाजी महाले यांचा पुण्यदिन
आज छत्रपति शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक
नरवीर जीवाजी महाले यांचा पुण्यदिन आहे....
जीवाजी महाले हे अफज़ल खानला जेंव्हा राजे
भेटीला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत जे दोन
अंगरक्षक होते त्यातील एक म्हणजे
जीवाजी महाले आणि दुसरे संभाजी कावजी...
जेंव्हा अफज़ल चा कोथला शिवरायांनी बाहर
काढला तेंव्हा खानाचा अंगरक्षक सयाद्द
बंडा हा राजांच्या अंगावर राजे बेसावध
असताना धावून आला तेंव्हा त्या सयाद्द
बंडाला धरतीवर
कायमचा झोपविनारा वीर म्हणजे
जीवाजी महाले... अरे म्हणतात ना होते
जीवाजी म्हणून वाचले शिवाजी..........
तर अश्या नरवीर जीवाजी महाले
यांच्या पुण्यदिनांनिमित्य विन्रंम आभिवादंन... !
साभार - बाजी जेधे —
पानिपत म्हटले, की
पानिपत
म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा
इतिहास….नामुष्की,हळहळ ,दु:ख…पण लक्षात ठेवा, पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी
नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानासाठी,अवघ्या हिदुंस्थानासाठी
मराठ्यांच्या एका संबध पिढीने दिलेलं बलिदान होत ते..ह्या गोष्टीचा सार्थ
अभिमान बाळगायला नको कां ?… किंबहुना मला तर वाटते आपण ते युद्ध हरूनही
जिंकलो होतो,कारण….
१) सर्वात प्रथम म्हणजे त्याकाळच्या जगातल्या एका मोठ्या शक्तीशाली आणि अनुभवी बादशहाशी मायभूमीच्या रक्षणासाठी आपण एकट्याने न भिता टक्कर घेतली होती.
२)युद्ध झाल्यावर अब्दालीने दिल्लीच्या बंदोबस्तासाठी मराठ्यांनाच परत कायम केले,ह्यातच सगळ आल.
३)ह्या युद्धानंतर अब्दाली किंवा इतर कोणांही अफगाणी सेनापतीला ह्या मार्गाने भारतावर परत आक्रमण करायची हिंमत झाली नाही.
४)पराभवानंतर काही काळातच माधवराव पेशवे व महादजी शिंदे ह्यांनी
मराठ्यांचे उत्तरेतील गतवैभव पुन: प्रस्थापित केले व सुमारे पंचवीस वर्षे
भगवा झेंडा अखंड दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत ठेवून ‘दिल्लीचे तख्त राखिले’.
अनेक लोकांच अस म्हणण आहे कि पुराणातली वांगी पुराणात ठेवा आजच काय ते
बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा
,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे
कळणार.त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला
हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली
गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी.वयाच्या
अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी
मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती
पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका
मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपतच्या रणभूमीवर आजही एखाद्या
कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां
होईना कमी करायचा आहे…. —
(सौ. असे घडले शिवाजी महाराज)
Subscribe to:
Posts (Atom)