Saturday, January 14, 2012

पानिपत म्हटले, की

पानिपत म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा इतिहास….नामुष्की,हळहळ ,दु:ख…पण लक्षात ठेवा, पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानासाठी,अवघ्या हिदुंस्थानासाठी मराठ्यांच्या एका संबध पिढीने दिलेलं बलिदान होत ते..ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान बाळगायला नको कां ?… किंबहुना मला तर वाटते आपण ते युद्ध हरूनही जिंकलो होतो,कारण….

१) सर्वात प्रथम म्हणजे त्याकाळच्या जगातल्या एका मोठ्या शक्तीशाली आणि अनुभवी बादशहाशी मायभूमीच्या रक्षणासाठी आपण एकट्याने न भिता टक्कर घेतली होती.
२)युद्ध झाल्यावर अब्दालीने दिल्लीच्या बंदोबस्तासाठी मराठ्यांनाच परत कायम केले,ह्यातच सगळ आल.
३)ह्या युद्धानंतर अब्दाली किंवा इतर कोणांही अफगाणी सेनापतीला ह्या मार्गाने भारतावर परत आक्रमण करायची हिंमत झाली नाही.
४)पराभवानंतर काही काळातच माधवराव पेशवे व महादजी शिंदे ह्यांनी मराठ्यांचे उत्तरेतील गतवैभव पुन: प्रस्थापित केले व सुमारे पंचवीस वर्षे भगवा झेंडा अखंड दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत ठेवून ‘दिल्लीचे तख्त राखिले’.

अनेक लोकांच अस म्हणण आहे कि पुराणातली वांगी पुराणात ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार.त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपतच्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे…. —
                                                          (सौ. असे घडले शिवाजी महाराज)

No comments:

Post a Comment