माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Tuesday, January 24, 2012
एकदा एका माणसाने
एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो
ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं
नाव सांगायलाच हवं का?
एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह
आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा
जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली
'कटिंग चाय' होती.
हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. 'गुजारिश'मध्ये
बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.
एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!
रॉजर फेडरर म्हणाला, ''मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक
आहे?'' रजनीकांतने विचारलं, ''नेटमध्ये भोकं किती असतात?''
ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही 'रजनीकांत' असं
उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.
रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.
कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.
एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच
गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता,
'ढिशक्यांव!!!!'
सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल,
त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची
असं ठरलं होतं..
'मिशन इम्पॉसिबल' हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता..
रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!
एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी
रजनीकांतच करू शकतो की काय?
प्रेम
Love is sweets and honey
Love is sometimes for your heart
Love is sometimes for the money
Love is passionate
Love is blind
Love is destined
Love is cruel and kind
Love is forever
Love is for a night
Love is fading
Love is at first sight
Love is unrequited
Love is for another
Love is not returned
Love is not to be smothered
Love is dangerous
Love is right
Love is wrong
Love is a fight
Love is complicated
Love is here and there
Love is in YOU and ME........!!!
एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?
एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा
करेल?
रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..
त्यातूनच 'गुगल'चा जन्म झाला.
एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं
म्हणे!
रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन
पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.
एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ''उगाच थरथर
कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत
जगात काहीही नसतं!''
एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.
'रोबो' सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला चार स्टारचे
रेटिंग दिले.
देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो 'अरे रजनीकांता' असे
उद्गारतो.
रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.
त्सुनामी कशा तयार होतात..
अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे..
प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?
रजनीकांत एका मुलाबरोबर
रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो
डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन
रजनीकांत होते.
रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.
प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच
केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.
एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक
रजनीकांत फरारी झाला आहे.
रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून,
ब्लूटुथवरून.
''बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,'' आईने ओरडून
सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.
रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ''मला सतत अशी भावना होते की
कुणीतरी माझा पाठलाग करतंय.''
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ''माय गॉड, माझी सावली कुठे गेली?''
प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ''तुला भविष्यात काय करायचे आहे?''
मुलगा उत्तरला, ''एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये
जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून
नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून
नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.''
प्रोफेसर म्हणाले, 'बाप रे, तुझं नाव काय?''
''सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.''
''आई आई, तो बघ तारा तुटला!''
''नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल
सूर्याला नाहीतर चंद्राला!''
एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी
डार्लिग या नावाने ओळखते.
एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात
आला.
एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक
मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.
एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ''आय अॅम बाँड,
जेम्स बाँड.'' त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड
जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, 'आय अॅम कांत, रजनीकांत. येन्ना
रास्कला.''
2012 सालापर्यंत..........
2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू
लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर
रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.
आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया
गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ''ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम.
रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!'
चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण,
दक्षिणेला रजनीकांत आहे!!!
रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती
तारीख कोणालाही दिली नाही.
रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच
आपण आज 'अंबुजा सिमेंट' म्हणून ओळखतो.
रजनीकांत जेव्हा 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला
विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत
घ्यावी लागली होती.
गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला
माहिती नाही
ओळखलंत का सर
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
---------------कुसुमाग्रज.
उगवला एक सूर्य नवा
उगवला एक सूर्य नवा,
उजळली मराठी माती!
उधळते अभिमान पुन्हा,
निधडी हि मराठी छाती!
पेटून उठली जनामानातील
गर्जे आग मराठी...
मी मराठी
जय भवानी, जय शिवाजी
या सह्याद्रीला, या स्वराज्याला..
या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...
"कान्होजी आंग्रे-समुद्रावरचा शिवाजी"
सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’!
...
स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची
झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील
खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला.
कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ
झाले.
कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला
पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा
त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या
औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे
हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्या
मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून
त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी
ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.
छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी
कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत
होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना ‘सरखेल’ हे
सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली
राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख
केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी
ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते
मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या
आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा
लागत होता.
कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर,
कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे
संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची
सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही
सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी
ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले,
तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना
तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध
ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज
केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि
कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे
कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्यावर एक
दबदबा निर्माण केला होता.
कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार
कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर,
आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज
करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील
राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक ! दिनांक ४ जुलै,
१७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.
आहे एक वेडी मुलगी.........
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?
तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?
''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
"प्रियकर :- प्रेमात खरचच जादू असते,
"प्रियकर :- प्रेमात खरचच जादू असते,
बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे
बोट
... करून प्रियकर म्हणतो :-
हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !!
प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!!
प्रियकर :- समोरच्या आरशात बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले
दिसतील :-) !!"
एक ग्लास पाणी
एक ग्लास पाणी
एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात
होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते
लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला
कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा
ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची
सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम
करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने
लक्ष्मणाला हाक मारली.'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस'लक्ष्मण घरात पाणी आणायला
गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती.
रात्र संपली पहाट झाली. गार वार्याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने
पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई
म्हणाली'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे
नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,'आई
अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक
रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.
--------------- --------------- ------------
शाळा VS कॉलेज
शाळा VS कॉलेज
शाळा: पेन्सिल,रबर,शार्पनर,पे न,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;)
... शाळा:वर्गात येण्याआधी"टीचर ,मे आय कम इन?" किंवा"टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार कितीबसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .
शाळा: सर्व विषयांची पुस्तकआणि वह्या स्वतःजवळ ठेवणार!
कोलेज:मित्राला बोलणार "अरेयार वहिचे एक पान तर डे ना"
शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"
शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते
शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनीआहे तुझी
काही मित्र
काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते
का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ
कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड
माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय
कि तु चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू
तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल
आहे कोणाचा ???
"हर एक फ्रेंड कामिना होता है":)))
तुही माझ्या प्रेमात
तुही माझ्या प्रेमात
पडताना असं काही पडावं,
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त
माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने
छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप
खूप रडावं. ♥
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच
शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र
रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते
अर्धवटच वाटावं.. ♥
मरणही असं..... तुज्या मिठीत
यावं,
कि मरणानंतर हि ते मरण
मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं
भरावं,
कि दु:खाला पण
माज्या आयुष्यात येताना कोडं
पडावं. ♥
मुळ पोस्ट राज राउत फेसबुक
मराठ मोळी आई
मराठ मोळी आई
आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा•
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला
विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी
ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी
पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल•
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता•
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल•
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही•
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला
सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग
तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.
लेखक - अज्ञात
देवा मला पुढच्या जन्माला..........
देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव...!!!
मी
दगड झालो तर...
सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर....
रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर....
भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको..
जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठी" म्हणूनच शिवाजी कर पण शिवाजी काशीद कर.....!!!
असं देवा तुला जमणारच नसेल तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!!!
आभार = किशोर सप्रे
Subscribe to:
Posts (Atom)