=============================================================================
शूरवीर बाजी पासलकर......... ...
बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने
कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच
क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-
... बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या
सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला
धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि
कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी
फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी
शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू
आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी
बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत
टाहो फोडला,"बाजी,आम् हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर
पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं
या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी
आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला
ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला
आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार
व्हतो पर त्ये बी र्हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा
कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी नपुन्यांदा
सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाट ी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग! म्या चाललू रांजा,
आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....." राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे
डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....
=====================================================================
रामजी पांगेरा...
प्रतापगडाच्या युध्दात(दि.१० नोव्हेंबर १६५९)रामजी पांगेराने पराक्रम करून
जावळीच्या जंगलात खानाच्या सैन्याची कत्तल केली होती.रामजी हा छत्रपतींचा
मावळातीलसहकारी होता.याचे जन्मस्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध
नाही.नाशिक भागातील कण्हेरा किल्ल्याजवळ रामजी आपल्या सातशे सहकार्यांलसह
तळ ठोकून होते.कारण मोघलांच्या फौजा कधी स्वराज्यावर चालून येतील याचा काही
नेम नव्हता.
सन १६७१ साली दिलेरखान
बर्हाळणपुराहून सुमारे तीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला.नाशिक
भागातील कण्हेरा किल्ला जिंकण्यासाठी तो चालून निघाला.ही बातमी कण्हेरा
किल्ल्याजवळील रामजीस समजली.तीस हजाराच्या सैन्यापुढे सातशे मावळ्यांचा
टिकाव लागणे शक्य नव्हते.रामजीने आपल्या मावळ्यांना एकत्र केले व त्यांना
स्वराज्यासाठी लढावयास प्रवृत केले.मावळे हर हर महादेव चा गजर करत चवताळून
उठले.कण्हेरा किल्ल्याच्या आश्रयास न जाता ते दिलेरखानाच्या फौजेची वाट
पाहू लागले,जणू त्यांच्यात भवानीच संचारली होती.
दिलेरखान कण्हेरा
गडाजवळ आल्याबरोबर दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला.हर
हर महादेव चा गजर करत मावळे तुटून पडले,दोन्ही हाताने तलवार चालवत रामजी
शत्रूवर तुटून पडले.मावळे हट्टास पेटले होते,अखेरीस मोघली सैन्य पळत
सुटले.मराठ्यांच ्या आक्रमणापुढे दिलेरखानास माघार घ्यावी लागली.कण्हेरा
किल्याच्या परिसरात सातशे मावळ्यांनी तीस हजार गनिमांचा पराभव केला व
पराक्रमी रामजी इतिहासात कायमचा अमर झाला.
===================================================================
सेवेस तत्पर हिरोजी इंदलकर
माणसे कोणत्या मोहानेमहाराजांकडे आली. विश्वास दिला होता महाराजांनी आपले
राज्य उभा करायचं, मला सिहासनावर बसायचय म्हणून राज्य निर्माणकरायचे नाही
तर संबंध मराठ्यांचे राज्य निर्माण झाले पाहिजे हि काळजी इथल्या
माणसामाणसांत होती.याच मोहाने अनेक माणसे महाराजांकडे आली ज्यांची
राजांप्रती निष्ठा होती त्यातील एक हिरोजी इंदलकर
हिरोजी इंदलकर नावाचाबांधकाम प्रमुख महाराजांकडे होता रायगड सारखा किल्ला बांधण्याची जवाबदारी शिवाजींनी त्याच्यावर सोपवली
शिवाजी स्वारीवर गेले. हिरोजीने किल्ला निम्या पर्यंतबांधत आणला.आणि पैसा
संपला हिरोजीला कळेनाकाय करावं शिवाजिंने जवाबदारी तर टाकलीये किल्ला तर
बांधला पाहिजे पैसा तर शिल्लक नाही
ह्या हिरोजीने अपूर्वकाम केले आपला राहता वाडा आपली सगळी जमीन विकली बायकोला घेऊन रायगडला आला पैशासह झोपडी बांधून राहिला लागला
आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली.शिवाजींना आल्यावर कळलं हिरोजीने काय
केले ते राज्याभिषेकाच्यावेळी शिवाजींना वाटलं ह्या हिरोजीचा सत्कारकरावा.
राज्याभिषेकाच्यावेळी शिवजी म्हणाले हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात बोला तुम्हाला काय हवयं
त्यावेळी हिरोजी मान झुकवून म्हणाला महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या
पदरांतटाकलाय आम्हाला आणिखीकाय हवयं महाराज म्हणाले नाही हिरोजी तुम्ही
काही तरी मागितलेच पाहिजे त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे या
रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधलय त्या मंदिराच्या एका पायरीवर
आमचे नाव कोरण्याची अनुमती हवीआहे
महाराजांना कळेना हे कसले मागणे
पाचवा वेतन आयोग नाही मागितला ,पगारवाढ नाही मागितली,पाटीलकी नाही मागितली
देशमुखी नाहीमागितली मागून मागितले तर काय दगडावर नाव कोरण्याचीअनुमती
महाराजांनी विचारले हिरोजी असे का
आणि हिरोजी यावर सांगतायत राजे
जेव्हारायगडावर असाल तेव्हाजगदीश्वराच्या दर्शनाला याल जेव्हा जेव्हा
दर्शनाला याल तेव्हा तुमची पाउले त्या पायर्यांवर पडतील आणि महाराज
त्यातल्याच एका पायरीवर जर माझे नाव असेल तर तुमची पायधूळ सतत माझ्या
नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहील एवढे भाग्य फक्त पदरात
टाका कि तुमच्या पाउलांची पायधूळ सतत माझ्या मस्तकावर अभिषेक करत राहू देत
______________________________________________________________________
।। सुर्यराव काकडे ।।
सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे
बालपणीचे मित्र होते.रोहिडा व
जावळी सर करण्यात
त्यांचा मोठा वाटा होता.शिवाजीने
'सुरराव काकडे दोन हजार हासम
जावळीवर
रवाना केले.'असा मोर्यारच्या बखरीमध्ये
उल्लेख आहे.सुर्यराव
यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई
इतिहासात प्रसिध्द आहे.
शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण
मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून
घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते
एकून
पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,'
काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे
सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम
होऊन आले.आता कोण पाठवावे
'तेव्हा पातशहाने 'शिवाजी जोवर
जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत
नाही'असा विचार
केला आणि इखलासखान व बहोलोलखान
यांस बोलावून वीस हजार
स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.
मग इखलासखानाने येऊन
साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान
जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत
पाठवलेले आपले सरनौबत
प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले
'तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन
बेलोलखानास धारून चालविणे आण
कोकणातून मोरोपंत
पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.'हे
इकडून येतील
तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे
दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस
मिळवणे'अशी पत्रे पाठविली.
त्याप्रमाणे एकीकडून
प्रतापराव,सुर्यराव तर दुसरीकडून
पेशवे,उभयता सालेरीस आले,आणि मोठे
युध्द झाले.सभासद बखरीत याचा उल्लेख्
खालील प्रमाणे आढळतो ''चार प्रहर
दिवस युध्द जाहले
मोगल,पठाण,रजपूत,तोफांचे,हत्ती,उंट
आराबा घालून युध्द जाहले.युध्द होताच
पृथ्वीचा धुराळा असा उडाला की,तीन
कोश औरस चौरस,आपले व परके लोक
माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले
दुतर्फा दहा हजार माणूस
मुर्दा जाहले,पूर वहिले.रक्ताचे चिखल
जाहले.मराठांनी इखलासखान
आणि बेलोलखानाचा पाडाव
केला.युध्दात प्रचंड प्रमाणावर
हानी झाली.या युध्दात
शिवरायांच्या एक लाख २० हजार
सैन्याचा समावेश होता,पैकी १० हजार
माणसे कामीस आले.सहा हजार
घोडे,सहा हजार उंट,सव्वाशे हत्ती तसेच
खजिना,जडजवाहीर ,कापड अशी अफाट
मालमत्ता शिवरायांच्या हाती आली.
या युध्दात
मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ
केली.मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव
सरनौबत
यांनी आणीबाणी केली.सूर्यराव काकडे
यांना पराक्रम गाजवतांना आपला देह
ठेवावा लागला.ते तोफेचा गोळा लागून
पडले.'सूर्यराव काही सामान्य
योध्दा नव्हे.भारती जैसा कर्ण
योध्दा त्याचा प्रतिमेचा,असा शूर
पडला.'विजयाची बातमी शिवरायांकडे
गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन
आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव
सरनौबत,मोरोपंत पेशवे,
आनंदराव,व्यंकोजी पंत यांना अपार
बक्षीस आणि द्रव्य देण्यात
आले.हा पराभव
दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद
म्हणतो,पातशहा असे कष्टी जाले.'खुदाने
मुसलमानांची पातशाही दूर करून
शिवाजीसच दिधली असे वाटते.
आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु
येईल तर
बरे.आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत
नाही.'असे
बोलिले.मोगलांच्या सैन्याशी समोरासमोर
लढाई करून तोपर्यंत
महाराजांना विजय प्राप्त
झाला होता,त्यात साल्हेरचा विजय
प्रथम मानावर होता.असा मोठा विजय
यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.या युध्दात
महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व
शौर्याची किर्ती चहुकडे
पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच
वाढला.साल्हेर जिंकल्यावर
त्यासमोरील मुल्हेर
किल्ला मराठांनी जिंकला आणि संपूर्ण
बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह
बसवला.त्यामुळे सुरत शहरास
कायमची दहशत बसली.
सुर्यराव काकडे समाधीवरील चंद्रसुर्य
चंद्रसूर्य असेपर्यंत
तुमची किर्ती दिगंतात राहील
असा त्याचा अर्थ आहे.
______________________________________________________
।। दत्ताजी शिंदे ।।
गुरुवार १० जानेवारी १७६१रोजी संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान
करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळीनजरेच्या टप्प्यात यायच्या आत
गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने
मराठ्यांवर हल्ला चढवला.
पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ
नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याचीनेमणूक
केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे
तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण
बंदुकधारीअसून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता.
मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना
समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर
जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर
आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व तेशत्रूचा नेटाने मुकाबला करू
लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात
मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.
दत्ताऽऽऽ"
म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू
काही डोळ्यांतच अंगारफुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत
म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणिमंद मंद होत चाललेला आवाजदत्ताजींनी एकवटला आणि तेबाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने
दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची
भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर
मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून
मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड
बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र
केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणूनसोबत्यांनी
नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या
आणि पाने सरणावर ठेवली.
दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला,
अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या
घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला.
उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी
तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी
झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून
पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
आभार - अभिषेक कुभार
No comments:
Post a Comment