Wednesday, January 11, 2012

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा धडाडल्या
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||

वाकुनी आदिलशाहास कुर्निसात देऊनी
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी
हादरली धरणी व्योम शेषहि शहारला || १ ||

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्या हि रांग लांब लांब ती
टोळधाड हि निघे स्वतंत्रता गिळायला || 2 ||

श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले
मर्दनास कालियास कृष्ण सिद्ध जाहला || ३ ||

तुळजापूरची भवानी माय महन्मंगला
राउळात अधमखान दैत्यासह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला || ४ ||

सावधान हो शिवा वैर्याची रात्र ही
काळ येतसे समीप साध तूच वेळ ही
देऊनी बळी अजास तोषवी भवानीला || ५ ||

No comments:

Post a Comment