शिवाजी
या नावातच सर्व काही आहे या नाव पुढे न सांगताच आपले मस्तक झुकते
............या शिवाजी महाराजांना मराठी माणूस विसरून चाललाय
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
मित्राची कविता सदर करतो आहे ..............
मराठा छत्रपती शिवाजीराजे नाहीत म्हणून .........
मराठी माणूस विसरून चाललाय
आपले मराठी पण
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
मराठी माणूस आपला विसरून
स्वाभिमान जगतोय क्न्हुन
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
स्वराज्य तुम्ही उभ केलत
तोरण्याचा पाया खणून
पण हे विसरून , मराठी माणसाचे
मराठीपण बसलय लपून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
पैसा - पैसा करतोय हर एक मनुष्य
आपले लबाडपण दडवून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
कायदा फसलाय मोठ्याच्या घरात
कारण तिथे असते पैशांची वरात
म्हणून कायदा खातोय त्यांचा चारा
कारण त्यांच्या भोवती
लागलाय पैशांचा पहारा
आणि यात जातोय
गरीब मरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
तुमच्या काळात मराठी मावळा
मनी ठेवायचा विचार
'' जिंकू किवा मरू ''
पण आजचे काही मराठी संपून
चाललेत पिऊन दारू
आणि आम्ही हे पाहतोय केवळ
डोळे भरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
तुम्ही उभ केलत मराठी साम्राज्य
कपाळी आई भवानीचा मळवट
भरून
एवढे गड जिंकले
कपाळी भंडारा माखून
आणि कइक मावळ्यांचे रक्त सांडून
पण आज मराठी माणूस हे
विसरत चाललाय पैशाचा मोह धरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
तुम्ही नसता तर, उभ राहिला
नसत आज मराठीपण
मग कसा राहिला असता आज
मराठी माणूस मान वर करून
आणि हेच नेमक तो चाललाय विसरून
राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....
म्हणून राजे तुमच्या चरणी एकच प्रार्थना
याव तुम्ही पुन्हा जन्माला !
आणि सांगावा अर्थ मराठी माणसाला
आपल्या मराठी पणाचा !
लेखक : श्री विक्रम भोसले
No comments:
Post a Comment