मनगटा
मधे एवढे बळ कि तलवारीच्या एक घावात मनुष्य काय अश्वाचे पण दोन तुकडे
पडतील , भरदार शरीरयष्टि ,वाघाची आक्रमकता आणि अद्वितीय युद्ध कौशल्य
ह्याचे धनि म्हणजे छत्रपति संभाजी राजे. शम्भू राजे हे अटकेपार महाराष्ट्र
राज्य वाढवणारे महान योद्धे.२४ नोव्हेंबर १६८३ रोजी जुवे बेटावर
फिरंग्यांचा शंभू राजांच्या सैन्याकडून दारूण पराभव झाला होता. ह्या नंतर
गोवा जवळ पास मराठी साम्राज्यात आले होते. राजकीय आणि पारिवारिक
कलह सहन केलेले शंभू राजे हे त्या वेळी एकटेच ४-५ साम्राज्यांशी समर्थपणे
लढत होते. त्याचे पराक्रम आणि युद्ध कौशल्य हे त्यावेळी सर्वात उत्कृष्ट
दर्जाचे होते म्हणून कि काय औरंगजेब त्यांना फितूरी करुनच पकडू शकला आणि
ह्या नंतर एक योद्धे ते इतिहास वीर हा त्यांचा प्रवास सुरु झाला. जसा
महाभारतामध्ये कर्ण होता , जो सर्व गुण सम्पन्न असून पण शेवट कौरव मित्र
म्हणून स्वतः वर एक डाग लावून गेला तसे काही शम्भू राजांच्या बाबतीत
आयुष्याच्या सुरुवातीस झाले असे म्हणता येइल. पण इतिहासामधे आपला मृत्यु
जगणारे जर कोणी असतील तर त्यात पृथ्वीराज चौहान आणि छत्रपती संभाजी राजे हे
अग्रस्थानी आहेत. छत्रपति शिवरायांच्या प्रभावशाली राज्याच्या शेवटी मराठा
साम्राज्यात आलेली मरगळ आणि संभ्रमता ही शम्भू राजे ह्यांच्या बलिदानाला
पाहून क्षणात निघून गेली आणि स्वराज्यात एक चैतन्य निर्माण करून गेली. जसे
पर्वतावर पाणी,हवा सतत आदळत असते पण पर्वत हां स्थिर असतो तसे शम्भू राजे
हे औरंगजेबा समोर आपल्या मृत्युसमयी स्थिर होते. त्यांच्या शरीराला जहाल
वेदना देणारे मुघल हे त्यांच्या आत्म्याला त्रास देण्यास सपशेल अपयशी ठरले
आणि मृत्युस प्राप्त ठरून पण औरंगजेबा समोर शम्भुराजेच जिंकले. ह्या मराठी
मातीचा शंभूराजे हा एक चमत्कार होता त्याना विनम्र अभिवादन ..
No comments:
Post a Comment