शिवा
काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या
स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले
म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोहरच्या वेढयातुन सुटुन आले व
विशाळगडावरति पोहचले.शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता.
त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुनत्याने व त्याच्या
सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हा शिवाजी नाही असे कळताच जोहर म्हणतो
कसा 'शिवा काशीद आता तुमरणाला तयार हो'.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला
'शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुनसुटले असतील आता मी सुखाने मरण्यास तयार
आहे'.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे'. हे ऐकुन जोहरने
त्याचे शिर कापुन टाकले.अशा प्रकारे शिवा काशिदलावीर मरण आले.अशा या
वीरमावळ्याचा पराक्रम अजुनही जनतेस माहीत नाही.इतिहास:(मराठयाचा)इतिहास हि
त्याच्या पराक्रम विसरु शकणार नाही,कारण शिवा काशिद सारख्या
मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न
शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु
लागली.शिवा काशिद या मर्द मावळ्याची समाधिअजून हि पन्हाळगडाच्या पायथ्याशी
विशाळगडाकडे जाणार्या वाटेतिल गावापाशी दुरावस्थेत आहे.
No comments:
Post a Comment