Sunday, February 5, 2012

मुला मुलीची निखळ मैत्री

मुला मुलीची निखळ मैत्री :)

मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,

आयुष्यभर मैत्री टिकव,मध्येच सोडून जाऊ नकोस..

जीवनाच्या एका वळणावर भेट झाली आपली,,

एकमेकांना न बघताच मैत्री झाली आपली,

दिवसेंदिवस बहरत गेली मैत्री आपली,

खूप प्रेम केले मी आपल्या मैत्रीवर,, पण...,

plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस....

सत्याची ढाल होती

सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता

... सह्याद्रीची साथ होती
जिजावुंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास
तोफांचा आवाज होता

घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ
यौवनांच्या छातीत धडकी होती

आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने
राजा शिवछत्रपती त्यांच नाव

जिंकून घेतले दुर्ग

जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी
म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच,पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना
बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

आमच्या शिवरायांचे वादळ

आमच्या शिवरायांचे वादळ अजून थोडा वेळ जरीघोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाचकाय पण उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजून काही काळ जर धगधगतराहिल्या असत्या तर,
त्यांनी आज सातासमुद्रापारही  स्वराजाच्याच नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ जय शिवराय" ची आरोळी ठोकलीअसती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय पण"व्हाईटहाउस"वरह ी भगवाझेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकाली जाण्याने त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच नाही पूर्ण झाली.
.
.
आता तरी उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.

४ फेब्रुवारी १६७० ची रात्र

४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि तानाजी मालुसरेंचा पराक्रम
शिवकाळात किल्ल्याना अनन्य साधारण महत्व होते.मात्र किल्ले घेण्याच्या इस्लामी आणि शिवाजी राजांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.गतिमानता हा राजांच्या युद्धपद्धतीचा गाभा होता.पुरंदरच्या तहात गेलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोंढाणा होय.
जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता.त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची (१६७०)संध्याकाळ .या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी.चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता.त्या आधी मिट्ट अंधारच...!!गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.मात्रयावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनचउदयभानुच ्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीनेढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ........
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली......शे वटी काय???
गड आला पण सिंह गेला......
.
.
.
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट........... .....!!!

काही मित्र बियर पीत असतात,

काही मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
मुलगा : हो जानू घेणा.
... गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... ...बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तू वेड लागलाय कि तुला चडलीये ???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो रे???
मुलगा : सोडा न राव माझा मोबाईल कुठचा  ते सांगा 
आभार - अजिंक्य बनकर