Thursday, January 12, 2012

जीवन ...............

ही वाट चालताना आता पाऊल जड झाले,
जखमा सोबत घेणे जीवनात अवघड झाले .
मी पाहतो वाट कोण सोबत आहे,
चालणारेमाझ्यासोबत मागेच गुडूप झाले,
शेवटी एकला चलो रे हाच नारा खरा,
भेटले जीवनात जे जे त्यामुळे जीवन सुरेख झाले.
                                              -नितीनकुमार देवरे

मैत्रिण माझी...............

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ 
                                                               - संदीप 

म्हणून आम्ही जन्मा आलो!

म्हणून आम्ही जन्मा आलो!

माणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची
वाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची
घुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..
कुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..
कुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

भूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..
भाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..
डॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने डिकवायचा होता...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आभाळाला कुणीतरी विचारायला हवं..
सारं बघणा-याला "मी ही बघतोय" हे सुनवायला हवं..
तुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी
ठणकवायला हवं...
म्हणून आम्ही जन्मा आलो!
                                              - संदीप 

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

....संदिप

एकदा माझ्यापरि, मजला जगावे वाटते

संदीपची एक नवीन आणि अप्रतिम कविता इथे (संदर्भ लागावा म्हणून शेरच्या मध्ये संदीप जे बोलतो, त्यासकट) पोस्ट करत आहे.

एकदा माझ्यापरि, मजला जगावे वाटते
अन्य ना दुसरे कुणी, मज मीच व्हावे वाटते ॥ धृ ॥

वाट कधीची पाहतो मी, तुज पहावे वाटते
वाट बघताना तुझी मी, तू बघावे वाटते ॥ १ ॥

(दोन प्रेमी-प्रेमिका कश्या खोड्या काढतात एकमेकांच्या यावरचा खालचा शेर)

भेटीच्या दुर्मिळ क्षणी, बोलू नयेसे वाटते
वाटते मुद्दाम तिजला, मज स्वभावे वाटते ॥ २ ॥

(कधीकधी हातातला हात सुटून जातो आणि मग ती व्यक्‍ती आयुष्यामध्ये अगदी नकोशी होऊन जाते. त्यावरचा शेर)

लोचनी - स्वप्नांतूनी - जगण्यातूनी - स्मरणातूनी
सांग मी अजूनी तुला, कोठे नसावे वाटते ॥ ३ ॥

(बदलतात म्हणजे येवढी बदलतात माणसं,की हिंदीमध्ये एक फार चांगला शेर आहे:-
कल तक तो अश्ना[अनोळखी] थे,
मगर आज गैर हो ।
दो दिन में ये इजाज है,
आगे की खैर हो ॥
त्यावरचाच हा पुढचा शेर)

केवढ्याला घेतला तू, हा तुझा चेहेरा नवा
त्याच बाजारामध्ये, मजलाही जावे वाटते ॥ ४ ॥

(काही माणसं आपल्याला अशी भेटतात की त्यांना कुणी काही विचारो-न विचारो, ते आपली स्वतःविषयीची माहिती देत असतात. त्यावरचा शेर)

का अशी इच्छा मला, होते गलिच्छा सारखी
का असे माझ्याच विषयी, बडबडावे वाटते ॥ ५ ॥

(देवाला आपण निर्गुण - निराकार म्हणतो, पण थोडासा अन्याय करतो आपण त्याच्यावरती. त्याविषयचीचा हा पुढचा शेर)

राहूदे तो बंद गाभारा, जरा उघडू नका
कधीतरी त्या ईश्वरालाही रडावे वाटते ॥ ६ ॥

("कवितेविषयी मार्गदर्शन द्या" असं जेंव्हा लोक विचारतात तेंव्हा त्यांना जे सांगावसं वाटतं ते या पुढच्या शेरमध्ये)

थांब तू पहिलीच कविता, खरडण्या आधी जरा
मधरात्री जाग अन्‌ दिवसा निजावे लागते ॥ ७ ॥
                                                                                                            ( सौ .मराठी कविता  )

शिवाजी राजे


शिवाजी राजांबद्दल   इतिहासात वाचले  तर खरचच मन थक्क होते . कारण त्यांचा इतका अष्टपैलू , अष्टावधानी माणूस अजून कोणीच पाहिला नसेल . कारण आदर्श राज्यकर्ता ,थोर सेनानी ,प्रजादक्ष ,धर्माभिमानी ,परधर्मसहिष्णू  ,चारित्र्यसंपन्न ,दूरदृष्टीचा  असा हा जाणता राजा जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य  कारण मुलगा ,बाप ,पती ,मित्र ,शिष्य ,इत्यादी संसारी नात्यांनी देखील घडणारे या महापुरुष दर्शन मन भरून टाकणारे आहे .

 शिवाजी राजे हे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते ; व्यवहारी होते पण ध्येयशून्य नव्हते .श्री च्या राज्यांचे स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तवात उतरवणारे कठोर वास्तववादी होते. शिवाजी राजांनी शून्यातून विश्व तयार केले आणि हे विश्व तयार करताना जनतेच्या ऐहिक  कल्याणाची जबाबदारी आपली आहे हे ते कधीही विसरले नाही .
राजांचे एका वाक्याला अजूनही आवाहन नाही " मी शत्रूशीच  शत्रू म्हणून वागलो , मित्रांना दगा दिल्याचे दाखवा "

 खरचंच या जाणत्या राजाला मानाचा मुजरा आणि इतक्या महान व्यक्तीला  घडवणाऱ्या माता जिजाबाई  ज्यांनी शिवाजीला लहानपणी दंत कथा सांगून बाळकडू पाजले .प्रसंगी कारभार हातात घेऊन स्वराज्याच्या स्थापनेत मोलाच वाटा उचलणाऱ्या  या माता जिजाबाई यांना मानाचा मुजरा .