Thursday, January 12, 2012

म्हणून आम्ही जन्मा आलो!

म्हणून आम्ही जन्मा आलो!

माणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची
वाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची
घुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..
कुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..
कुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

भूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..
भाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..
डॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने डिकवायचा होता...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आभाळाला कुणीतरी विचारायला हवं..
सारं बघणा-याला "मी ही बघतोय" हे सुनवायला हवं..
तुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी
ठणकवायला हवं...
म्हणून आम्ही जन्मा आलो!
                                              - संदीप 

No comments:

Post a Comment