म्हणा....
"मी जवाबदार आहे ह्या महाराष्ट्राच्या भविष्याचा..."
खूनी, दरोडेखोर हे तुम्हाला खासदार-आमदार म्हणून चालतात.... पण एखादा
प्रामाणिक मराठी माणूस राजकारणात असेल तर तुमचं पित्त खवळते.... ह्या देशात
म्युनिसिपालीटित नोकरी करणारा शिपाई देखील बारावी पास लागतो पण राज्याची
धुरा सांभाळणारा राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही....एके ठिकाणी साक्षरते
च्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निर...क्षर
उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सुत द्यायची. ह्या सगळ्याची चिड न
येण्याइतके क्षन्य आहोत का आपण...???
राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेले आहे पण राजकारण
हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा विचार केलाय...??... राजकारणी चोर,
लाचखाऊ, भ्रष्टाचारी, उन्मत्त असे आपणच ओरडणार आणि पुढल्या खेपेला आपणच
त्यांना निवडून देणार...
मतदानाच्या दिवशी काहीजण मतदान करत
नाहीत. निवडणुकीची सुट्टी holiday म्हणून साजरी करतात आणि त्याचा फायदा
घेउन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांचा जिवावर पुन्हा.... पुन्हा पाच वर्ष
आपल्याला लुबाडायला मोकळे होतात....
प्रत्येक नगरसेवक, आमदार,
खासदार हे तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला बांधील आहेत पण आपल्यापैकी
कितीजण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात...???
का नाही आपण त्यांना विचारात की बाबा "तुमची भूक तरी किती..?? किती खाल...??"
अहो कळत नाही का तुम्हाला.... काढून-काढून गाईचे दूध संपेल पण हे तर आता बैलाच दूध काढत सुटलेत....
कोथिंबीरिची जुडीसुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का...??
ऐरा-गैराच्या हातात सत्ता देऊन मुर्दाडा सारख गुडघ्यात माना घालून
स्वतःच्याच मुलाखत परक्यासारख जगण्यासाठी जन्माला आलो आहोत का आपण...???
एकच सांगतो "जागे व्हा"... अजून ही वेळ गेलेली नाही...
आपल्या मनाशी पक्कं करा... मतदान हा हक्क बजावायचाच...!!!
उमेदवार निवडताना त्याच शिक्षण, त्याची निष्ठा, त्याची प्रामाणिकता,
त्याची सामाजिक जाणीव हे सगळ तपासून बघा...तुमचं मत अमूल्य आहे...ते देताना
नीट विचार करुन द्या....आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज
येईल...
हे सगळे बदल लगेच घडणार नाहीयेत.... पण मला शंभर टक्के
खात्री आहे आपण आज पाऊल उचलले तर येत्या काही वर्षातच आपल्या राज्याचा
आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल... अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल....
आणि क्रीडामंत्री एक खेळाडू असेल....
समर्थांनी महाराजांच वर्णन केलं होतं "निश्चयाचा महामेरु".....
तो आता आपण प्रत्येकात जिवंत करूया....
म्हणा....
"मी जवाबदार आहे ह्या महाराष्ट्राच्या भविष्याचा..."
"गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा..."