Friday, January 13, 2012

शिवराजा जणू.............

श्रीरामाला पूजती कोणी

श्रीकृष्णाला भजती कोणी


जन्मभरी ओठावर माझ्या


शिवछत्रपतींची अमर कहाणी

रामायण अन् महाभारत हे

राहील अथवा जाईल

शिवरायांची कीर्तिगाथा

विश्वची सारे गाईल...

मर्यादा पुरुषोत्तम राम

बुद्धिमान अन् धूर्तचि श्याम

शिवप्रभूंचे घ्यावे नाम...

पित्यासाठी गडकोट सोडिती

औरंग्याशी शंभू राखितो

मावळसेना जमवून सारे

स्वराज्य हिंदवी स्वये स्थापिती

भूषण म्हणतो शिवरायांना

धर्मरक्षी मारुनी यवनांना

कडे कपारी सह्यागिरीच्या
गर्जून देती मानवंदना...

रामदास ते समर्थ योगी

म्हणती शिवबा राज्य न भोगी

जीवन त्याचे आहे त्यागी

शिवराजा जणू श्रीमंत योगी...

निश्चयासी हा गौरीशंकरु

सकल प्रजेचा तो आधारु

प्राण संकटी घालूनी सत्वरं

प्रजा रक्षितो शिवबा तत्पर...

हा वीरांचा असे वीराग्रणी

विजयी होई सदा रणांगणी

जन्मभरी ओठावर म्हणूनी

शिवछत्रपतिंची अमर कहाणी...
।। जय शिवराय ।।

No comments:

Post a Comment