Sunday, January 22, 2012

खेळ मांडीयेला वाळवंटी..........

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे|
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे||

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा|
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे||

वर्ण अभिमान विसरलीया ती, एक एका लोटांगणी जाती|
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे||

होतो जयजयकार गर्जतो अंबर, मातले हे वैष्णव वीर रे|
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे||

-संत तुकाराम

No comments:

Post a Comment