Sunday, January 22, 2012

एक हळवी आठवण

एक हळवी आठवण
एक हळवी आठवण
मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना
हृदयात खोलवर रुतलेली |
आसवांची एक माळ
डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती
आता दूरवर पांगलेली |
स्वप्नांची एक पालखी
अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती
आता एकांताला सारवलेली |
पुन्हा तीच भावना
नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई
आज पुन्हा त्यावर सांडलेली
                            लेखक - अज्ञात 

No comments:

Post a Comment