Sunday, January 22, 2012

मैत्री मध्ये ना खरं ना खोटं असतं

मैत्री मध्ये ना खरं ना खोटं असतं
मैत्री मध्ये ना माझं ना तुझं असतं

कुठल्याही पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं

मैत्री श्रीमंत किवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते..

कुठल्याही क्षणी पहा
मैत्री फक्त मैत्रीच असते..

रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही
पण मैत्री नात्यामध्ये प्राण असतो

म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
मैत्रीची नाती मात्र सदैव टिकतात..

No comments:

Post a Comment