Sunday, January 22, 2012

स्वप्न त्रास देतात म्हणून

स्वप्न त्रास देतात म्हणून माणूस स्वप्न बघायचे सोडतो का?
श्वास घेणे जसे जरुरी तितकेच स्वप्न बघणे हि जरुरी....
जे मिळालंय,जे काही पूर्ण आहे त्याची स्वप्न कुणी बघतं का?
थोड्या क्षणासाठी का होईना त्या अपूर्ण गोष्टी पूर्ण रुपात पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे "स्वप्न".

ज्या पूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त "आकर्षणाची केंद्रबिंदू" बनतात...
त्यांमध्ये काही बदल सुचवायचा नसतो...तितकी आपली कुवत हि नसते.
जग हे अपूर्णतेमुळे चालतंय...
जगातलं सगळं परीपुर्ण झालं कि समजावं,"आता जगबुडी दूर नाही.."
 

No comments:

Post a Comment