Sunday, January 22, 2012

एकदा तीन सरदार सहलीला जातात

एकदा तीन सरदार सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत, की ते “पेप्सी” घरीच विसरून आलेत म्हणून.

तिघांनी मिळून ठरवले की सगळ्यात छोटा सरदार जाऊन “पेप्सी” घेऊन येईल म्हणून.

छोटा सरदार : मी एका अटीवर जाईन, की मी परत येईपर्यंत तुम्ही समोसे खाणार नाहीत.

इतर दोघांनी लगेच होकार दिला.

२ दिवस झाले, सरदार नाही आला;
४ दिवस झाले, तरी सरदार नाही आला.

आता या दोघांना वाटले, की आता मात्र समोसे खायला हवेत. म्हणून त्यांनी समोसा उचलण्यासाठी हात पुढे केला.

तेवढ्यात छोटा सरदार झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला, “तुम्ही असं करणार असाल, तर मी नाही जाणार पेप्सी आणायला.”

No comments:

Post a Comment