Sunday, January 22, 2012

असे वेगळे नाते का म्हणून

खुप interesting गोष्ट आहे मित्रांनो, नक्की वाचा

एक जन एकाला फोन करतो,
३ वाजता चौपाटीवर सगळ्यांनी भेटायचे ठरवतो,
पण आम्ही सगळेच "भारतीय" असतो,
....५ वाजता अगदी न चुकता पोहचतो.
जमतो सगळा मित्रमैत्रीनींचा थवा अन,
हसून,खिदळून आम्ही आसमंत हलवतो,

मग कुणी तरी एक जन दगडावर चढतो,
Titanic ची पोज देऊन आकाशाकढे बघतो,
महागडा मोबाईलचा 5megapixel कॅमेरा बाहेर पडतो,
Facebook वरच्या अल्बम साठी जो तो हातभार लावतो,

मित्र मैत्रिणींचा हात एकमेकांच्या खांद्यावर पडतो,
बिचारा तो एकजण....कॅमेरामन बनतो,
दया येऊन त्याची...कुणीतरी मग "त्याग" करतो,
कॅमेरामन फोटोत जातो अन फोटोतला दुसरा ....बिचारा बनतो.

उजवीकडचा मध्ये येतो,मधला डावीकडे जातो,
लवकर लक्षात आले तर ठीक.....नाहीतर बिचारा बराच वेळ बिचाराच राहतो.
घरी जाताना ब्लुटूथ ON होतो,एक एक फोटो प्रत्तेक मोबाईल मध्ये येतो,
दुसऱ्या दिवशी अल्बम आम्ही Facebook वर टांगतो,
"आम्ही चौपाटीवर गेलेलो"...हे अख्या जगाला सांगतो.

पण एकत्र फिरलो,हसलो,एकमेकांशी खूप वेळ बोललो कि,आपण चांगले "मित्र-मैत्रीण" झालो...असे असते का???..नाही.
"मैत्री" कोणती?????......"मैत्री" म्हणजे ती....जी जवळ नसून पण नकळत जवळ असते.
एकमेकांशी रोज बोललो नाही तरी चालेल..पण त्या मित्राची/मैत्रिणीची एखादी आनंदाची खबर ऐकल्यावर मनाच्या खोलवरून जो आनंद होतो ना....ती मैत्री.

"पती/पत्नी" आणि "प्रियकर/प्रेयसी" या सगळ्यांपासून वेगळे.... "मैत्री" असे वेगळे नाते का म्हणून निर्माण झाले असेल????

हे जगातले एक शाश्वत सत्य वाटते.....कि....
"तुमचे तुमच्या प्रेयसीवर किंवा प्रियकरावर अथवा आईवडिलांवर कितीही खरे पेम असले
तरी.......................
आयुष्यात काही गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीला,पतीला,आईवडिलांना,प्रेयसीला,प्रियकराला नाही सांगू शकत,
पण त्याच गोष्टी "मित्राला किंवा मैत्रिणीला" सांगू शकता....आणि तेही न मागची पुढची कसलीही तमा ना बाळगता...."
"कसा आहेस किंवा कशी आहेस?" ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरोखरच तिथे थांबणारी...आणि खरंच त्या उत्तरात Interested असणारी....ती खरी "मैत्री"
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे 

No comments:

Post a Comment