Sunday, January 22, 2012

माझी प्रिये तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी

माझी प्रिये तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी

प्रिये तुझ्या आठवणीत
प्रिये तुझ्या आठवणीत चालत असताना
मला चार टाके पडले
रक्त वाया न घालवत
मी त्यानेच प्रेमपत्र रखडले
या सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्या आधी तुझ्या आठवणीत
एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस की
त्या झाडाची गोड फळे चाखणार आहे
जर तू माझी नाही झालीस तर ते झाड कापून मी
माझे चारशे रुपये मिळवणार आहे
प्रिये तुझ्या आठवणीत
मी तुला प्रेम पत्र लिहिणार आहे
त्या साठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाई वापरणार आहे
तुझा नकार असेल तर
माझा कागद परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तुझ्या आठवणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख वेक्त करणार आहे
अन लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे:):)

1 comment: