Friday, January 20, 2012

"आमचा महाराष्ट्र"

"ना मोठेपणासाठी
ना स्वार्थ साठी
जीव फक्त तडपतो
मराठी अस्मितेसाठी"
हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात,पण खचत नाही कधी हिम्मतअमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्हीएक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावाप्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्यमाणसाचा महाराष्ट्र
कार्य असे शिवबाचे
नाही कुणास जमायाचे
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे
छत्रपति शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा
                                                     आमचा महाराष्ट्र" - प्रहलाद सापरा
 

"शिवाजी"

. !!

"शिवाजी" महाराजन सारखा वारसा लाभलेल्या "मराठी" समाजासाठी ही जागा आहे !!
!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! जय महाराष्ट्र !!
!! लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे !!
************ पण कोण आपले राजे लक्षात ठेवा ************

$$ आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दान्ची ओळख करुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला, आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृती शिकवली, आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली, त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ओळख आहे.

$$ मी मराठी, माझी भाषा मराठी,मी बोलतो मराठी, माझे तन मन मराठी,माझी मराठी माझ्या आयुष्याची काटी,
या काटिला जर कोणी मोड़न्याचा प्रयत्न केला तर सुजवू त्यांच्या पाठी

.............
वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....
महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त राज असतो.

.............

$$ तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे............
मी मराठी आहे... मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.
धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई"
आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!!!!!!!

$$ तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची

इच्छा फक्त मराठ्यांच्या रक्तात होती, जय भवानी !
जय शिवाजी

तू रक्षियले देशाला

तू रक्षियले देशाला
न्यायनीती आदर्शाला
तू जगविले धर्माला ||

दुष्ट आक्रमक लोळविले
सज्जनांस तू वाचविले
राज्य आपुले स्थापियले ||

जातपात तुज मान्य नसे
प्रांतभेद तुज ठाव नसे
सर्वधर्म समभाव असे ||

देशाच्या एकत्वाचे
ध्येयपूर्तता करण्याचे
राज्य हिंदवी मोलाचे ||

महापराक्रमी तूच खरा
राजनीती चाणक्य खरा
त्यागाचा आदर्श खरा ||

तू प्रेरक नवतरुणांचा
तू प्रतिक चारित्र्याचा
राष्ट्रपुरुष या देशाचा ||

शिवरायाचा जयजयकार
जिजाऊचा जयजयकार
भारताभूचा जयजयकार ||

जय भवानी जय शिवराय

शिवाजी न होते तो

शिवाजी न होते तो सुनती होती सबकी

राखी हिन्दुवानी, हिन्दुवनको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले.

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपणच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे.

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे.

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे.

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे.

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे.

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे.
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते.
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते.

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते.
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती.
                                     लेखक -अज्ञात 

फेसबुक वरील प्रेम कहाणी

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख
झाली आपल्या Facebook माध्यमातून,,,,र ोजच
online बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले
कि एकमेकांशी गप्पा
मारल्या शीवाय ते रहात नसत…. या काळात अनेक
वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री
असे घडू लागले…किमान ३ ते ४ महिने हे असेच चालू होते…
परंतु त्या युवकाने
तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्या
मुलीने त्............य ाला विचारले. तू माझ्यावर प्रेम
करतोस? दोघांनी
एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले नव्हते. फक्त
फोटो पाहिले होते….तिच्या
त्या प्रश्नावर त्या युवकाने उत्तर दिले. हो.
करतो मी प्रेम तुझ्यावर म
त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू
का नाही बोललास ? युवक म्हटला मला
माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण
मी तुझ्यावर प्रेम करतो असे
सांगितले आणि तू मैत्रीही नाही ठेवली तर? अशा प्रकारे
दोन्ही बाजूंनी
होकार मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय.
लव. यु कडे वळला…..हळू
हळू फोन वर बोलन चालू झाल. आणि ओर्कुट वरील
मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय
न रहाण्याच्या शपथा हे दोघे
घेऊ लागले…
वेळ आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच
खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण असायचं…
हा मात्र कामामुळे जाऊ शकत
नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर
नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण
भेटायला जायचे….पुण्यातू न तो
मुंबईकडे निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती
वाटू लागली…..भेटीचे ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते
मोठे घड्याळ त्याच्या
खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन
थांबली होती….दोघांनी
एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून मिठीत
घेतलं…कदाचित अस होईल हे
दोघांना माहित नव्हत पण हे नक्की समजल…त्याच
तिच्यावर आणि तीच त्याच्यावर
खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं
हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी
असे उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास गेले….काय
बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न चिन्ह
दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर
आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर
कोणी बोलेना….शेवटी
युवकाने धाडस केले आणि बोलला…..महालक्ष
्मी च्या दर्शनानंतर हाजीमलंग झाल
आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास…
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम
करीत होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे
सांगून युवकासोबत फिरत
होती….शेवटी निरोप घेण्याची वेळ आली आणि…
पुन्हा V.T. station वरून
दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..
दोघांनीही तो दिवस
आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न
पुसण्यासाठी….अश ी हि पहिली भेट
झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू
झाल… एवढ झाल कि एकमेकांनी
लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस ठरवलं…
किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम
प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच नव्हे तर
तिच्या घरातील सर्वांशी
बोलू लागला…..फक्त तिचे बाबा सोडून….दररोज तासान
तास बोलन चालू असायचं….या
दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..ऑगस्ट मध्ये
त्यांनी engagement
करायची अस ठरवलं….नोव्हेंब र २००९
या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात
अडकणार होते.. एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू
शकले नाहीत….
दोघांनाही फार आठवण आली होती…
सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो
बंद होता आणि अकराच्या सुमारास
तिच्या बहिणीचा फोन आला….कि ती काल रात्री
ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……युवकाला काय
करावे सुचेना उठून
त्याने मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर
असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर किमान
७ दिवस या युवकाने
कोणाला काहीच
प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर तो ठीक
झाला परंतु कदाचित
अजून देखील एक फोन येईल अस वाटत असेल…..
तो तिला विसरू शकेल ? अशी हि
आपल्यातीलच एका युवकाची….. अधुरी एक
कहाणी.
                            साभार -सोमनाथ