"ना मोठेपणासाठी
ना स्वार्थ साठी
जीव फक्त तडपतो
मराठी अस्मितेसाठी"
हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात,पण खचत नाही कधी हिम्मतअमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्हीएक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावाप्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्यमाणसाचा महाराष्ट्र
कार्य असे शिवबाचे
नाही कुणास जमायाचे
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे
छत्रपति शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा
आमचा महाराष्ट्र" - प्रहलाद सापरा
No comments:
Post a Comment