माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Sunday, January 22, 2012
गौरवशाली महाराष्ट्र: खतरनाक प्रपोज....!!!
गौरवशाली महाराष्ट्र: खतरनाक प्रपोज....!!!: खतरनाक प्रपोज....!!! मुलगा- तु फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो.... मुलगी- अय्या खरंच...?? मुलगा- हो खरंच. . . . . . . . आणि...
खतरनाक प्रपोज....!!!
खतरनाक प्रपोज....!!!
मुलगा- तु फक्त हो म्हण,
सगळ्यांची वाट लावतो....
मुलगी- अय्या खरंच...??
मुलगा- हो खरंच.
.
.
.
.
.
.
.
आणि तु फक्त नाय म्हण.....
.
तुझी पण वाट लावतो...!
ती: तू माझ्याशी
ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...
ती: किती नालायक आहेस... काय मिळतं तुलामाझ्याशी भांडून...
तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
ती: हो ऐकलय...
तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...
तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक...
मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुलबोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...
मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...
अन
मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'
लेखक - अज्ञात
शब्दच हरवले
शब्दच हरवले माझे
तरि प्रयत्न करतो लिहिण्याचा,
ओठ मुके झाले माझे
तरि प्रयत्न करतो तुला सांगण्याचा,
आता तर जगच हरवलय माझं
तरिही प्रयत्न करतो तुला शोधण्याचा..!!!!!
लेखक - अज्ञात
एक हळवी आठवण
एक हळवी आठवण
एक हळवी आठवण
मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना
हृदयात खोलवर रुतलेली |
आसवांची एक माळ
डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती
आता दूरवर पांगलेली |
स्वप्नांची एक पालखी
अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती
आता एकांताला सारवलेली |
पुन्हा तीच भावना
नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई
आज पुन्हा त्यावर सांडलेली
लेखक - अज्ञात
चांगले मित्र मिळवायला
मैत्री
चांगले मित्र मिळवायला फार मोठे भाग्य लागतं.
तसंच भाग्य मला लाभलं असं मला वाटत असतं,
मित्र अनेक असतात, पण काही मोजकेच जीवनात येऊन जातात.
चांगल्या क्षणांची सांगडसुद्धा तेच घालून जातात.
भांडण झालं की थोडा वेळ त्यांच्यावर रुसायचं असतं.
कारण शेवटी त्यांच्यातच जाऊन मिसळायचं असतं.
प्रयत्न केला दूर जायचा तरी त्यांच्याच जवळ रडायचं असतं.
एकमेकांचं अश्रू झेलून, हसत पुढे जायचं असतं.
कोणाशी काही बिनसलं तेव्हाच मैत्रीचं खरं रुप पाहायचं असतं,
संकटकाळी एकमेकांचा हात घट्ट धरुन चालायचं असतं.
एखादं पाऊल डगमगलं तर ते पुन्हा वाटेवर आणायचं असतं.
चिमुकल्या गोष्टीने मैत्रीचे वैरात रुपांतर करायचं नसतं.
पण मैत्रीत हे एकच लक्षात ठेवायचं असतं.
विश्वास ज्याच्यावर टाकला त्याच्याशी प्रामाणिक रहायचं असतं.
ज्याच्याबरोबर हे घडत असतं त्याला फक्त मैत्री आणि मैत्री हेच नाव द्या —
संदर्भ - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
प्रेम .....मराठीतील एक शब्द ..
प्रेम .....मराठीतील एक शब्द ...पण किती महत्व आहे ना या शब्दाला .....!
प्रत्येकाला प्रेम करायचं आहे , त्याला जवळ बोलावयाचय ....त्याच्या
कुशीत डोक ठेऊन शांतपणे झोपी जावस वाटत....अशा किती तरी भावना आपल्या
मनात निर्माण होतात ....
मग निसर्ग नियमाने माणूस प्रेमात पडतोही ....
काहींना प्रेमाचं सुख मिळत तर काहींना प्रेमभंगाचा चटका .....
मुलांना वाटत मुली वाईट असतात तर मुली कुठल्याही मुलावर विश्वास
ठेवायला तयार नसतात .....
खर तर मित्रांनो ....
मुलांचं प्रेम हे काल्पनिक असत तर मुलींचं वस्तूस्थितीवर आधारित .....
आणि दोघेही बरोबर असतात ...प्रश्न येतो सामोपचाराचा ...पण ते होत नाही..
प्रत्येकाला आपला ' स्व ' अन " भविष्य " महत्वाच वाटत ...अन मग
त्यामुळे कुठेतरी या गोष्टींचा भडका उडतोच अन मग प्रेमाची वाट लागते .......
...प्रेम अन प्रेमभंग ही एकाच रथाची दोन चाके आहेत..... एक चाक उचलून
हाताला काहीही लागत नाही .....प्रेमभंगाचा चटका मात्र सतत भेटतो....
याचा विचार करा .....
आणि
" एकांती डोहात बुडणे हा प्रेमरोगावरील रामबाण उपाय कधीच होऊ शकत नाही ".....
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
जेव्हा तुम्ही प्रेम करता
♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ....
तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥
♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ....
तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥
...
♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ....
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥
♥ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न
करता, .... तेव्हा तुम्ही मिस
करायला लागता ♥
♥ आणि जेव्हा तुम्ही मिस
करायला लागता, ....
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता
♥ पुन्हा प्रेम करू लागता !!!
मजेशीर अर्थ :-
मजेशीर अर्थ :-
पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतरविश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.
लेखक - अज्ञात
एक विनंती आहे........
एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर
वेळच देऊ नका.....
एक विनंती आहे.....
साथ सोडुन जायचचं असेल तर
हाथ पुढे करुच नका .....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर
मनात आधी भरुच नका.....
एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms यांचा
कटांळाच येणैर असेल तर कोणाला नंबर
देऊ नका,....
Memory full झालिये सांगून
delet च करायचा असेल तर
नंबर save च करु नका.
एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......
एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........
एक विनंती आहे......
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर.....
आधी डाव मांडूच नको...
रागावून निघून जायचचं असेल तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....
एक विनंती आहे.....
सवयीच होईल म्हणून तोडायच असेल
तर...
र्कपया नातं जोडून नका
फाडून फेकून द्यायचं असेल तर....
माझ्या मनाचं पान उलगडूच नको....!!
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
Exam देताना सगळ्यात आनंदी क्षणकोणता माहितीये??
Exam देताना सगळ्यात
आनंदी क्षणकोणता माहितीये??
जेव्हा मित्राकडे कडे बघता नि तो आपल्याकडे बघून
हसतो आणि म्हणतो..
" च्यायला तुला पण काही येत नाही वाटतं...
मराठी कोण आहे माहिती आहे का?
मराठी कोण आहे माहिती आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज कि म्हंटल्यावर ज्याच्या तोंडातून अचूक "जय" येते तो मराठी!
ज्ञानेश्वर माउली पासून कुसुमाग्रजन्पर्यंत त्यांच्या कविता आणि अभंग आईक्ताना जो "तल्लीन" होतो ना तो मराठी!
शिवरायांचे शिवचरित्र वाचताना ज्या माणसाच्या अंगावर "काटा" येतो ना तो मराठी!
जो स्वतः काही करत नाही आणि अन्याय झाला कि सरकार ला शिव्या घालत बसतो आणि
जर दुसऱ्याने आवाज उठवला कि त्यालादेखील "शिव्या" घालतो तो मराठी!
सासूबाई (नव्या सुनेला)
सासूबाई (नव्या सुनेला): या घरात
मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच
सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्र तर
तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद
नियोजन मंत्रालय सांभाळते. तुला कोणतं खातं हवं?
सूनबाई : मी विरोधीपक्षात बसते.
माफी ची Application
माफी ची Application
.
" आदरणीय सर,
गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते,
.
... पण मी १०० रु.ची Movie बघितली,
.
१५० रु. ची बियर प्यालो,
.
५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला,
.
आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे,
.
पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला..,
.
आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......
.
१. माझी फी माफ....
२. नाही तर तुमचा पर्दाफाश....!!
.
तुमचा आज्ञाकारी.
.
तुमचा मुलीचा Boyfriend...
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
प्रेमाचा छंद
"निसर्गाला रंग हवा असतो
फुलला गंध हवा असतो ,
माणूसही एकटा कसा राहणार
त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो "
आयुष्यात प्रेम
"दाटून आलेल्या सायंकाली
अवचीत सोनेरी उन्ह पडत
असच कहीस पाऊल, न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत "
काही मिळवण्यापेक्षा
काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच
असते,बंद डोळ्यांनी कुणाची आठवण
करण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता...
खरंच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते..
परिचयातुन जुळते ती मैत्री..
परिचयातुन जुळते ती मैत्री....
विश्वासाने जपते ती मैत्री...
सुखात साथ मागते , आणि दुःखात साथदेते ती मैत्री....
चुकावर रागवते ती ,...यशावर सुखावते ती मैत्री.....,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री......
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री.....
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्रीँ !!
एकदा तीन सरदार सहलीला जातात
एकदा तीन सरदार सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत, की ते “पेप्सी” घरीच विसरून आलेत म्हणून.
तिघांनी मिळून ठरवले की सगळ्यात छोटा सरदार जाऊन “पेप्सी” घेऊन येईल म्हणून.
छोटा सरदार : मी एका अटीवर जाईन, की मी परत येईपर्यंत तुम्ही समोसे खाणार नाहीत.
इतर दोघांनी लगेच होकार दिला.
२ दिवस झाले, सरदार नाही आला;
४ दिवस झाले, तरी सरदार नाही आला.
आता या दोघांना वाटले, की आता मात्र समोसे खायला हवेत. म्हणून त्यांनी समोसा उचलण्यासाठी हात पुढे केला.
तेवढ्यात छोटा सरदार झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला, “तुम्ही असं करणार असाल, तर मी नाही जाणार पेप्सी आणायला.”
असे वेगळे नाते का म्हणून
खुप interesting गोष्ट आहे मित्रांनो, नक्की वाचा
एक जन एकाला फोन करतो,
३ वाजता चौपाटीवर सगळ्यांनी भेटायचे ठरवतो,
पण आम्ही सगळेच "भारतीय" असतो,
....५ वाजता अगदी न चुकता पोहचतो.
जमतो सगळा मित्रमैत्रीनींचा थवा अन,
हसून,खिदळून आम्ही आसमंत हलवतो,
मग कुणी तरी एक जन दगडावर चढतो,
Titanic ची पोज देऊन आकाशाकढे बघतो,
महागडा मोबाईलचा 5megapixel कॅमेरा बाहेर पडतो,
Facebook वरच्या अल्बम साठी जो तो हातभार लावतो,
मित्र मैत्रिणींचा हात एकमेकांच्या खांद्यावर पडतो,
बिचारा तो एकजण....कॅमेरामन बनतो,
दया येऊन त्याची...कुणीतरी मग "त्याग" करतो,
कॅमेरामन फोटोत जातो अन फोटोतला दुसरा ....बिचारा बनतो.
उजवीकडचा मध्ये येतो,मधला डावीकडे जातो,
लवकर लक्षात आले तर ठीक.....नाहीतर बिचारा बराच वेळ बिचाराच राहतो.
घरी जाताना ब्लुटूथ ON होतो,एक एक फोटो प्रत्तेक मोबाईल मध्ये येतो,
दुसऱ्या दिवशी अल्बम आम्ही Facebook वर टांगतो,
"आम्ही चौपाटीवर गेलेलो"...हे अख्या जगाला सांगतो.
पण एकत्र फिरलो,हसलो,एकमेकांशी खूप वेळ बोललो कि,आपण चांगले "मित्र-मैत्रीण" झालो...असे असते का???..नाही.
"मैत्री" कोणती?????......"मैत्री" म्हणजे ती....जी जवळ नसून पण नकळत जवळ असते.
एकमेकांशी रोज बोललो नाही तरी चालेल..पण त्या मित्राची/मैत्रिणीची एखादी
आनंदाची खबर ऐकल्यावर मनाच्या खोलवरून जो आनंद होतो ना....ती मैत्री.
"पती/पत्नी" आणि "प्रियकर/प्रेयसी" या सगळ्यांपासून वेगळे.... "मैत्री" असे वेगळे नाते का म्हणून निर्माण झाले असेल????
हे जगातले एक शाश्वत सत्य वाटते.....कि....
"तुमचे तुमच्या प्रेयसीवर किंवा प्रियकरावर अथवा आईवडिलांवर कितीही खरे पेम असले
तरी.......................
आयुष्यात काही गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीला,पतीला,आईवडिलांना,प्रेय सीला,प्रियकराला नाही सांगू शकत,
पण त्याच गोष्टी "मित्राला किंवा मैत्रिणीला" सांगू शकता....आणि तेही न मागची पुढची कसलीही तमा ना बाळगता...."
"कसा आहेस किंवा कशी आहेस?" ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरोखरच तिथे
थांबणारी...आणि खरंच त्या उत्तरात Interested असणारी....ती खरी "मैत्री"
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
खेळ मांडीयेला वाळवंटी..........
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे|
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे||
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा|
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे||
वर्ण अभिमान विसरलीया ती, एक एका लोटांगणी जाती|
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे||
होतो जयजयकार गर्जतो अंबर, मातले हे वैष्णव वीर रे|
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे||
-संत तुकाराम
आठवण
आठवण तुझी आल्यावर, मन माझे स्वतःशिच बोलत बसते,
सगळ्यांमध्ये असून सुद्धा, एकटे मला करून जाते,
जसे वाऱ्या संगे, खोल दरीत उतरून जाते,
तर कधी उडता उडता ढगान मध्ये निसटून जाते, ...
तू सोबत नसतेसच, पण मन वेडे, तू
असल्याचा आभास मज करून जाते,
तू असशीलही कुठे तरी, म्हणून कदाचित मन वेडे सगळी कडे भटकत राहते.
एकटी
एकटी
हि कथा आहे निकिता आणि संजयची.....आज सात वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर
आनंदओसंडून वाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत
होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत
असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला ते सांगायची हिम्मत
केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू
असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय
काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला
सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या
मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक
आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू
शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पण बंद
झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला
भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच
वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि निकिताच्या सर्व
अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा
ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला
कुणाची मदत पण नाही मिळाली. आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही
तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook
वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळाल होत कि आपले सर्व शाळेतले
मित्र-मैत्रिणी facebook वर आहेत. म्हणून तिनेही सर्च केल आणितिला आज
संजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून
आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे
त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून
खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणितिने संजयला भेटायला
बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय
लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पण तुझ झाल का
लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून
निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई
असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून
रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ज्या प्रेमाची
सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला?
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
राहूनच गेले.
सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
.........तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.......
लेखक = अज्ञात
खरंच मन किती वेडं असतं
¤ मन ¤
खरंच मन किती वेडं असतं,
कधी हसतं कधी रुसतं,
कधी ते आपल्याकडेही नसतं,
फिरत असतं इकडे तिकडे ..हवं ते मिळवण्यासाठी......
पण जे मिळत नसतं तेच का हवं असतं??
खरंच मन किती वेडं असत.
बायकोच्या कानाखाली एक जोरात
बायकोच्या कानाखाली एक जोरात लावल्यावर थोड्यावेळात तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला,
"माणूस त्यालाच
मारतो ज्याच्यावर तो खूप प्रेम करतो"
बायको नवऱ्याच्या कानाखाली दोन
लावते आणि म्हणते,
"तुम्हाला काय वाटते
हो..कि मी तुमच्यावर कमी प्रेम करते".
लेखक - अज्ञात
गावात वीज येणार असल्या मुळे
गावात वीज
येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते......
त्यात एक कुत्रा हि नाचत होता....
लोकांनी विचारले " तू का खुश आहेस ? ".........
त्यावर कुत्रा म्हणाला " वीज येईल तर खांब पण लागतील ना !
स्वप्न त्रास देतात म्हणून
स्वप्न त्रास देतात म्हणून माणूस स्वप्न बघायचे सोडतो का?
श्वास घेणे जसे जरुरी तितकेच स्वप्न बघणे हि जरुरी....
जे मिळालंय,जे काही पूर्ण आहे त्याची स्वप्न कुणी बघतं का?
थोड्या क्षणासाठी का होईना त्या अपूर्ण गोष्टी पूर्ण रुपात पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे "स्वप्न".
ज्या पूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त "आकर्षणाची केंद्रबिंदू" बनतात...
त्यांमध्ये काही बदल सुचवायचा नसतो...तितकी आपली कुवत हि नसते.
जग हे अपूर्णतेमुळे चालतंय...
जगातलं सगळं परीपुर्ण झालं कि समजावं,"आता जगबुडी दूर नाही.."
नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
बळेच लेकचर करणे ते पण डुलक्या मारत
लेकचर बंक करीत पोरीच्या मागे फिरत
पोरीने मात्र दगा करायचा मागच्या गेटने आत शिरत
नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
जर्नल पूर्ण करत तेही नाईट मारत मारत
चेक तरी कराना म्हणून म्याडेम च्या पाया पडत
शेवटच्या दिवशी मात्र ATKT साठीतरी अभ्यास करत
तीन तास पेपर लिहीत तरी अवघड होता म्हणून बोमबा मारत
नाहीत ना मिळणार ते दिवस आता परत
फर्स्ट क्लास हुकला म्हणून बसायचे रडत
ATKT तरी मिळाली म्हणून मात्र हसत हसत
जीवावर आले कॅम्पस सोडून जाताना डोळे पुसत
जगावे लागतेय आज कुणाच्या तरी पुढे नाक घासत
नाहीत ना मिळणार ते दिवस आता पर
लेखक - अज्ञात
आपण दोघे जेव्हा दुरावलो,
आपण दोघे जेव्हा दुरावलो,
तेव्हा ईश्वराने आपल्या दोघानां शिक्षा दिली..
फरक फक्त फक्त एवढाचं आहे की..?????
तुला मला विसरुन,
जाण्याची शिक्षा दिली..
आणि..?????
मला तुला आठवणीत,
ठेवण्याची शिक्षा दिली.
कोणाला मते देणार मग
कोणाला मते देणार मग
कोणत्याही व्यक्तीला कसे नियंत्रणात आणायचे या संबंधात आचार्य चाणक्य म्हणता
लुब्धमर्थेन गृह्णीयात् स्तब्धमंजलिकर्मणा।
मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।
जो माणूस संपत्तीचा लोभी आहे त्याला पैसे देऊन, घमंडी किंवा अभिमानी असेल
तर त्याच्यासमोर हात जोडून, मूर्खाला त्याचे म्हणणे मान्य करून आणि
विद्वानांना सत्य बोलून नियंत्रणात आणता येते.
आता विचार करण्यासारखी गोष्ट हि आहे. तुम्ही मतदान कोणाला करणार.
जर तुम्ही पैशाचे लोभी असाल तर पैसे वाटनाऱ्याला मते द्या.
घमंडी असला तर गोड बोल बोलणार्याला, मूर्ख असाल तर हाजी हाजी करणार्याला आणि जर
बुद्धीमान असाल तर सत्यवचनी मतदाराला.
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
भारताचा राष्ट्रीय ध्वजआणि त्यांचे बदलते स्वरूप
भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप
स्व.मादाम कामा यांनी शंभर वर्षांपूर्वी जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे
भरलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात भारतातर्फे भाग घेऊन
भारताचा म्हणून एक झेंडा त्या संमेलनात फडकवला. सामान्यपणे हा भारताचा
पहिला ध्वज मानला जातो. या घटनेला मागच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा साडेपाचशेहून अधिक संस्थाने शिल्लक होती. त्या
प्रत्येकाचा आपापला झेंडा होता. त्यापूर्वी किती तरी राज्ये ब्रिटीशांनी
खालसा केली असतील. इतिहासकालात किती राज्ये स्थापन झाली आणि लयाला गेली
याचा तर हिशेबच नाही. अगदी रामायण महाभारताच्या काळापासून ध्वजाची परंपरा
चालत आलेली आहेच.
स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात ब्रिटीश
राज्यकर्ते तर युनियन जॅकलाच सलाम ठोकत होते आणि सर्व भारतीयांनी तेच करावे
अशी त्यांची अपेक्षा व आज्ञा होती. त्यामुळे भारताचा वेगळा अधिकृत
राष्ट्रध्वज कोण ठरवणार? देशभक्तांच्या मनात राष्ट्रभावनेला सर्वाधिक महत्व
होते. अमक्या वा तमक्या रंगाला किंवा चित्राला तेवढे महत्व देण्याची गरज
नव्हती. आपला असा एक वेगळा ध्वज फडकावून त्याला वंदन करणे ही
राष्ट्रभक्तीची खूण होती. लेखात दिलेल्या चित्रांमधील क्रमांक १३ पासून २३
पर्यंतच्या चित्रांमध्ये दाखवलेल्या ध्वजांबरोबर मादाम कामा यांचा
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आलेला होता असे या लेखावरून दिसते. यात
दोन्ही प्रकारची रंगसंगती दिसते. तसेच कोठे कमळे तर कोठे सूर्य, चंद्र व
तारे दिसतात. ही सगळीच राष्ट्रीय प्रतीके आहेत.भारताला स्वातंत्र्य
मिळाल्यानंतर आपल्या राष्ट्रीय सरकारने तिरंगा झेंडा निश्चित केला आणि १५
ऑगस्ट १९४७ रोजी युनियव जॅक उतरवून तिरंगा झेंडा फडकवण्यात आला.
या लेखात दिलेल्या चित्रामधील ध्वज खालीलप्रमाणे आहेत.
१) आपला राष्ट्रध्वज
२) जम्मू काश्मीरचा ध्वज
३) क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज (१६००
)४) रॉयल बॅनर ऑफ इंग्लंड (१४०५-१६०६
)५) पहिला युनियन जॅक (१६०६-१६१२)
६) ब्रिटीश ईस्ट इंडियाचा झेंडा(१६१२-१८५८)
७) स्पेशल कॉमनवेल्थ फ्लॅग (१६४९-१६६०)
८) दुसरा युनियन जॅक (१६५८-१८०१)
९) तिसरा युनियन जॅक (१८०१-१९४७)
१०) बारीसालचा ध्वज (१९०६)
११) सिस्टर निवेदिता ध्वज (१९०६)
१२) सिस्टर निवेदिता व त्यांच्या विद्यार्थ्यांचा ध्वज
१३) स्वदेशी ध्वज
१४) कलकत्ता ध्वज (१९०६)
१५) हेमचंद्र दास कानुनगो नमूना ध्वज
१६) मॅडम कामा ध्वज (१८-८-१९०७)
१७) मॅडम कामा ध्वज (२१-८-१९०७)
१८) मॅडम कामा ध्वज (२३-८-१९०७)
१९) वीर सावरकर- मॅडम कामा ध्वज (१९०७)
२०) मॅडम कामा ध्वज (१९०८)
२१) गदर पार्टी ध्वज(१९०८)
२२) गुरू गोविंदसिंग जयंती मंडळ ध्वज
२३) मॅडम कामा ध्वज (१९०९)
२४) कोमागाता मारू ध्वज (१९१४)
२५) बर्लिन कमिटी (१९१५)
२६) होमरूल ध्वज (१९१६)
२७) होमरूल ध्वज-२ (१९१६)
२८) ध्वज चर्चा (१९१७)
२९) एस.एस.गलीया यांचा ध्वज (१९२०)
३०) पिंगळे केंकय्या यांचा ध्वज (१९२१)
३१) महात्मा गांधी यांचा ध्वज (१९२१)
३२) फ्लॅग कमीटीचा ध्वज (१९३१)
३३) टाइम्स वृत्तपत्रसमूहाचा ध्वज (१९३१)
३४) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा ध्वज (१९३१)
३५) इंडियन लिजन ध्वज (१९४१)
३६) ब्रिटिश इंडिया ध्वज (१९४५)
श्री.प्रमोद सावंत यांच्या लेखावरून.
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे फेसबुक
किती कठीण असतं
किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .
किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..
किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..
किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय...
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरून पाणी प्यायचय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
(लेखक - अज्ञात )
प्रेमाचे बारा महिने ...!
प्रेमाचे बारा महिने ...!
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत " ती " दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये " ती " माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली ...!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
" बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या , आता नविन बॉयफ्रेंड ,
नविन वर्ष नाही का आलं ?"
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!
(लेखक - अज्ञात )
वेडात मराठे वीर दौडले सात.....
वेडात मराठे वीर दौडले सात.....
त्या सात योद्धांची नावे.
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने
रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश
प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस
आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु
नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला
धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज
बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास
देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली.
त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल. शिवरायांनी म्हटल
होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".
हे
वाक्य वाचुनत्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले
भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.
मला GF हवी आहे साधी दिसणारी,
मुलगी मैत्रीण/gf
मला GF हवी आहे साधी दिसणारी,
काळ्या केसांची;
डोळ्यांची .......... .
जास्त प्रश्न न विचारणारी ,मराठीवर
प्रेम करणारी, उदार अंतः करणाची,
"बाहेरच खायला आवडत नाही मला" अस
बोलणारी, साधीच पण जीन्स घालणारी,
पुस्तकांवर
प्रेम असणारी,
माझ्या काहीच्या काही कविता फालतू
असल्या तरी;
"....... खरचं किती सुंदर कविताआहेत
तुझ्या, जणू काही दुसरा मर्ढेकर" अस खोट
खोट बोलणारी,
"हिंदी चित्रपट आवडत नाही मला ........
मराठीच आवडतात. पण तेही मी घरीच
बघते"
अस म्हणणारी, पावसात
भिजायला आवडणारी, "प्लीज
मला काही गिफ्ट घेवू नकोस" अस
म्हणणारी,
आणि .......... ब्रेकअपच्या वेळी........
"प्लीज मला समजून घे, माझ्या पुढे
दुसरा पर्याय नाही"
हे इतक्या सच्चाईने बोलणारी, कि ते
एकूणच तिच्या पुन्हा प्रेमात पडावं अस
वाटायला लावणारी, एक GF हवीआहे,
डोळ्यांची भाषा कळायला
डोळ्यांची भाषा कळायला
नजरेचे वार सोसावे लागतात
काय सांगायचं घायाळाला
अक्षर प्रेमाचे आपसुकच कळायला लागतात .
हृदयातील दुख जाणून घेण्यासाठी त्या हृदयात मन असवे लागते
आणि ज्याच्या कडे मन नाही तो काय दुसर्याचे दुख जाणणार
मुलगा: तुला माझ्या आयुष्यातील सुर्य व्हायला आवडेल
मुलगा: तुला माझ्या आयुष्यातील सुर्य व्हायला आवडेल
मुलगी: ..हो ! ,♥ ^_^
.
.
.
... .
.
मुलगा: मग माझ्यापासुन149, 597, 870.7 km दूर रहा
एक भारतीय एक पाकिस्तानी आणि एक बांगलादेशी पित बसले होते.
एक भारतीय एक पाकिस्तानी आणि एक
बांगलादेशी पित बसले होते.
पाकिस्तान्याने पिस्तुल काढले आणि सर्व गोळ्या हवेत उडवल्या व म्हणाला, "आमच्या येथे दगडे कमी आणि गोळ्या जास्त आहेत,
आम्ही कशाही उडवू शकतो."
बांगलादेशीने पिस्तुल काढले आणि दारुचे ग्लास उडविले आणि म्हणाला,
"आमच्या देशात ग्लासच्या फँक्ट्या आहेत आम्हाला त्याच ग्लासमध्ये दुसऱ्यांदा पार्टी करायची गरज नाही."
शेवटी भारतीयाने पिस्तुल
काढली आणि दोघानाही उडवले व म्हणाला,
" आमच्या देशात इतके
पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत की ,
त्यांच्याबरोबर परत पाटीं करायची गरज नाहीं..
एक विचार
एक विचार
मी अजूनही सिंगल आहे पण म्हणून काय
मी दुःखी नाही
.
.
मी अजूनही सिंगल आहे पण म्हणून काय
मीदुःखी नाही
.
.
मी तर विचार करतोय
त्या मुलीचा जी माझ्यासाठी सिंगल आहे
.
.
बिचारी ती किती आतुरतेने
माझ्या येण्याची वाट पहात आहे.
राहायला नाही घर आणि म्हणे
1) राहायला नाही घर आणि म्हणे लग्न कर !!!!!
2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!
3) वंशाला हवा दिवा, ही म्हणते ईश्श तिकडे जावा !!!!!
4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!
5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!!!
6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!
7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!!!!
8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!
9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!
10) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!
एकदा एका टीसीने
तिकिट
एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले -
"" आपण कुठे चालला आहात ?''
प्रवासी - "" जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''
टीसी - "" आपलं तिकिट दाखवा ''
प्रवासी - "" टिकिट तर नाही आहे ''
टीटी - "" तर चला माझ्या सोबत ''
मुसाफिर - "" कुठे ?''
टीटी - "" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''
प्रेम दिल्यानंतर
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे,
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी,
आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही त्याने तरी,
हसून त्याच्या परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्ष्या न ठेवता,
देत राहिल्याने प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत,
तरी निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते…
त्यादिवशी रात्री त्याचा अचानक
त्यादिवशी रात्री त्याचा अचानक
मेसेज आला.मला खुप बरे वाटले.
मी विचार केला कालचे भांडण
तो विसरला असेल पण
माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण
तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते
वाचल्यावर मी जास्त मनावर
दडपण न घेता लगेच रिप्लाय
केला: चालेल. त्याला माझा रिप्लाय बघून
हेच वाटलं असणार
की मला काहीच फरक पडत
नाही त्याच्या जाण्याने. पण
त्याला काय
माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेली. एवढा वेळात
त्या...चा एकही रिप्लाय
आला नाही, म्हणून
मी झोपण्यच्या तयारीत होते.
तेवढ्यात पुन्हा एक मेसेज
माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः "प्रेम हे
एका धनुष्याच्या बाणासारखा आहे.
तो बाण सरळ समोरील
व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध
घेतो. हा बाण ह्रदयात
घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात
यातना देऊन जातो." त्याचा मेसेज वाचुन कळले
की त्याला खुप दुःख झाले आहे.
पण
त्याला झालेल्या यातना मलाही झाल्याच
होत्या. म्हणुन मी लगेच
रिप्लाय केलाः "प्रत्येकाच्या जीवनातून
प्रेमाचा बाण एकदाच
धनुष्यातून
सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला.
पण तो निष्फळ ठरला.
एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का?" त्यानंतर त्याचा कधी रिप्लाय
नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न
कधी केला नाही. तात्पर्य:
प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात
जपुन ठेवा कारण
काढण्याचा प्रयत्न केला तर
मिळतात त्या फक्त यातना!!!!!
(लेखक- अज्ञात )
१ मुलगा १ मुलीला कमळाचे फुल देतो
१ मुलगा १ मुलीला कमळाचे फुल देतो........... ..... आणि ती मुलगी त्याच्या कानाखाली मारते !!!!!!!
तो मोल्गा (चिडून) : का मारलास मला हे तर भाजपचे चिन्ह दिले न!!!!!!!!!!
ती मुलगी : मानूनच मी तुला पण कांग्रेसचे चिन्ह दिले ना ............... . !!!!!!!!!!!!!
सरदारजीच्या मुलाला
सरदारजीच्या मुलाला शाळेतील गुरुजी तो गोंधळ घालत असल्याने चांगलच बडवतात.
मुलगा रडत रडत घरी येतो.
सरदारजी : घाबरू नकोस ! तू एका वाघाचा सुपुत्र आहेस.
मुलगा : हो पापा, गुरुजीसुद्धा हेच म्हणत होते की हे कुठल्यातरी जनावराचच कारट असणार.
मैत्री मध्ये ना खरं ना खोटं असतं
मैत्री मध्ये ना खरं ना खोटं असतं
मैत्री मध्ये ना माझं ना तुझं असतं
कुठल्याही पारड्यात तिला तोला
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं
मैत्री श्रीमंत किवा गरीब नसते
मैत्री सुंदर किवा कुरूप नसते..
कुठल्याही क्षणी पहा
मैत्री फक्त मैत्रीच असते..
रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही
पण मैत्री नात्यामध्ये प्राण असतो
म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात
मैत्रीची नाती मात्र सदैव टिकतात..
एक मराठी दिग्दर्शक
एक मराठी दिग्दर्शक आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान आणि इम्रान खान यांना घेऊन सिनेमा काढतो.
त्याचं नाव काय असेल?
??
खानावळ!!
बायको : काय हो, मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल का?
बायको : काय हो, मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न कराल का?
नवरा : नाही.
बायको : असं का?
...
नवरा : बरं, करेन. मग तर झालं?
बायको : माझे दागिने तिला द्याल?
नवरा : बघूया.
बायको : माझे कपडे, शूज?
नवरा : ते तिला कसे होतील? तुझ्यापेक्षा खूप बारीक आहे ती.
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का?
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो 'लव' विषयी काही माहिती आहे का?
विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर.
मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय?
विद्यार्थी: होय सर.
मास्तर: मग नीट ऐका... 'लव' हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी 'रामायण' वाचा
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बागेत.....
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बागेत
फिरत होती..इतक्यात चिंगीचा नवरा आला..
आणि त्याने
तिच्या बॉयफ्रेंडला मारायला सुरुवात केली..
चिंगी - मारा साल्याला..आपल्य
ा बायकोला फिरवत नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंडला जोश आला आणि त्याने
तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)
चिंगी - मार साल्याला...
स्वतः तर फिरवत
नाही..आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही...
माझे प्रेम..
माझे प्रेम..
चौवीस तासवाले,
ए.टी.एम कार्ड नाही..
पंचेचाळीस रात्रीवाले,
आँलआऊट नाही..
लाईफटाईम वाले,
सिमकार्ड नाही..
माझे प्रेम तर..?????
एल.आय.सी आहे..!
जिवनाच्या सोबत ही,
जिवनाच्या नंतर ही..
एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि .......
एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि साधुजवळजाउन बसला.
तो साधु दुःखी स्वरात त्याला म्हणाला, "बाळ तुला ठाउक नाही की, तू सरळ
नरकात जात आहेस."
हे ऐकुन तो दारुड्या उठला
व जोराने ओरडला"ड्रायव्हर, बस थांबव.
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय!"
एक मुलगा असतो त्याचं नाव असतं........
एक मुलगा असतो त्याचं नाव असतं 'चड्ड्या'.
एके दिवशी तो शाळेत जातो आणि फक्त त्यानेच होमवर्क केलेला असतो.
मग टिचर म्हणते "चड्ड्या सोडून सगळ्यांनी उभे रहा"...
गर्दीत चालता चालता झंप्या.....
गर्दीत चालता चालता झंप्या भाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
झंप्याभाऊ : sorry
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
... झंप्याभाऊ घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा
त्या मुलीला धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक.
झंप्याभाऊ (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?
माझी प्रिये तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी
माझी प्रिये तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी
प्रिये तुझ्या आठवणीत
प्रिये तुझ्या आठवणीत चालत असताना
मला चार टाके पडले
रक्त वाया न घालवत
मी त्यानेच प्रेमपत्र रखडले
या सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्या आधी तुझ्या आठवणीत
एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस की
त्या झाडाची गोड फळे चाखणार आहे
जर तू माझी नाही झालीस तर ते झाड कापून मी
माझे चारशे रुपये मिळवणार आहे
प्रिये तुझ्या आठवणीत
मी तुला प्रेम पत्र लिहिणार आहे
त्या साठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाई वापरणार आहे
तुझा नकार असेल तर
माझा कागद परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तुझ्या आठवणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख वेक्त करणार आहे
अन लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे:):)
शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
मुलगा:हत्ती
शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात????
मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत !!!!
.
.
.
.
.
.
शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे..
स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं .......
स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं गटा-गटाने (Groupwise) त्यांना दिलेल्या विषयांवर प्रेझेंटेशन चालू होतं.
एका गटाचं प्रेझेंटेशन झालं.
सरांना ते काही आवडलं नाही.
सर : हे बघा, जो दुसर्यांना आपलं म्हणणं समजून सांगू/देऊ शकत नाही तो मूर्ख असतो.
एक विद्यार्थी : काय सर? काही समजलं नाही..
पुजरयाला
पुजरयाला हगवन लागली , पुजारी डॉक्टर कड़े औषध घेण्यास गेला. डॉक्टर ने औषध वैगेरे दिलं -
पुजरयाने विचारलं - '' कही पथ्य वैगेरे ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर - '' तसं काही विशेष नाही , फ़क्त तो शंख जरा हलू वाजवत चला ''!!!!!!!!
हुशार मुलगा एकदा मार्केट मध्ये
हुशार मुलगा एकदा मार्केट मध्ये एका अनोळखी मुलीला
हुशार मुलगा:माझी गर्लफ्रेंड हरवली आहे, तू जरा २ मिनिट माझ्याशी गप्पा मारतेस का???
मुलगी (संतापून ): का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हुशार मुलगा: कारण मी जेव्हा केव्हा मुलीशी बोलत असतो माझी गर्लफ्रेंड आपोआप मला कुठूनही शोधून काढते..
हुशार मुलगा:माझी गर्लफ्रेंड हरवली आहे, तू जरा २ मिनिट माझ्याशी गप्पा मारतेस का???
मुलगी (संतापून ): का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हुशार मुलगा: कारण मी जेव्हा केव्हा मुलीशी बोलत असतो माझी गर्लफ्रेंड आपोआप मला कुठूनही शोधून काढते..
मागच्या आर्थिक वर्षात
मागच्या आर्थिक वर्षात मुंबईतून केंद्राला अंदाजे सव्वा लाख कोटी रुपये महसूल गेला आहे. महाराष्ट्रावर अडीच-पावणे तीन कोटी रूपये कर्जाचा बोजा आहे, म्हणजे दोन वर्षे हाच महसूल महाराष्ट्राला मिळाला तरी महाराष्ट्र कर्जमुक्त होऊ शकतो. ते तर होत नाहीच उलट मुंबईलाही मागच्या पाच वर्षात फक्त एक हजार कोटी रुपये म्हणजेच वर्षाला फक्त दोनशे कोटी रुपयेच केंद्र सरकार देते. मागची अनेक वर्षे कुठल्याही प्रकारची करवाढ मुंबईकरांवर लादली नाही, एवढी कामे केली तरीपण मुंबई महानगरपालिकेवर एकाही पैशाच कर्ज नाही. ही उध्दवसाहेबांच्या नेतृत्वाची कमाल आहे.
Subscribe to:
Posts (Atom)