वेडात मराठे वीर दौडले सात.....
त्या सात योद्धांची नावे.
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने
रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश
प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस
आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु
नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला
धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज
बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास
देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली.
त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल. शिवरायांनी म्हटल
होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".
हे
वाक्य वाचुनत्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले
भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.
No comments:
Post a Comment