मजेशीर अर्थ :-
पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतरविश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.
लेखक - अज्ञात
No comments:
Post a Comment