Sunday, January 15, 2012

कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांना जागवूनी बोलले दव
"उरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, तोरा गुलाबाचा असावा
नि मोहाच्या फुलांचे धुंद आसव

अता उमलावयाची वेळ झाली
सख्याचे नादती बागेत पदरव

मधाचे बोट आता खूप झाले
उधाणू दे मधाचा मत्त अर्णव

दवाचा स्पर्श अन्‌ चुंबन अलीचे
कळी खुलते नि घडतो संगमोत्सव

धुक्याच्या चादरीने फूल झाकी
जणू उन्मीलितेचे तृप्त सौष्ठव

जराही ना दुखवता फूल खुडणे
असे याहून काही हस्तलाघव ?

किती, 'भृंगा', तुझी, रे, दांडगाई
अशा वेळी हवे रेशीम मार्दव...

कवी: मिलिंद फणसे

ही कुठली दुनिया असली?


कामिनी फडणीस-केंभावी उर्फ श्यामलीची ही काव्यरचना वाचून मला सुचलेली चाल ऐका.

स्पंदनात घुमते मुरली
दरवळतो ऋतू एकांती
ना चौकट याला... कसली
ही कुठली दुनिया असली?

लडिवाळ दिशा बोलती
फुलपान सवे गुणगुणती
ही कसली भाषा... इथली?
ही कुठली दुनिया असली?

हा कसला अजब जिव्हाळा?
मन फुलते; पाणी डोळा
ही ओढ कशी... आगळी?
ही कुठली दुनिया असली?

कवयित्री: कामिनी फडणीस-केंभावी(श्यामली)

आज अचानक जागी झाली

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||

दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||

भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||

नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||

निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||

असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?

कवयित्री: क्रान्ति

शाश्वत

खळाळते जलतरंग सुंदर
स्वरलहरींचे मोती उधळत
कणाकणातुन छेडित येती
स्वर्गीचे संगीत अनाहत

दुग्धधवल धारांचे नर्तन,
हिरवे-काळे कातळ उजळत
रुद्रजटेतिल गंगेसम ते
भव्य-दिव्य सौंदर्य अनवरत

हिमकण जैसे तुषार झेलुन
पर्णपाचुचे किरण चकाकत
इंद्रधनूची रंगसंगती
लेवुन वृक्षलताहि सुशोभित

अमोघ अस्त्रापरी कोसळे
तो घनघोर प्रपात अखंडित,
स्तंभित अन नि:शब्द उभी मी,
अशाश्वतातिल शाश्वत शोधत!

कवयित्री: क्रान्ति साडेकर

अंतराळ !

अंतराळ !


अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे

चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे ॥


या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा,

साद देतसे दुरून आमंत्रण पक्षांचे ॥


वाजते दिशांमधून मंद धून वार्‍याची,

इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे ॥


संथ या जलाशयात नाव बुडे किरणांची,

भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे ॥


पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते,

बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे ॥


मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,

अवघ्या काही क्षणांत होइल ते विश्वाचे ॥

कवयित्री: क्रान्ति साडेकर

सोबत: माझी चाल-शंभरी!

मी पुसट पुसट शब्दांचे अन्वयार्थ शोधत होते,
हातावरच्या मिटलेल्या रेषांना जोडत होते

केव्हाच संपली होती पुनवेची अल्लड गाणी,

अवसेचे दार बिचार्‍या चंद्राला रोखत होते

टाकून देववत नव्हते निर्माल्य ओंजळीमधले,

ताज्या स्वप्नांची परडी हातातुन सोडत होते

आजन्म चालला माझा हा खेळ विचित्रपणाचा,

तुटलेले जोडत होते, जुळले की तोडत होते!

"ती हरली आहे, आता शेवटचा घाला घालू"

ते दैव पाशवी माझे कोणाशी बोलत होते?

मायेच्या पाशामधली एकेक वीण सोडवली,

विरल्या आशेचे थडगे जाताना सोबत होते!

कवयित्री:
क्रान्ति साडेकर

टाळले सार्‍या दिशांनी




टाळले सार्‍या दिशांनी सांगणे माझे
आणि झाकोळून गेले चांदणे माझे

हारला तो डाव, त्याची चूक ही नाही,
चूक होती डाव त्याचा मांडणे माझे!

ऐन मध्यान्हीच गेला सूर्य अस्ताला,
त्या क्षणाला सिद्ध झाले थांबणे माझे

जाणत्यांनी जाणले नाही, न जाणे का?
जाणिवांचा उंबरा ओलांडणे माझे!

मी तुला भेटून येताना मुकी होते
रात्र माझी, चंद्र माझा, चांदणे माझे!

कोणत्या माझ्या चुकीची ही सजा आहे,
दैव एका वादळाशी बांधणे माझे?

कवयित्री: क्रान्ति

सारे संपले!


ती म्हणाली काल जेव्हा, "चालले",
खोल या हृदयात उठली वादळे

"येत नाही, तोच घाई जायची
रीत कसली ही तुझी समजायची?"
"सोड ना रे, वाट अंधारायची!"
का तुला माझी असोशी ना कळे?
खोल या हृदयात उठली वादळे

"रंगते मन आजही भासामध्ये
श्वास माळू दे जरा श्वासामध्ये"
"अर्थ आहे या खुळ्या ध्यासामध्ये?"
जाणतो, आशा तरी ना मावळे!
खोल या हृदयात उठली वादळे

"हात हाती राहु दे, सोडू नको,
हास्य या ओठांतले मोडू नको!"
"जीवनाची वेस ओलांडू नको!
थांब ना, अडती तुझीही पावले!"
खोल या हृदयात उठली वादळे

"तो उभा दारी, कसे थांबायचे?
तो जिथे नेईल तेथे जायचे
तू मला स्मरणात सांभाळायचे!"
एवढे बोलून सारे संपले!
खोल या हृदयात उठली वादळे

कवयित्री: क्रान्ति

मनाच्या अवस्था

मनाच्या अवस्था
आसक्ती विरक्ती
विठू तुझी भक्ती
हेच सत्य ||

तुझ्या दर्शनाचा
अहोरात्र ध्यास
येताजाता श्वास
नाम जपे ||

नको नको झाला
मायेचा पसारा
भौतिकाचा सारा
डामडौल ||

प्रपंच मी केला
नेटकाच देवा
आता तुझी सेवा
हेच ब्रीद ||

तुवा सोपविले
कार्य पुरे होई
निजधामा नेई
पांडुरंगा ||

                       
                                                                      कवयित्री: क्रान्ति

एकदंत, वक्रतुंड

एकदंत, वक्रतुंड रूप गोड गोजिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || धृ ||

ताल देतसे समीर, रुणझुणती घाग-या

चंचल चपला उतरे पावलांत नाच-या
सोनसाखळ्या चरणी, त्यांत जडविले हिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || १ ||

मनमोहक हावभाव, मूक तरी बोलके

माय - तात गौरी-शिव पाहतात कौतुके
गिरकी घेता गणेश, सकल विश्वही फिरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || २ ||

सूर्य-चंद्र, गगन-धरा, गिरि-सागर दंगले

तीन लोक नृत्याच्या मोहिनीत रंगले
दिन-रजनी विसरुनिया काळ नर्तनी विरे
तुंदिलतनू श्रीगणेश नृत्य करी साजिरे || ३ ||

कवयित्री: क्रांति साडेकर
चाल : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर

गिरीजासुता गौरिगणेशा

गिरीजासुता गौरिगणेशा 
नमन तव चरणी हे प्रथमेशा ||धृ||

करुणा तुझ्या विलसते नयनी 
खुलतसे हास्य मधुर गजवदनी
भवसागरी तारिसी विघ्नेशा ||१|| 

प्रभु मोरया मंगलमूर्ती 
तव दर्शनाने जागत स्फूर्ती
मज ज्ञान दे, वरदा, गुणेशा ||२||

कवयित्री: क्रांति साडेकर

सावली

सावली

भारलेली रात्र सारी चंद्र आहे संगती,
गारवेला गार वारा वाहतो सभोवती,
पारिजाता पालवीची आस आहे लागली
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

चांदणे पाण्यात बघता भास होई अंतरी,
गूज काही सांगण्यासी नभ उतरले भू वरी,
हलकेच काही बोलणारी रात्र कैसी रंगली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

गाज येई सागराची धुंदल्या तालावरी,
बोल सारे रेखणारी लाट होई बावरी,
त्या किनार्‍याच्या शिवारी प्रेमवीणा गूंजली,
धुंद सारा क्षण परंतु, तूच नाही, सावली..

कवी:राघव

सावली...

सावली...
===========

आयुष्यात आपल्याला बरीच अनोळखी माणसे भेटतात,
कालांतराने तेच अनोळखी चेहेरे आपल्या आयुष्याचा एक भाग होतात.
वेळेनुरूप काही साथ सोडून जातात, तर काही आपले आयुष्यच होतात..
पण, त्याहूनही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला साथ देते...
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत....
ती म्हणजे.....'सावली'

ऋतू बदलतात तसे आपले दिवस बदलतात,
त्यानुरूप माणसे बदलतात, त्यांचे आपल्याशी वागणे बदलते
इतकेच नव्हे तर आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांचा
आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे....."सावली"

ग्लास पाण्याने अर्धा भरलेला असो वा रिकामा,
मिष्टान्न भोजनाचा योग असो वा असो खावयास मुठभर चुरमुरे
घालावयास मिळो रेशमी वस्त्रे वा असो "पुरानी जीन्स "
तेंव्हाही आपल्याला साथ देते
ती म्हणजे....."सावली"

सर्वांबरोबर असूनही एकटीच असते...

ती म्हणजे....."सावली"
 

एक खवट सासू

एक खवट सासू तिच्या सुनेला म्हणते..
" अगं ए बाई..हे काय बनवला आहेस ..जेवण आहे की शेण ".
.
.
.
.
.
.
.

सून पण तितकीच फाटक्या तोंडाची असते..
ती लगेच म्हणते, " अरे देवा ! या बाईने सगळंच चाखलेले दिसतेय..

"ऋण"

कविता प्रसिद्द कवी 'श्री.दि.इनामदार' यांची आहे

"ऋण"

तुझ्या शेतात राबुण
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात॥१॥

नाही राजा ओढवत
चार पाऊले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर॥२॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईली ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारू शिवी॥३॥

माझा घालवाया शीण
तेव्हा चारलास गुळ
कधी घातलीस झुल
कधी घातलीस माळ॥४॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चितींत॥५॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे॥६॥

बॉसने सेक्रेटरीला फोन केला

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावीचाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेरचालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.''
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.''
आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडामी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.''
नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''
आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ''माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता...

प्रेमाचा डबल बार...

प्रेमाचा डबल बार... प्यार-पैसा और पंगा......................
.........


लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!


१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.

२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.
३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.
४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.
५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.
६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.
७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.
८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.
९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.
१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.
११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.
१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.
                                                     (सौजन्य. कल्पराज पेनसलवार )

" आई "

"छोटस गोंडस बाळ (जन्मायच्या आधी ) :- देवा, त्यांनी मला सांगितले कि मी आता पृथ्वीवर जाणार आहे, पण मी कित्ती छोटीशी आहे रे ......... मला चालता पण येत नाही आणि बोलताही येत नाही !!
देव :- एक सुंदर परी तुझी काळजी घेईल, ती तुझे सदैव रक्षण करील.
बाळ :- देवा, त्या सुंदर परीला मी काय म्हणून हाक मारू ?
देव :- तू त्या सुंदर परीला " आई " आशी हाक मार !!" ♥ ♥ ♥
 

मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.

मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.
आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते.
..
..
..
... ..
..
..
..
..
..
..
..
मोबाईल पाण्यात टाका किँवा
पाणी मोबाईल मध्ये टाका
वाट तर मोबाईल ची लागते..

*किलीँग शायरी*

*किलीँग शायरी*

जेवताना जरा मांडी घालुन बसावे..

गौर फर्मायेँ जरा...

जेवताना जरा मांडी घालुन बसावे..
.
.
.
.
.
.
आणि भिँतीवरी नेहमीचं कालनिर्णय असावे..!!

प्रेमात ब्रेक अप कधी आमच्या आलंच नाही...

प्रेमात ब्रेक अप कधी आमच्या आलंच नाही...
ब्रेक अप होण्याइतकं प्रेम कधी आम्ही कोणावर
केलंच नाही...!!
तिच्या बरोबर हसलो खेळलो नाचलो, पण
प्रेमात पडलो नाही...
... तिच्यावर कविता लिहिल्या पण i love you
म्हटलं नाही...!!
तिच्या लग्नातही आम्ही खूप नाचलो,
किंचितही थकलो नाही...
त्या नंतर हि आमचं ब्रेक अप झालं असं कधी म्हटलं
नाही...!!
ब्रेक अप माझ्या मते कधी प्रेमाचं होत नाही...
ब्रेक अप करणाऱ्यांना कदाचित प्रेमच अजून कळलं
नाही...!!
त्यागावर आधारित प्रेम आज कल कोणी करतच
नाही...
स्वार्थासाठी ब्रेक अप, पण प्रेमासाठी प्रेम
कोणी करतच नाही...!!

आपलंही कुणी असावं...

आपलंही कुणी असावं...

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं.

२ इंजीनीयरिंग चे विद्यार्थी गप्पा मारत असतात..

२ इंजीनीयरिंग चे विद्यार्थी गप्पा मारत असतात..
.
.
१ला विद्यार्थी - 'चायला फार बोर होतंय....आज काहीतरी खतरनाक आणि धोकादायक काम करूयात..'
.
.
.
२रा विद्यार्थी - 'अस म्हणतोस..चल तर मग...अभ्यास करू..!!'

मी शेतात , तू मनात ,

मी शेतात ,
तू मनात ,
मन वाऱ्यात ,
वारा थरथरतो हिरव्यागार कणसात ......
कणीस पानात ,
पाने ताटात ,
ताटे मुळात ,
तरीही नाचतात मिळून आपल्यात ........
वारा जोरात ,
गेला पक्षात ,
पक्षी नभात ,
गातात गाणी मिळून आपल्यात ........
वारा पाण्यात ,
पाणी ओढ्यात ,
ओढा गाण्यात ,
थांबलो आपण त्याची गोडी घेण्यास .....
सोडून एकमेकास ,
आपण पाणी पिण्यास ,
वारा पुढे जाण्यास ,
निघाला दुसरे सोबती करून घेण्यास .......

हुशार मुलगा

हुशार मुलगा:माझी गर्लफ्रेंड हरवली आहे, तू जरा २ मिनिट माझ्याशी गप्पा मारतेस का???
मुलगी (संतापून ): का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

हुशार मुलगा: कारण मी जेव्हा केव्हा मुलीशी बोलत असतो माझी गर्लफ्रेंड आपोआप मला कुठूनही शोधून काढते

एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन..

एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सन..
..
..
..
..
..
..
..
..
परीक्षा..
..
..
..

दिवे पण लागतात..
फटाके पण फुटतात..
Band पण वाजतो..
आणि
घरचे आरती पण ओवाळतात

दगडाने डोकेही फुटतात, पण..?????

दगडाने डोकेही फुटतात,

पण..?????

त्याचं दगडाची जर
मूर्ती बनवली तर,

लोक त्यावर डोके टेकतात..

हे आपलं आपणचं ठरवायचं,

आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय..

की..?????

सर्वाना नतमस्तक करणारी मूर्ती..

मैत्रीण ......

मैत्रीण

Miscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी ,
हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out
करणारी ,
मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट
दुखेपर्यंत हसवणारी ,
काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात
ठेवणारी ,
आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी ,
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर न
चिडणारी ,
थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी .

एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता

एकदा भगवान विष्णू
आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु
असतो.
लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि " जग
चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे)
......... ज्या माणसाकडे पैसा नाही,
संपत्ती नाही....... त्याला काही किंमत
नाही. माणूस ओळखतो........ जाणतो.......
आणि बोलतो ते फक्त पैशानेच. "
यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि "
असं काही नाहीये. "
पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून
देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच
जास्त महत्व आहे.
तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत
म्हणून लक्ष्मी माता म्हणते, " ठीक आहे.
मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य
कराल? "
विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल.
"
त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक
दृश्य दाखवते. - एक शोकमग्न
अंत्ययात्रा चालली असते...............
लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव
सुरु करते.... आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे
लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे
गोळा करू लागतात.
लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत
म्हणते, " पाहिलंत? पैश्या समोर माणूस
आपण कोणाला तरी कायमचे गमावून
बसलोय हे दुखः देखील विसरतो."
" अगं पण त्या चौघांच काय? जे मृत
देहाला खांदा देऊन आहेत? ते तर
नाही ना वाकले पैसे उचलायला? " विष्णू
भगवान म्हणाले.
लक्ष्मी माता म्हणली, " ठीक आहे....... हे
घ्या." एवढे म्हणून लक्ष्मी मातेने
खांदा दिलेल्या त्या चौघांसमोर
धनाचा वर्षाव सुरु केला.............
त्या चौघांनी प्रेत बाजूला ठेवलं आणि जमेल
तितके पैसे गोळा करायला सुरुवात केली.
यावर लक्ष्मी मातेने आपण
जिंकलो या अविर्भावात भगवान
विष्णूंना प्रश्न केला, " आता तरी पटलं? "
" अजून ही एकजण बाकी आहे......... "
दृश्याकडे पाहत विष्णू भगवान म्हणाले. "
तो जो तिरडीवर झोपलाय.... तो तर
नाही उठला पैसे उचलायला? "
लक्ष्मी माता म्हणली, " तो उठेल
तरी कसा? तो मृत आहे. त्याच्या शरीरात
आत्माच नाहीये. "
तत्क्षणी भगवान विष्णू म्हणाले, [ हे
जरा काळजी पूर्वक वाचा! ]
" हेच तर सांगायचं मला, जो पर्यंत
मी शरीरात आहे तो पर्यंतच
तुला ( पैश्याला/संपत्तीला ) मान
आणि किंमत. ज्या क्षणी मी मनुष्य देहातून
अंतर्धान
पावलो त्या क्षणी त्या मनुष्यासाठी पैसा मातीमोल.
माणसा बद्दल हेच तर आश्चर्य आहे
कि तो पैश्यासाठी जीवन
पणाला लावतो पण मग तोच
पैसा त्याचा जीव का नाही वाचवू
शकत.........................? आयुष्य
जगताना तो असा जगतो कि कधीच
मरणारच नाही.........
आणि मरताना असा मरतो कि कधी जगलाच
नाही.........."
.
काय? खरय ना............?
मित्रांनो मला ही गोष्ट
सुचन्यामागची कारणे अशी की,
मी जेव्हा रोज ट्रेन ने प्रवास करतो.......
तेव्हा मी पाहिलेले प्रसंग आणि अनुभव.
आणि फक्त ट्रेन चा प्रवास नाही, तर इतर
अनेक ठिकाणीसुद्धा. माणूस पैश्यामागे
धावतोय................... अक्षरशः धावतोय
आणि दम लागून जीव सोडतो.
कमावलेला पैसा तुम्ही प्रेम करत
असलेल्या जिवलगांना सुख संपत्ती देऊ
शकतो, पण या खटाटोपात कायमचे दूर
गेलेल्या कुणाच्या तरी बाबाला, दादाला,
नवऱ्याला, मुलाला.............. नाही परत आणू
शकत.
यावर नक्की विचार करा.
आणि पैश्यापेक्षा सुद्धा लाख
मोलाचा असलेला आपला जीव
आणि आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्ती यांची काळजी घ्या.

प्रेम विरुद्ध दारू..

प्रेम विरुद्ध दारू..
प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..
प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..
... प्रेम - एका डेट चे रु. २०००/- दारू - एका बाटलीचे ३५०/-
प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..
निर्णय आपल्या हातात आहे
पियो सर उठाके जिओ लडखडाके..
कोणती पण एक साईड घ्या आणि एकच कमेंन्ट
द्या..

मुलगी म्हणजे नक्की कशी असते ? ♥

मुलगी म्हणजे नक्की कशी असते ? ♥
तिचा प्रियकर
तिला मिळायच्या आधी मुलगी म्हणते, :-
माझा प्रियकर परफेक्ट असायला हवा
त्यानी माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त
प्रेम करावे
त्यानी मला कधी कध्धीच रडवू नये
त्याने मला नेहमी समजून घ्यावे
पण तिचा प्रियकर तिला मिळाल्या नंतर
ती म्हणते, :-
तो परफेक्ट नसला म्हणून काय झाले ??
तो माझा आहे ...कारण मी त्याच्यावर खूप
प्रेम करते
तो माझ्यावर जास्त प्रेम करत
नसला म्हणून काय झाले ??? मी तर करते
ना .......
तो समजून घेत नसला म्हणून काय
झाले???? मी तर समजून घेत आहेना........
आणि नेहमी समजून घेत राहील, Coz I
lov him a lot. ♥ $ ♥ ♥
अशा असतात मुली ......

तो खरा मराठी मुलगा असतो

तो खरा मराठी मुलगा असतो
जो Goggle मध्ये नाही छान दिसला
तरी फेट्यावर छान दिसतो,

तो खरा मराठी मुलगा असतो.
... जो "Hi Dude","whats up" न बोलता,
"मित्रा" अशी हाक मारतो,

तो खरा मराठी मुलगा असतो.
जो टवाळेगिरी कितीही करो पण
तो मंदिरात नक्की हात जोडतो,

तो खरा मराठी मुलगा असतो.
जो "आई-बहिणी" वरून कुणी गेला
तर समोरच्याची हाडं तोडतो,

तो खरा मराठी मुलगा असतो.
इंग्रजी भले तो हळू आवाजात बोलतो,
पण "शिवाजी महाराज कि जय" हे कणखरपणे जोरजोरात बोलतो,

तो खरा मराठी मुलगा असतो.
मुलगी जरी जीन्समधली आवडली,
तरी आई वडिलांसमोर जो तिला साडीमध्ये नेतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो..

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा

मांजर. हत्‍ती

मांजर: तुझे वय किती आहे?
हत्‍ती: पाच वर्ष
मांजर: तरीही, तू खूप मोठा दिसतोस.
हत्‍ती: आय एम ए 'कॉम्‍प्‍लॅन बॉय'. तुझे वय किती?
मांजर: तीस वर्ष
हत्‍ती: तरीही, तू इतकी लहान दिसतेस?
मांजर: 'पॉन्‍ड्स एज मिरॅकल'..बढती उम्र मानो..थम सी जाये.

प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…

प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…

***एक होती कळी***

***उमललि होती सकाळी***

दिवस खूप छान होता तिचा अनंत चतुर्दिशीचा

डोके वर काढून जग पाहत होती....

वार्‍या वर डोलात होती....

उन्हात खेळत होती.....

पावसात भिजत होती....

तर कधी काट्या मधे उभी राहून हसत होती

तर कधी पानांच्या आडून हळूच बघत होती

सगळे तिला बोलत

खूप छान आहे ती....

खूप सुंदर आहे ती ....

खूप नाजूक आहे ती....

खूप गोंडस आहे ती...

हे सगळे एकूण कळी गालातल्या गालात हसून जाई

आणि हसण्याने तिच्या गालात खळी पडून येई

वार्‍याच्या संगे डोलत मस्त धुंदीत गात होती

कशी-बशि तोल जाताना स्वतःला सावरत होती....

पण सायंकाळी .....

बाबा ने तिला गणपती च्या स्वाधीन केले..

वेळ होती....ती अंनत चतुर्थीची....

गणपती बरोबर नाचत नाचत ती आमच्या घरा बाहेर पडली....

वाजत गाजत ती हळू - हळू शेवटचे अंतर कापत गेली...

वेळ आली ती शेवटची...वेळ आली ती शेवटची

गणपती बाप्पा संगे विसर्जन होण्याची...

विसर्जनास जाता जाता मागे वळून ती पाहत होती

डोळ्यात अश्रू शिवाय तिच्या काहीच उरले नव्हते...

जाता जाता बोलली मला अजुन जग बघायचे होते...!!!

प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…!!!

प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…!!!
                                                                          लेखक - अज्ञात 

एकदा एका मुलीला प्रेम झाले,

एकदा एका मुलीला प्रेम झाले,
आणि तिने चंद्राला विचारले,"ए चांद,बता मेरा मेहबूब कैसा हे?"
.
.
चंद्र म्हंटला
.
.
.
.
.
पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्या बापाचा नौकर नाही,
दुसरी गोष्ट म्हणजे एवड्या दुरून'घंटा'काही दिसत नाही,
आणि
तिसरी गोष्ट म्हणजे"तुमचा प्रेम-रोग जमिनीपरीयांतच ठेवा,उगाच मला बिघडू नका..."

लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव

प्रिय मित्रानो,

लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाचनासाठी....!!!

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं.

पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकां...चं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल

- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...

- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...

एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल............!!!!

बरोबर ना, पटतंय ना

दुकानदार

दुकानदार : त्या माणसाने काही का खरेदी केले नाही ? त्याला काय पहायचे होते ?
.
.
.
.
.
.
.
.
सेल्सगर्ल : मला.....!!!! :)

छान प्रेमकथा

छान प्रेमकथा

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवऱ्या वर प्रेम करण्याची पद्धत होती ..............

जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवऱ्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ....................

ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणाऱ्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवऱ्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................

हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ..................

पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले

तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?

मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल.

प्रेम हे होत नसत

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
... वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत
म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत.........!
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका..

मुल लहान असतं तेव्हा......

मुल लहान असतं तेव्हा,त्याचे आईवडील त्याला हात जोडून देवाकडे "चांगली बुद्धी" मागायला सांगतात
आणि
"देवाकडे फक्त काही मागण्यासाठीच हात जोडायचे असतात" हि एक गोष्ट लहानपणीच मुलाच्या मनी भरली जाते.
थोडं मोठे झाल्यावर शाळेत गेल्यावर जशा परीक्षा जवळ येतात तेव्हा, देवाला आपण सांगतो,
"देवा या वर्षी अभ्यास केला नाहीये रे....पुढच्या वर्षी नक्की करीन.पण या वर्षी पास कर."
"आज गृहपाठ नाही केलाय...आज वर्ग शिक्षिकेला घरीच राहू दे."
"अरे देवा,आज प्लीज भरपूर पाऊस पडू दे नि शाळेला सुट्टी मिळू दे."
पुढे आपण कॉलेजला जातो,
तिथे मग आपल्या स्वप्नातली परी/राजकुमार आपल्याला दिसते/दिसतो.
मग पुन्हा आपले हात जोडले जातात,
"देवा...हि माझीच/माझाच होऊ दे रे...अजून काही नको रे बाबा."
कॉलेजचे मोरपंखी दिवस संपतात आणि मग नोकरी शोधण्याचं बिकट काम येऊन पडतं.
मग साहजिकच पुन्हा एकदा देव आठवतो.मग प्रमोशन,मग लग्न,मग मुलंबाळं....आपली मागण्याची लिस्ट वाढतच राहते.
कधी आपल्यासाठी, तर कधी आपल्या जवळच्यांसाठी आपण मागतच असतो. प्रत्येक वेळेस आपण देवाला हेच सांगतो,"देवा फक्त एवढंच रे...मग नाही तुला त्रास देणार"
आणि
या बदल्यात देवाला आपण निरनिराळी आमिषे दाखवत राहतो.कधी १ किलो पेढे, तर कधी २५ नारळांचा हार, तर कधी सोन्याचा उंदीर.
जो ज्याची जेवढी ऐपत त्याचा तेव्हढाच भक्तीभाव???????
इच्छा पूर्ण झाली की माणूस मनातल्या मनात हसत म्हणतो,
"कसा वेडा बनवला देवाला????"
देव म्हणतो,
"अरे मुर्खा,मीच तुझी निर्मिती केली आणि तू मला वेडा कसा करणार?
अरे....तुझे मन मी बनवलंय.
तुला माहित नसेल पण तुज्या मनाच्या भांड्याला मी छोटी छोटी छिद्र ठेवलीयत.
मी त्यात कितीही भरले तर सुद्धा ते कधीच पूर्ण भरणार नाही....
तू नेहमी उपाशी तो उपाशीच राहणार"

माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर चोरला...!!

झंप्या - माझ्या मित्राने काल
माझ्या मोबाईल मधून
माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर चोरला...!!
बंडू - मग...??
झंप्या - मग काय...??
...
तो कालपासुन स्वतःच्याच
बहिनीला रोमँटिक मेसेज पाठवतोय....

श्रीमंती म्हणजे काय?


श्रीमंती म्हणजे काय?

शाळेने पत्रक काढलं*,'*यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला

आर्थिक मदत द्यायची आहे*,

*तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा*

,*ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला*/

*विद्यार्थिनीला मिळेल*!

*आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे*,*खरोखर पंचाईतच होती*. *ही छोटी

मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की*,*अगदी एक विजार*,*एक सदरा असेल*,*तरी तो
रोज धुऊन*-*वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात*.*गरीब
मुलगा शोधायचा कसा*?*आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं*,*तुमच्यात कोण
गरीब*;*तेही सर्वात गरीब म्हणून*?! *मोठीच अडचण होती*.

*तीन*-*चार दिवस नुसता अंदाज

बांधण्यात गेले*. *वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे*;*पण
लहान मुलांमधे अडचणीचं*. *शेवटी दोन*-*चार मुलांना हाताशी घेतलं*,**जी गाडीने
शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची**.*मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती
सफ़रचंद खातांना मला दिसायची*. *अशा मुलांना विचारलं*,"*मला एक मदत कराल
का*?*आपल्या वर्गातला सर्वात गरीब *.......?"

*क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव

उच्चारले*,"*सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं*,*तो सर्वात गरीब आहे*."
*मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता*. "*कशावरून म्हणता*?" "*सर*.*त्याचा
सदरा दोन*-*तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय*.*त्याने शिवलाय*;*पण फ़ाटलेला शर्ट घालतो*.
*त्याची खाकी पॅंट तर नीट बघा*,*मागून दोन ठिगळं लावलेली आहेत*.*चपला त्याला
नाहीतच*.*मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो*.*तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून
अर्धी भाकरी आणतो*.*सर*,*ती भाकरीही कालचीच असते*.*भाजी कुठली सर*?*गुळाचा खडा
असतो*. *आम्ही सांगतो*,*तो सर्वात गरीब आहे*.*शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला
हवी*." *मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली*.*पण मला ते ऐकू
येणे शक्य नव्हते*. *मयूर एवढा गरीब असेल*?*की सर्वांनी एकमुखाने त्याच्या
गरीबीचे दाखले द्यावेत*?

*कारण*, *मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता*. *अक्षर स्वच्छ*,*मोकळं होतं*.

*त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे*. *एकदा तर त्याची वही मी
माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं*,"*पाहिलंस*!*हे सातवीतल्या मुलाचे
अक्षर*.*असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते*.*उत्तराल सुबक परीच्छेद*,*समास
सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे*........." *चे गठ्ठे
आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई*.*माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा
उत्साह मला थक्क करून टाकत असे*. *असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची
कल्पनासुद्धा मला येऊ नये*,*या गोष्टीचीच मला खंत वाटली*. *जी गोष्ट माझ्या इतर
विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो*......*अरेरे*!...,*मी
खूप
कमी पडतोय*. *मयूर*,*गेल्या सहलीला आला नव्हता*.*अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती
*;*पण त्याचं नाव यादीत नव्हतं*.*आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही*. *असलेल्या
मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती*.*केवळ पंचवीस
रूपये नसल्याने त्याचे *National Park *बघण्याचे राहून गेले*.*एका छान अनुभवाला
मुकला होता तो*. *हा आनंद मी हिरावला होता*.*यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी
त्याला जवळ का बोलावलं नाही*?

*मयूर स्वत*:*हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या

व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता*!
*शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो*.*खरंच आहे*,*मुलांनी सुचवलेलं नाव*.
*आर्थिक मदत*,*तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी*. *आता शंकाच नव्हती*.*त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते*. *मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना
नाव देउन टाकले*.'*मयूर जाधव*,*सातवी अ*,*अनुक्रमांक बेचाळीस*'** *डोळ्यावरचा
चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले*, "*खात्री केलीये ना सर*?*कारण
थोडीथोडकी रक्कम नाही*.*या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी*,*त्याचे शालेय शिक्षण
साहित्य*,*गणवेश*...*इत्याद
ी सर्व या रकमेत सामावणार आहे*." *मुख्याध्यापकांना
मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं*, "*सर*,*त्याची काळजीच करू नका*.*वर्गातला
सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर*-*मयूर जाधवच आहे *!" *एका योग्य
विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो*. *मयूरला मिळणारी
मदत*,*त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे
रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही*.

*दुस*~*या दिवशी शाळेत लवकरच गेलो*.

*देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता*.*त्यावर *'*गरीब
असूनही आदर्श*'** *असं म्हणून मयूरचं नाव होतं*. *शाळा भरली*. *मी अध्यापक
खोलीत बसलेलो होतो*.*इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला*. *त्याच्या चेह*~
*यावरचा भाव समजत नव्हता*.*राग आवरावा तसा करारी चेहरा*...
"*सर*,*रागवू नका*;*पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका*."
"*अरे*,*काय बोलतोयस तुला समजतय का*?"
"*चुकतही असेन मी*.*वाट्टेल ती शिक्षा करा*;*पण ते नाव *...!!"
*त्याच्या आवळलेल्या मुठी*,*घशातला आवंढा*,*डोळ्यातलं पाणी *......
*मला कशाचाच काही अर्थ लागेना*. *मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत*,*तो
असा*.....?
"*सर*,*मला मदत कशासाठी*?*गरीब म्हणून*?*मी तर श्रीमंत आहे*." *


त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती*.*येतानाच त्याचे अनवाणी

पाय पाहिले होते*.
*शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली
होती*.
"*अरे पण*....?"
"*सर*,*विश्वास ठेवा*.*मी श्रीमंत आहे*.*कदाचित सर्वात श्रीमंत असेन*...*सर*,*मी
गरीब आहे हे ठरवले कोणी*? *मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला*;*पण सर ते नाव
तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज*."

*अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले*. *त्याला उठवत मी म्हणालो*,"*ठीक

आहे*.*तुला नकोय ना ती मदत*,*नको घेऊस*;*पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय*?"

"*सर*,*माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा*,*कुठल्याही विषयाच्या*....*त्या पूर्ण

आहेत*.*पुस्तकं मी *Second Hand *वापरतोय*...*खरयं*! *पण मजकूर तर तोच असतो ना
*? *मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का*?*सर*,*माझे पाचवीपासूनचे मार्क बघा*,
*नेहमी पहिल्या तीनात असतो*. *गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व
बक्षिसे मलाच आहेत.

सर*...*सर*,*सांगा ना*,*मी गरीब कसा*?"*मयूर मलाच विचारत होता *

*आता मघाचचं दु*:*खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं*.
"*खरयं मयूर*.*पण तुला या पैशाने मदतच *......."
"*सर*,*मदत कसली*?*माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल*.*शाळाच फ़ी देतीये
म्हटल्यावर*,*मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन *! "

"*म्हणजे*?"

"*वडील घरांना रंग द्यायचे काम करतात*.Contractor *बोलावतो तेव्हाच काम मिळते*.
*तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात*.*चार पैसे मला मिळतात*,*ते मी साठवतो*.*
सर*,*संचयिका आहे ना शाळेची*,*त्यातलं माझं पासबुक बघा*.*पुढच्याही वर्षाची फ़ी
देता येइल एवढी रक्कम आहे त्यात*...*मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले
दिसते*.....*म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं*.*पण सर*,*मीच नाही तर आमचं घरच
श्रीमंत आहे*.*घरातले सगले काम करतात*.*काम म्हणज कष्ट*.*रंगाचं काम नसतं
तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात*.*आई धुणं*-*भांडी करते*.*मोठी बहीण दुसरी*
-*तिसरीच्या शिकवण्या घेते*.*सर*,*वेळ कसा जातो*,*दिवस कसा संपतो ते कळतच नाही*
....*शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत*.*तुम्हीच
सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी*.*सर*,*माझ्या घरी याच
तुम्ही*,*माझ्याकडे पु*.*ल*.*देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे*. .

.......*सर*,*आहे ना मी श्रीमंत*?"


*आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता*. *


सर*,*शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो*.*रात्री देवळात

होण्या*~*या भजनात मीच पेटीची साथ देतो*.*भजनीबुवा किती छान गातात*!*ऐकताना भान
हरपून जातं*."*त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता*.
*अभावितपणे मी विचारलं*,"*व्यायामशाळेतही जातोस*?" "*सर*,*तेवढी फ़ुरसत कुठली*?
*घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो*." *अंगावर एक थरार
उमटला*...*कौतुकाचा*.

"*मयूर मित्रा*,*मला तुझा अभिमान वाटतो*.*तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या

वर्गात आहे त्याचा*.." *

*"*म्हणूनच म्हणतो सर*......!"

"*हे नाव ज्या कारणासाठी आहे*,*त्यात तू नक्कीच बसणार नाहीस*.*आमची निवड चुकली*
;*पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल*.*शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून*,*हे पारितोषीक तरी*........."
"*सर*,*एवढ्यात नाही*.*त्याला वर्ष जाउ द्या*.*मी लिंकनचं*,*सावरकरांचं चरित्र
वाचलं*,*हेलन केलरचं चरित्र वाचलं*.*सर*,*हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे
कष्ट करून मोठी झाली*.*माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या*,*योग्य वयात ते
परखड मार्गदर्शन करा*;*पण सर*,*नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं
राहूनच जाईल*.*जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल*...*सर*.....*प्लीज*..
...!"

झरे आणि डोळे

झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहित असते,

फरक एवढाच आहे की..? ...............

झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत..

आणि.

डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत..

एक नवविवाहीत मुलगी

एक नवविवाहीत मुलगी पोपट विकत घेण्यासाठी पोपटवाल्याकडे येते..

पोपटवाला हा घ्या मेडम हा पोपट सर्वाना ओळखू शकतो आणि बोलतो सुद्धा

पोपट मुलीला पाहून मालकाला म्हणतो हि चालू आहे

पोपटवाला:- गप्प बस पाण्यात टाकीन तुला
मुलगी पोपटाला :- ह सांग माझ्या सोबत १ मुलगा आला तर तू काय म्हणशील..
पोपट :- तुमचे पती सोबत आले...
मुलगी :- छान आणि २ मुले असतील तर..
पोपट :- तुमचे पती आणि दीर आले..
मुलगी :- आणि 4 मुले असतील तर..

पोपट मालकाला म्हणतो आणा आणा पाणी..
बोललो होतो ना मुलगी चालू आहे.........!!!!

विनोद

एक मारवाडी मरतांना -

'' माझी प्रिय अर्धांगीनी तु इथे आहेस?''

बायको - हो मी इथेच आहे.

मारवाडी:-'' माझी प्रिय मुले आणि मुली तुम्ही सगळे इथेच आहात?''

मुले आणि मुली - हो बाबा.

मारवाडी - मग गाढवांनो शेजारच्या खोलीतील पंखा का सुरु आहे?

नको देऊस कोणते वचन,

नको देऊस कोणते वचन,

जे तू पाळू शकत नाहीस..

नको प्रेम करूस त्याच्यावर,

ज्याला तू मिळवू शकत
नाहीस..

खरे प्रेम कुठे कुणाचं उभं
राहीलं आहे ?

अगं त्या प्रेमाचे पहिले
अक्षर सुद्धा गं लंगडे
आहे..

खुप छान दिसायचीस तु,

खुप छान दिसायचीस तु,

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन

खुप छान हसायचीस तु.

नेहमीच मला माझ्या अवती

भोवतीखरचं भासायची तु,

मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग

आल्यावर,कुठेच नसायची तु..

माझ्यावरच हसुन झाल्यावर
पुन्हा मला दिसायची तु,
मी निघुन जायचो तुझ्याकडे पाहत
जेव्हा खरी-खुरी असायची तु..

जीवनाचा अर्थ -

जीवनाचा अर्थ -
1 . जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
2. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
3. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब
असतो असे म्हणत हसणे उतम !
4. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
5. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा
आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
6. मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये.. पण जगण्यासारखं काहीतरी
जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
7. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे
जास्त श्रेष्ठ.
8. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
9. जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
10. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला
शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का ??

एक महा कंजूष व्यापारी

एक महा कंजूष
व्यापारी आपल्या बायकोच्या वाढदिवसाला हजर राहू शकला नाही म्हणून त्याने आपल्या प्रिय पत्नीला एक कोटी किस्सचा बेरर चेक वाढदिवसाची भेट म्हणून पाठविला.

परदेश वारीवरून परत आल्यावर आपल्याच
कल्पनेवर खुश होत पत्नीला जवळ घेत म्हणाला डार्लिंग कशी वाटली माझी तुला दिलेली वाढदिवसाची भेट..??

'पत्नी म्हणाली तुम्ही जवळ नसल्यामुळे नाईलाजाने तो चेक मी शेजारच्या तरुण
कडून कॅश करून घेतला."

स्त्री आणि दारू..

स्त्री आणि दारू..

जेव्हा स्त्री आयुष्यात येते तेंव्हा जिवन सुंदर
बनते,

निघून जाते जिवनातून तेव्हा मग दारूच सोबत
देते..

रोज नवनविन स्वप्न रंगवली हि जातात,

दारूच्या पेल्या मध्ये मग ती दिसू लागतात..

आनंदाच्याक्षणी मात्र सोबत स्त्रीची असते,

दुःख विसरायला मात्र दारूचं कामी येते..

म्हणे स्त्रीची सोबत पुरुषाला मरेपर्यन्त असते,

मग जिवंतपणी पुरुषाला दारूची ओढ का लागते..

पुरुषावर स्त्रीपेक्षा दारूचे प्रेम जास्त असते,

ती सोडून जात नाही तिला सोडावी लागते..
.

बरोबर मंडळी..

आयुष्य जास्त सुंदर वाटत..........

आयुष्य जास्त सुंदर वाटत.......
गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा ...
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव आयुष्य जास्त सुंदर बनत..........
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.........
कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत...... हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........
चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत........ आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चिकटराव

चिकटरावांचा लग्नाचा ३५ वा वाढदिवस ..........

चिकटरावांची बायको : आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलं आहे ?

चिकटराव : समोर रस्त्यावर लाल भडक रंगाची नवी कोरी फेरारी दिसतेय का...

चिकटरावांची बायको : ( आनंदाने ) - हो !!

चिकटरावांचा मुलगा : सेम त्याच रंगाची टिकली आणली आहे तुला....

एक भिजलेली मुलगी

एक भिजलेली मुलगी,
तिचे भिजलेल शरीर,
तिचे भिजलेल ओठ,
तिचे भिजलेल केस,
तिच्याशी नजर मिळताच हृदयातून एकच आवाज आला..
...
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.उद्या ही १००% आजारी पडणार... :P

मी एक इनोसंट मुलगा आहे मी असले तसले विचार नाही करत ;)

मराठी विनोद

चिनी कुत्र्याचे नाव काय ?
>हे हुंग ते हुंग
भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
>हिंदुस्तान लिव्हर
नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
>उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
>कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
>वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
>ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
>माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
>थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
>धाक ली.......

असे ह्रदय तयार करा की

असे ह्रदय तयार करा की , त्याला कधी तडा
जाणार नाही ..
असे हास्य तयार करा
की ,
ह्रदयाला ञास होणार
नाही ..
असा स्पर्श करा की ,
त्याने जखम होणार
नाही ............:)

जीवापाड प्रेम

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, ...
प्रेम म्हणजे काय असतं.......!!
तुम्ही प्रेम कोणावर ही करा, पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यन्त करा..,
कारण प्रेम हे मौल्यवान असतं..!! ..

प्रत्येक आठवणी

तुझ्याबरोबरच्या प्रत्येक आठवणी मी माझ्या मनात पुस्तकात गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात तशा जपून ठेवल्यात ...
फरक फक्त येवढाच की ...
कालांतराने त्या पुस्तकातल्या पाकळ्या काळ्या पडतात ...
पण मनातल्या आठवणी केव्हाही बाहेर काढल्या तरी त्या कोवळ्याच ठरतात ... ♥

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही

आयुष्यात एकदा मागे बघायचे राहून गेले

आयुष्यात एकदा मागे बघायचे राहून गेले
कधी तुझी साथ होती आठवायचे राहून गेले

तु माझा रिमझिमणारा श्रावण होतीस
एकदा तुझ्या सरीत भिजायचे राहून गेले
...
किती लोक आले मैफ़ीलीत माझ्या
एकदा तुझे गीत गायचे राहून गेले

नशिबाने दिल्या मला अनेक जखमा
एकदा तुझा हात पहायचे राहून गेले

अखेर आली जीवनाची माझ्या आता
एकदा तुझ्यासवे जगायचे राहून गेले

एकदा तुझ्यासवे जगायचे राहून गेले...!!!!!!!

मराठी बायकोचे नवऱ्याला typical dialogue:

मराठी बायकोचे नवऱ्याला typical dialogue:
१. मी होते म्हणून तुमच्या सोबत इतकी वर्ष निभावून
नेलं. दुसरी एखादी असती ना......
२. देवा! गेल्या जन्मी मी काय ढोर मारलं, आणि हे तू सोंग
माझ्या गळ्यात बांधलस
३. हे एकच एवढ करा, पुन्हा मी तुमच्या कडे काय
बी मागायची न्हाय
४. माझ्या आऊशी बापानं काय दिव्याला तेल तुप
कमी केल, देवा तू हे ध्यान माझ्या माथी मारलंस
५. मला एका पेक्षा एक मागण्या आल्या होत्या, कुठून
अवदशा आठवली आणि मी तुम्हाला हो म्हणाले
६. रातच्याला सरळ घरला या. हल्ली काही तुमची लक्षणं
मला ठीक दिसत नाहीत
७. मेलं माझा नशिबच फुटकं, हेच दिवस बघायचे राहिले
होते
८. अहो माझा थोरला भाऊ येतोय उद्याच्याला,
काही शिका त्याच्या कडनं धंदा पाण्याच विचारून घ्या
९. चांगले ५-२५ लाख हुंडा देत होते माझे घरचे, पण तुमचेच
नाक वर
१०. जाईन मी माहेरी मुलांना घेऊन, मी काही जड
नाही झाले माझ्या माहेरच्यांना.......

कोल्हापुरी बाई

 कोल्हापुरी बाई दुरून
येणाऱ्या बसला हात दाखवून थांबवते
बस थांबते...

driver : बोला बाई कुठे
जाणार..??

बाई: कुठ नाही ...

driver : मग बस का थांबवली..??

बाई: नाही ओ पोरगा रडतोय जरा भोँगा वाजवून दाखवाकी....