मराठी बायकोचे नवऱ्याला typical dialogue:
१. मी होते म्हणून तुमच्या सोबत इतकी वर्ष निभावून
नेलं. दुसरी एखादी असती ना......
२. देवा! गेल्या जन्मी मी काय ढोर मारलं, आणि हे तू सोंग
माझ्या गळ्यात बांधलस
३. हे एकच एवढ करा, पुन्हा मी तुमच्या कडे काय
बी मागायची न्हाय
४. माझ्या आऊशी बापानं काय दिव्याला तेल तुप
कमी केल, देवा तू हे ध्यान माझ्या माथी मारलंस
५. मला एका पेक्षा एक मागण्या आल्या होत्या, कुठून
अवदशा आठवली आणि मी तुम्हाला हो म्हणाले
६. रातच्याला सरळ घरला या. हल्ली काही तुमची लक्षणं
मला ठीक दिसत नाहीत
७. मेलं माझा नशिबच फुटकं, हेच दिवस बघायचे राहिले
होते
८. अहो माझा थोरला भाऊ येतोय उद्याच्याला,
काही शिका त्याच्या कडनं धंदा पाण्याच विचारून घ्या
९. चांगले ५-२५ लाख हुंडा देत होते माझे घरचे, पण तुमचेच
नाक वर
१०. जाईन मी माहेरी मुलांना घेऊन, मी काही जड
नाही झाले माझ्या माहेरच्यांना.......
No comments:
Post a Comment