Sunday, January 15, 2012

प्रेमात ब्रेक अप कधी आमच्या आलंच नाही...

प्रेमात ब्रेक अप कधी आमच्या आलंच नाही...
ब्रेक अप होण्याइतकं प्रेम कधी आम्ही कोणावर
केलंच नाही...!!
तिच्या बरोबर हसलो खेळलो नाचलो, पण
प्रेमात पडलो नाही...
... तिच्यावर कविता लिहिल्या पण i love you
म्हटलं नाही...!!
तिच्या लग्नातही आम्ही खूप नाचलो,
किंचितही थकलो नाही...
त्या नंतर हि आमचं ब्रेक अप झालं असं कधी म्हटलं
नाही...!!
ब्रेक अप माझ्या मते कधी प्रेमाचं होत नाही...
ब्रेक अप करणाऱ्यांना कदाचित प्रेमच अजून कळलं
नाही...!!
त्यागावर आधारित प्रेम आज कल कोणी करतच
नाही...
स्वार्थासाठी ब्रेक अप, पण प्रेमासाठी प्रेम
कोणी करतच नाही...!!

No comments:

Post a Comment