प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…
***एक होती कळी***
***उमललि होती सकाळी***
दिवस खूप छान होता तिचा अनंत चतुर्दिशीचा
डोके वर काढून जग पाहत होती....
वार्या वर डोलात होती....
उन्हात खेळत होती.....
पावसात भिजत होती....
तर कधी काट्या मधे उभी राहून हसत होती
तर कधी पानांच्या आडून हळूच बघत होती
सगळे तिला बोलत
खूप छान आहे ती....
खूप सुंदर आहे ती ....
खूप नाजूक आहे ती....
खूप गोंडस आहे ती...
हे सगळे एकूण कळी गालातल्या गालात हसून जाई
आणि हसण्याने तिच्या गालात खळी पडून येई
वार्याच्या संगे डोलत मस्त धुंदीत गात होती
कशी-बशि तोल जाताना स्वतःला सावरत होती....
पण सायंकाळी .....
बाबा ने तिला गणपती च्या स्वाधीन केले..
वेळ होती....ती अंनत चतुर्थीची....
गणपती बरोबर नाचत नाचत ती आमच्या घरा बाहेर पडली....
वाजत गाजत ती हळू - हळू शेवटचे अंतर कापत गेली...
वेळ आली ती शेवटची...वेळ आली ती शेवटची
गणपती बाप्पा संगे विसर्जन होण्याची...
विसर्जनास जाता जाता मागे वळून ती पाहत होती
डोळ्यात अश्रू शिवाय तिच्या काहीच उरले नव्हते...
जाता जाता बोलली मला अजुन जग बघायचे होते...!!!
प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…!!!
प्रेमाचे हे सुंदर जग मला अजुन पहायचे होते…!!!
लेखक - अज्ञात
No comments:
Post a Comment