Sunday, January 15, 2012

आयुष्यात एकदा मागे बघायचे राहून गेले

आयुष्यात एकदा मागे बघायचे राहून गेले
कधी तुझी साथ होती आठवायचे राहून गेले

तु माझा रिमझिमणारा श्रावण होतीस
एकदा तुझ्या सरीत भिजायचे राहून गेले
...
किती लोक आले मैफ़ीलीत माझ्या
एकदा तुझे गीत गायचे राहून गेले

नशिबाने दिल्या मला अनेक जखमा
एकदा तुझा हात पहायचे राहून गेले

अखेर आली जीवनाची माझ्या आता
एकदा तुझ्यासवे जगायचे राहून गेले

एकदा तुझ्यासवे जगायचे राहून गेले...!!!!!!!

No comments:

Post a Comment