Sunday, January 15, 2012

मुल लहान असतं तेव्हा......

मुल लहान असतं तेव्हा,त्याचे आईवडील त्याला हात जोडून देवाकडे "चांगली बुद्धी" मागायला सांगतात
आणि
"देवाकडे फक्त काही मागण्यासाठीच हात जोडायचे असतात" हि एक गोष्ट लहानपणीच मुलाच्या मनी भरली जाते.
थोडं मोठे झाल्यावर शाळेत गेल्यावर जशा परीक्षा जवळ येतात तेव्हा, देवाला आपण सांगतो,
"देवा या वर्षी अभ्यास केला नाहीये रे....पुढच्या वर्षी नक्की करीन.पण या वर्षी पास कर."
"आज गृहपाठ नाही केलाय...आज वर्ग शिक्षिकेला घरीच राहू दे."
"अरे देवा,आज प्लीज भरपूर पाऊस पडू दे नि शाळेला सुट्टी मिळू दे."
पुढे आपण कॉलेजला जातो,
तिथे मग आपल्या स्वप्नातली परी/राजकुमार आपल्याला दिसते/दिसतो.
मग पुन्हा आपले हात जोडले जातात,
"देवा...हि माझीच/माझाच होऊ दे रे...अजून काही नको रे बाबा."
कॉलेजचे मोरपंखी दिवस संपतात आणि मग नोकरी शोधण्याचं बिकट काम येऊन पडतं.
मग साहजिकच पुन्हा एकदा देव आठवतो.मग प्रमोशन,मग लग्न,मग मुलंबाळं....आपली मागण्याची लिस्ट वाढतच राहते.
कधी आपल्यासाठी, तर कधी आपल्या जवळच्यांसाठी आपण मागतच असतो. प्रत्येक वेळेस आपण देवाला हेच सांगतो,"देवा फक्त एवढंच रे...मग नाही तुला त्रास देणार"
आणि
या बदल्यात देवाला आपण निरनिराळी आमिषे दाखवत राहतो.कधी १ किलो पेढे, तर कधी २५ नारळांचा हार, तर कधी सोन्याचा उंदीर.
जो ज्याची जेवढी ऐपत त्याचा तेव्हढाच भक्तीभाव???????
इच्छा पूर्ण झाली की माणूस मनातल्या मनात हसत म्हणतो,
"कसा वेडा बनवला देवाला????"
देव म्हणतो,
"अरे मुर्खा,मीच तुझी निर्मिती केली आणि तू मला वेडा कसा करणार?
अरे....तुझे मन मी बनवलंय.
तुला माहित नसेल पण तुज्या मनाच्या भांड्याला मी छोटी छोटी छिद्र ठेवलीयत.
मी त्यात कितीही भरले तर सुद्धा ते कधीच पूर्ण भरणार नाही....
तू नेहमी उपाशी तो उपाशीच राहणार"

No comments:

Post a Comment