मुलगी मैत्रीण/gf
मला GF हवी आहे साधी दिसणारी,
काळ्या केसांची;
डोळ्यांची .......... .
जास्त प्रश्न न विचारणारी ,मराठीवर
प्रेम करणारी, उदार अंतः करणाची,
"बाहेरच खायला आवडत नाही मला" अस
बोलणारी, साधीच पण जीन्स घालणारी,
पुस्तकांवर
प्रेम असणारी,
माझ्या काहीच्या काही कविता फालतू
असल्या तरी;
"....... खरचं किती सुंदर कविताआहेत
तुझ्या, जणू काही दुसरा मर्ढेकर" अस खोट
खोट बोलणारी,
"हिंदी चित्रपट आवडत नाही मला ........
मराठीच आवडतात. पण तेही मी घरीच
बघते"
अस म्हणणारी, पावसात
भिजायला आवडणारी, "प्लीज
मला काही गिफ्ट घेवू नकोस" अस
म्हणणारी,
आणि .......... ब्रेकअपच्या वेळी........
"प्लीज मला समजून घे, माझ्या पुढे
दुसरा पर्याय नाही"
हे इतक्या सच्चाईने बोलणारी, कि ते
एकूणच तिच्या पुन्हा प्रेमात पडावं अस
वाटायला लावणारी, एक GF हवीआहे,
No comments:
Post a Comment