Sunday, February 5, 2012

आमच्या शिवरायांचे वादळ

आमच्या शिवरायांचे वादळ अजून थोडा वेळ जरीघोंगावले असते तर,
त्यांनी हिंदुस्थानाचकाय पण उभ्या जगालाच आपल्या कवेत घेतेले असते..
.
.
आमच्या शिवरायांच्या पराक्रमच्या तोफा अजून काही काळ जर धगधगतराहिल्या असत्या तर,
त्यांनी आज सातासमुद्रापारही  स्वराजाच्याच नौबती झाडल्या असत्या.
.
.
आमच्या शिवरायांसाठी नियती थोडी जरी सबुरीने वागली असती तर,
त्यांनी जमिनीवरच काय पण समुद्रावर हि हुकुमत गाजवली असती.
.
.
आमच्या शिवरायांची समशेर अजून थोडी जरी तळपली असती तर ,
आज ब्रिटेनच्या राणीनेहि "जय जिजाऊ जय शिवराय" ची आरोळी ठोकलीअसती.
.
.
आमच्या शिवरायांच्या आयुष्याचा दोर अजून थोडा मजबूत असता तर,
त्यांनी लाल किल्यावारच काय पण"व्हाईटहाउस"वरह ी भगवाझेंडा फडकवला असता. .
.
पण महाराजांच्या अकाली जाण्याने त्यांची स्वप्न स्वप्नेच राहिली.
आपल्यातील दुहीच्या शापाने ती कधीच नाही पूर्ण झाली.
.
.
आता तरी उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.

No comments:

Post a Comment