Wednesday, January 11, 2012

राजे पुन्हा जन्माला या

मावळ्यांनो तुमचा ''राजे पुन्हा जन्माला या'' चा आवाज आमच्या कानात आजही घुमतोय, म्हणूनच जिजाऊपोटी पुन्हा जन्माला यावे असे आम्ही ठरवतोय.... पण मराठ्यांनो..... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, आम्हाबरोबर शंभूदेवाची शपथ पुन्हा घ्याल का?... रयतेच्या कल्याणासाठी जिवाचे रान कराल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर जात भेद विसराल का?... महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकीची वज्रमूठ कराल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, शीर हातावर घेऊन लढाल का?... स्वराज्याची धगधगती मशाल हाती घेऊन प्राणांची आहुती द्याल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, शिबीच्या झाडातील तलवारी बाहेर काढाल का?... स्वकीय व परकीय गद्दारांची मुंडकी तुम्ही कलम कराल का?... आम्ही पुन्हा जन्माल आलो तर, स्वाभिमान तुमचा जागवाल का?... दिल्लीच्या तख्तापुढे ताठ मानेने उभे रहाल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, गनीमी कावा तुम्ही शिकाल का?... शत्रूवर तुटून पडण्याचा पराक्रम पुन्हा तुम्ही गाजवाल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, लाचारीचे जगणे सोडून द्याल का?... अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे धाडस तुम्ही दाखवाल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर, मदतीचा हात आम्हाला द्याल का?... गतःजन्मी सारखी साथ ह्या जन्मी आम्हाला द्याल का?... आम्ही पुन्हा जन्माला आलो तर दिलेला शब्द जिवापाड पाळाल का?... ... ... तरच आम्ही जिजाऊंना विचारु ''माते पुन्हा तुमच्या पोटी ह्या शिवबाला जन्म द्याल का?''...... जय माता जिजामाऊली... जय भवानी... हे मान्य असेल तर द्या मग आवाज ..... ''राजे पुन्हा जन्माला या''.....

No comments:

Post a Comment