अभेद्य सह्याद्रीचा कातळ तू
अभेद्य सह्याद्रीचा कातळ तू
कृष्णा- गोदेचे जळ नितळ तू
पौर्णिमेचा चंद्र शीतल तू
भयाणरात्रीचा आग्यावेताळ तू / १ /
चाल उठ गड्या , अंग झटक तू
दे आळीपिळी , सोड मरगळ तू
दोन्ही हाताना दे तू काम आता
पायांना शोधू दे प्रगतीच्या वाटा / २ /
पुरे शांती आता कर क्रांती तू
सोड मायावी राजकारण तू
सर्व शक्तीनिशी कर प्रहर तू
नको घेवूस राणी माघार तू / ३/
तुझ्या बाहुत बल हत्तीचे
नसात दौडे रक्त वाघिणीचे
तुझे विचार जागाव तू
भूक विजयाची पुन्हा भागाव तू /४/
उठ मावळ्या झाली पहाट हि
शक्ती उगवली पुन्हा मराठी हि
नको अन्याय आता कुणावर
बाजी लावील हा वीर पणावर / ५/
आव्हान दे तू सर्व जगाला
नको किंतु आता धर वेगाला
आली जाग सहयाद्रीपुत्र मराठा
मावळ्यानो संदेश शिवाचा पुन्हा उठा/ ६/
फोड गनिमा आणि गानोजीला
मराठा जोडा बल द्या तानाजीला
हवे गडहि आणि सिंहहि हवा
झेंडा भगवा पुन्हा फडकवा नवा / ७ /
---------- बाजी दराडे
No comments:
Post a Comment