श्रीमान योगी मधील एक ओळ मोडकी-तोडकी आठविली,
आबासाहेब म्हणतात," हा सह्याद्री अफाट आणि प्रचंड आहे, याला जो शरण येतो
त्याला हा आपल्या पदराखाली घेतो परंतु जर कोणी सह्याद्री जिंकायला येतो
त्याला हा जन्माची अद्दल घडवितो...."
रायगड उतरताना समोर दिसणाऱ्या
सह्याद्रीचे हे रूप, खरच आपण खूप नशीबवान आहोत जे या सह्याद्रीत जन्माला
आलो आहोत. हा फोटो या प्रचंड, अभेद्यआणि अमर अश्या सह्याद्रीच्या नावे.
--------------- --------------- --------------- --------------- --------
सह्याद्री माझी माउली,राजगड माझा घर,तोरणा माझा प्रेरणा स्थान ,रायगड माझा
स्वर्ग,इंद्रायण ी -भीमा माझ्या धमन्यात धावणारं रक्त, सिंहगड माझा
छावा,शिवनेरी माझा उगमस्थान,
सह्याद्री माझा पांघरून,इथली माती माझी आई...
इथच जगलो इथच वाढलो, इथेच मरणार,पण मारताना आईचे पांग फेडून जाणार.....!
No comments:
Post a Comment