Wednesday, January 11, 2012

आरे..... त्यांना स्वार्थ होता कसला? त्यांना मिळणार तरी होते काय?
त्यांना स्वार्थ न्हवता कुठल्या खुर्चीचा, त्यांना स्वार्थ न्हवता कुठल्या वतनदारीचा नास्वार्थ होता कुठल्याबेढब पदवीचा त्या वीरांना स्वार्थ होतातो कसला तर या हिंदवी स्वराज्याच ा.
''हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा'' एवढ्या एका मोहापाई कैकानी आपल्या प्राणाची आहुती दिली. कैकानी आपल्या घरादारावर तुलसी पत्रठेवले.
काय गरज होती त्यांना हे सगळ करण्याची? घरामध्ये बसून त्यांना दोन घास मिळाले नसते काय खायला? हो नक्कीच मिळाले असते..!! मग का केला असेल त्यांनी हा आटापिटा? का झेलले आसतील आपल्या शरीरावरतलवारीचे घाव? का शंभूराजेनी हसत मुखाने मृत्यूला कवटाळल असेल? कारण त्यांना हे तुमच आमच सर्वांच माझ्या शिवाजीराजा च्या स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य घडवायचे होते.
वीरबाजी, तानाजी, नेताजी, सूर्याजी, सरसेनापती प्रतापराव गुजर, वीरशिवा काशीद किती नावे घेऊ.... लिहता लिहता माझा हात थकेल पण नावे संपणार नाहीत. हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे हे मला माहिती आहे. पण मी तुम्हाला हे का सांगत आहे?
राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल ते एकट्याच्या जीवावरनाही. त्यांना लाख मोलाची साथ मिळाली ती या शूरवीर मावळ्यांची . हिंदवी स्वराज्य का साकार झाले? ते साकार झाले या सगळ्यांच्य ा प्रयत्नामध ून. मला यातून एवढेच सांगायचेआहे, ज्याप्रमाण े राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी एकीतून हेहिंदवी स्वराज्य निर्माण केल त्या प्रमाणे हे हिंदवी स्वराज्य टिकून ठेवायचे असेल तर आपल्या सगळ्यांमध् ये एकी निर्माण झाली पाहिजे. राजांचे हे वैभव सांभाळण्या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. जात-पात विसरून शिवकार्यास लागले पाहिजे. तरच राजांच्या स्वप्नाचे सार्थक झाले असे म्हणता येईल....!! !!!
जय भवानी जय शिवाजी.... जय जिजाऊ... जय शंभूराजे ....!!!

No comments:

Post a Comment