आपले
शंभुराजे............... सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा आमचा
शंभूराजा । बळीराजाचा अवतार म्हणजे शंभूराजा । शहाजीँचे स्वप्न म्हणजे
शंभूराजा । सळसळत्या रक्तात धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा । 14 मे 1657
साली पुरंदरा वरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे शंभूराजा ।
वयाच्या 2र्या वर्षी आईविना पोरका झालेला म्हणजे शंभूराजा । वयाच्या 9
व्या वर्षी 4000ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे शंभूराजा
। वयाच्या 10 व्या वर्षी आग्रेच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे
शंभूराजा । वयाच्या 11व्या वर्षी 5000ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे
शंभूराजा । वायाच्या 13व्या वर्षी भर दरबारात रायप्पा महाराजांचा सत्कार
करणारा सच्चा मित्र म्हणजे शंभूराजा । वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषनम्
नावाचा संस्क्रूत महाग्रंथ लिहिणारा महान पंडीत म्हणजे शंभूराजा । वयाच्या
15 व्या वर्षी नतशिक , नायकाभेद , सातसतक सारखे हिंदी ब्रिदभाषेतील ,
भोजपुरी भाषेतील ग्रंथ लिहीणारा महान हिँदी पंडीत म्हणजे शंभूराजा ।
वयाच्या 16व्या वर्षी 10000 फौजेचे कुशल नेत्रूत्व करणारा कुशल सेनानी
म्हणजे शंभूराजा । वयाच्या 17 व्या वर्षी छत्रपतीँच्या गादीचा पहिला युवराज
म्हणजे शंभूराजा । वयाच्या 19व्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची
देहू ते पंढरपूर ही जगातली पहिली वारी सुरु करणारा शिवबाचा धारकरी विठोबाचा
वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभूराजा । वयाच्या 23व्या
वर्षी छत्रपतीँच्या गादीवर बसलेला दुसरा छत्रपती म्हणजे शंभूराजा । वयाच्या
23व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यँत इंग्रज , डच , पोर्तूगीज , फ्रेँच
आणि मोगल या पाच महासत्तांशी प्राणपनाणे लढणारा , सह्याद्रीच्या वनामद्धे
वनराजा प्रमाणे फिरणारा , वादळामद्धे दिवा बनून जगणारा सळसळत्या रक्ताचा
धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा । वयाच्या 32व्या वर्षी या राष्ट्रासाठी व
शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारा आमचा
शंभूराजा .........।
No comments:
Post a Comment