Wednesday, January 11, 2012

अभिमानाने, आनंदाने, गर्जू आपण 'मी हिंदू...!'

अभिमानाने, आनंदाने, गर्जू आपण 'मी हिंदू...!'
जो धर्म जगाला मार्ग दाखवी, धर्म सनातन 'मी हिंदू...!'
अविकारी जे शाश्वत नित्य, असे एकच ते एकच सत्य,
एकच आत्मा सर्वांमध्ये, देऊ विचार 'मी हिंदू...!'
वंद्य आम्हाला दशरथनंदन, रावणमर्दन श्रीराम!
दिनानाथ जो, पूर्णप्रतापी, जानकीवल्लभ श्रीराम!
राम राम गातांना जोडू हृदय हृदय बिंदू बिंदू,
अभिमानाने, आनंदाने, गर्जू आपण, 'मी हिंदू...!'
आसिंधु सिंधुपर्यंत ज्याच्या, वाडवडिलांची भूमी,
पुण्यभूमी भारत आणि धर्मसंस्कृतीची भूमी,
बौध्द, जैन वा शीख असो, जे परमतसहिष्णु ते हिंदू
अभिमानाने, आनंदाने, गर्जू आपण 'मी हिंदू..!'
                                                 (कवयित्री: सौ. शैलजा शेवडे)

No comments:

Post a Comment