एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो
ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं
नाव सांगायलाच हवं का?
एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह
आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा
जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली
'कटिंग चाय' होती.
हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. 'गुजारिश'मध्ये
बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.
एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!
रॉजर फेडरर म्हणाला, ''मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक
आहे?'' रजनीकांतने विचारलं, ''नेटमध्ये भोकं किती असतात?''
ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही 'रजनीकांत' असं
उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.
रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.
कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.
एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच
गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता,
'ढिशक्यांव!!!!'
सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल,
त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची
असं ठरलं होतं..
'मिशन इम्पॉसिबल' हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता..
रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!
एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी
रजनीकांतच करू शकतो की काय?
No comments:
Post a Comment