Tuesday, January 24, 2012

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा

करेल?



रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..

त्यातूनच 'गुगल'चा जन्म झाला.



एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं

म्हणे!



रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन

पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.



एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ''उगाच थरथर

कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत

जगात काहीही नसतं!''



एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.



'रोबो' सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला चार स्टारचे

रेटिंग दिले.



देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो 'अरे रजनीकांता' असे

उद्गारतो.



रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.



त्सुनामी कशा तयार होतात..

अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे..

प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?

No comments:

Post a Comment