रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो
डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन
रजनीकांत होते.
रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.
प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच
केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.
एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक
रजनीकांत फरारी झाला आहे.
रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून,
ब्लूटुथवरून.
''बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,'' आईने ओरडून
सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.
रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ''मला सतत अशी भावना होते की
कुणीतरी माझा पाठलाग करतंय.''
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ''माय गॉड, माझी सावली कुठे गेली?''
प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ''तुला भविष्यात काय करायचे आहे?''
मुलगा उत्तरला, ''एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये
जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून
नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून
नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.''
प्रोफेसर म्हणाले, 'बाप रे, तुझं नाव काय?''
''सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.''
''आई आई, तो बघ तारा तुटला!''
''नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल
सूर्याला नाहीतर चंद्राला!''
एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी
डार्लिग या नावाने ओळखते.
एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात
आला.
एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक
मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.
एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ''आय अॅम बाँड,
जेम्स बाँड.'' त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड
जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, 'आय अॅम कांत, रजनीकांत. येन्ना
रास्कला.''
No comments:
Post a Comment