Saturday, January 14, 2012

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्याच्या मकरसंक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण.
वर्षभरात बारा राशीतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे.
कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो.




सोमवार १४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत आहे.
म्हणून मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार १५ जानेवारी रोजी सकाळी सुयोर्दयापासून सूर्यास्तापर्यंत सांगण्यात आलेला आहे.


मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे.

समस्त मायबोली परीवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment